‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या ऑडिशनला छोट्या दोस्तांच्या तुफान प्रतिसाद


छोट्या दोस्तांची लाडकी चिंचि चेटकीण नुकतंच म्हणाली कि ती शोधतेय महाराष्ट्राचे लिटिल मास्टर्स आणि त्यानंतर बच्चेकंपनीमध्ये एकच उत्साह पसरला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या लहान मुलांचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर हॅशटॅग डान्स महाराष्ट्र डान्स वापरून आणि झी मराठीला टॅग करून पोस्ट करायचा आहे. अवघ्या काही दिवसातच डान्स महाराष्ट्र डान्सच्या या ऑनलाईन ऑडिशनला भरगोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. झी मराठीच्या सोशल मीडियावर देखील काही धमाकेदार डान्स व्हिडीओज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणार्यासाठी आता प्रेक्षक ९१३७८५७९१६ या क्रमांकावर आपल्या लहान मुलांचे डान्स व्हिडीओ, पूर्ण नाव, शहर, आणि मोबाईल क्रमांक पाठवू शकतात. लहान मुलांचा हा उत्साह आणि टॅलेंट पाहून हा कार्यक्रम पण तितकाच जबरदस्त असणार यात शंकाच नाही. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.