मनोरंजन मंगळवार (मालिका आणि सिनेविश्वातील फास्ट अपडेट्स)

काळोखाच्या पारंब्या

मॉस्कोत ‘काळोखाच्या पारंब्या’

संवेदनशील अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. कारणही तसंच खास आहे. मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘काळोखाच्या पारंब्या’ या मराठी सिनेमाला ‘मॉस्को इंटरनॅशनल फेस्टिवल’मध्ये नामांकन मिळाल आहे आहे. दिग्दर्शनाबरोबरच मकरंद या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी विभागात सिनेमाला नामांकन प्राप्त झालं असून, येत्या १० एप्रिलला मॉस्को येथे हा महोत्सव रंगणार आहे. मॉस्कोपूर्वी या सिनेमाची ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्येही निवड झाली आहे.

आठ वर्षांनी पुनरागमन…

फिटनेस फ्रिक अभिनेता भूषण प्रधान तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करतोय. खरंतर, मालिकेत काम करण्यासाठी आव्हानात्मक भूमिकेच्या भूषण प्रतिक्षेत होता, असं तो सांगतो. अखेर, आगामी ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेच्या माध्यमातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वराज्य स्थापनेसाठी झटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या मालिकेत भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणार आहे. छत्रपतींची व्यक्तिरेखा साकारण्याच अनेकांचं स्वप्न असतं, ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेच्यानिमित्ताने भूषणची स्वप्नपूर्ती होतेय. भूषणला या नव्या मालिकेत बघण्यासाठी त्याचा चाहतावर्गही उत्सुक आहे.     

Share your valuable opinion

%d bloggers like this: