“किचन कल्लाकार”च्या सेटवर बोलका कोबी

झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात प्रेक्षकांना या कार्यक्रमात एक बोलका कोबी पाहायला मिळेल. हो हे खरं आहे. या आठवड्यात रामदास पाध्ये या किचन मध्ये सज्ज होणार आहेत आणि ते आले म्हंटल्यावर त्यांच्यासोबत  बोलके बाहुले पाहुणे येणार नाहीत असं होणं शक्यच नाही.

रामदास पाध्ये यांच्यासोबत एक बोलका कोबी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रामदास पाध्येंच एक खास सादरीकरण या किचनमध्ये प्रेक्षकांसाठी सादर होईल. रामदास पाध्ये यांच्या सोबत अशोक नायगावकर आणि रामदास आठवले हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Share your valuable opinion

%d bloggers like this: