रानभाषेचं प्रेक्षकांना कुतूहल – अरुणा जोगळेकर

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सत्यवान सावित्री हि मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील सत्यवानाची बोलीभाषा हि वेगळी असली तरी त्यात एक गोडवा आहे.या मालिकेचे सांवाद अरुणा जोगळेकर या लिहीत असून त्यांच्यासाठी सत्यवानाच्या बोलीभाषेत संवाद लिहिणं सर्जनशील काम असल्याचं त्या सांगतात. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “सत्यवान सावित्री या मालिकेचे संवाद मी लिहीत असून मालिकेत रानातल्या लोकांसाठी जी रानभाषा वापरण्यात आली आहे त्याबद्दल मला अनेक अनेक जण कुतूहल म्हणून प्रश्न विचारतात. हि भाषा सगळ्यांना खूप आवडतेय. हि भाषा कशी सुचली असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ज्यावेळी हि मालिका करायची ठरवली तेव्हा राजवाडा राजधानीची वेगळी भाषा आणि रानातली वेगळी भाषा असेल असं ठरलं. महाराष्ट्रात सुद्धा ८ मैलावर भाषा बदलतात. प्रांताप्रांतात वेगळ्या भाषा आणि त्यांचा वेगळा लहेजा असतो. सत्यवान आणि सावित्रीचा काळ वेगळा होता त्यामुळे कुठल्याही प्रांताची भाषा आम्हाला वापरायची नव्हती त्यामुळे जशी एखादी कविता सुचावी तशी मला हि भाषा सुचली आणि टीमला देखील हि वेगळी भाषा चांगली वाटली. यात अनेक वेगळे शब्द आहेत जे आता प्रेक्षकांच्या देखील अंगवळणी पडले आहेत. रानातल्या निर्मळ जिनशैलीवर नागरी जीवनाची सावली पडलेली नसते, त्यामुळे तिथली भाषा कशी असावी? तर ओबढ-धोबड, थेट आणि निर्मळ पण तितकीच गोड. कारण रानातली माणसं हि पशु पक्षांच्या, प्राण्यांच्या, नदी-ओढे यांच्या सानिध्यात राहतात त्यामुळे तिथले नाद देखील त्यांच्या भाषेत असतात. हे सगळं मी त्या भाषेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांना हि भाषा कशी पेलेल हा संभ्रम होता पण सगळ्या कलाकारांनी हि भाषा खूप चांगली आत्मसात केली. आम्ही त्यासाठी शूटींगच्या आधी एक वर्कशॉप घेतलं आणि त्यात कलाकारांना हि भाषा शिकवली.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: