चिंचि चेटकीण घेऊन आली आहे ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ लिटिल मास्टर्स

झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी नेहमीच तत्पर असते. नवनवीन कथा आणि त्याचसोबत दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रम हि वाहिनी प्रेक्षकांसाठी सादर करत असते. लवकरच झी मराठीवाहिनी आपल्या लहान दोस्तांसाठी घेऊन येणार आहे डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स. या कार्यक्रमाची रंगात वाढवण्यासाठी छोट्या दोस्तांची आवडती चिंचि चेटकीण लिटिल मास्टर्स शोधणार आहे. नुतकंच झी मराठीच्या इंस्टाग्रामवर रिलीज झालेल्या व्हिडीओ मध्ये चिंचि चेटकीण म्हणतेय, “मी शोधतेय महाराष्ट्राचे लिटिल मास्टर्स”. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनाआपल्या लहान मुलांचे (वयोगट ४ ते १५) डान्स व्हिडीओज हॅशटॅग डान्स महाराष्ट्र डान्स वापरून आणि झी मराठीला टॅग इंस्टाग्रामवर पोस्ट करायचे आहेत. चिंचि चेटकीण महाराष्ट्रातील धमाकेदार लिटिल मास्टर्स शोधून हा कार्यक्रम सादर करणार आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Share your valuable opinion

%d bloggers like this: