अख्खा महाराष्ट्र पाहणार ११ लाखांची पैठणी

महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम १८ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाचं महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आलं आणि प्रचंड गाजलं. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात १ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि आता या १० जणींमध्ये येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात ११ लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.

या परवाच्या सुरुवारती पासून ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली हि पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कुठलं शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी ठरणार कोणती नगरी? हे प्रेक्षकांना रविवारी महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळेल. या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार २७ जून पासून होम मिनिस्टरच ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात.

Share your valuable opinion

%d bloggers like this: