कोण आहेत परीचे खरे बाबा? 

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशचा भव्य-दिव्य विवाह सोहळा पाहायला मिळाला. नेहा आणि यशाच्या लग्नामुळे चौधरी कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता लवकरच त्यांच्या आनंदात विरजण पडणार आहे. नेहा आणि यशच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी एका नवीन व्यक्तिरेखेची मालिकेत एंट्री झाली आहे. हि व्यक्तिरेखा आहे नेहाच्या पहिल्या नवऱ्याची.

नुकतंच मालिकेत अविनाशची झलक पाहायला मिळाली. अविनाश त्याला परीसाठी ड्रायव्हर म्हणून अपॉईंट केलं असल्याचं सांगतो. अविनाश हा दुसरा तिसरा कोणी नसून नेहाचा पहिला नवरा आहे. त्यामुळे आता परी आणि नेहाच्या सुखी आयुष्यात अविनाश नावाचं वादळ येणार आहे तेव्हा त्यांची आयुष्य बदलणार कि यश या वादळातून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणार हे पाहणं रंजक ठरेल. अविनाशची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय. या भूमिकेबद्दल बोलताना निखिल म्हणाला, “माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका अतिशय लोकप्रिय आहे आणि या मालिकेत एका रंजक वळणावर माझी महत्वपूर्ण भूमिकेत एंट्री झाली याचा मला खूप आनंद आहे. हि भूमिका आहे नेहाचा पहिला पती आणि परीचा बाबा अविनाशची. अविनाशला बघून नेहाची काय प्रतिक्रिया असेल आणि अविनाशचा नेहा आणि परीच्या आयुष्यात परत येण्याचा हेतू नक्की काय आहे हे प्रेक्षकांना पाहायला आवडेल.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: