STAR OF THE WEEK- NIKKHHIL CHAVAN
प्लॅनेट मराठी सादर करत आहे
“स्टार ऑफ द वीक”
ह्या नव्या सेगमेंट मध्ये जाणून घ्या अभिनेता निखिल चव्हाण बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी.मराठी मालिकांमधून आपल्या भेटीला येऊन रसिकांच्या मनात घर करून राहिलेल्या “लागीरं झालं जी” या मालिकेतील
“विक्या”
चित्रपट, मालिका, नाटक आणि नुकतंच वेब मध्ये पदार्पण करणारा निखिल चव्हाण!!
बॅकस्टेज आर्टिस्ट ते एक अभिनेता हा उल्लेखनीय प्रवास.
छोट्या पण लक्षवेधी भूमिका लिलया पार पाडणारा…
विक्या ते आताच्या वेब मधला सच्या….
१ ) इंडस्ट्री मधला बेस्ट अनुभव ?
तसे अनेक अनुभव आहेत पण ‘लागीर झालं जी’ च्या वेळी अनेक अनुभव यायचे. आऊट डोअर शूट असल्या कारणाने धम्माल मस्ती आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. इथे काम करताना आम्ही शूट करतोय अस कधीचं वाटायचं नाही. कामात असलेला मोकळेपणा इथे अनुभवला म्हणून हा बेस्ट अनुभव आणि पहिली मालिका असल्या मूळे सगळेच अनुभव छान होते.
२ ) इंडस्ट्री मधला बेस्ट मित्र ?
असं कोणाचं एकाचं नाव घेऊन इथे चालणार नाही काही बऱ्याच विश्वातली लोक मित्र सोबत असतात आहेत त्यामुळे मित्र परिवार खूप मोठा आहे. पण मला ज्या व्यक्तीने आयुष्यात घडवलंय अशी आवडती आणि खास व्यक्ती मित्र ‘तेजपाल वाघ’ मला अनेकदा समजून घेणारा, माझा बेस्ट बडी तेजा. आज मी त्याच्यामुळेचं इथे आहे.
३ ) आदर्श कोण आहे ?
खरंतर आपण प्रत्येक सहकलाकारांकडून अनेक गोष्टी नकळत शिकत असतो .
आपल्याला घडवणारी खूप लोक आपल्या आसपास असतात पण माझ्यासाठी माझा आदर्श दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. महेश सर माझ्यासाठी आदर्श आहेत त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकत आलो आहे. महेश सर हे माझ्यासाठी इंडस्ट्रीत आयडॉल आहेत.
४ ) कोणत्या ड्रीम कलाकार किंवा दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा आहे?
मला महेश मांजरेकर सरांच्या सोबतीने ड्रीम वर्क करायचंय.. त्यांच्या सोबत काम करण्याची खूप जास्त इच्छा आहे.
५ ) मालिका, चित्रपट, नाटक आणि आता वेब सीरिज या माध्यमांतून काम करताना येणारा अनुभव कसा आहे?
माझ नशीब एवढं चांगल आहे की मला प्रत्येक माध्यमातून काम करायला मिळतय .
माध्यम हे कुठलं ही असो काम करण्याची उत्सुकता हवी मग केलेलं प्रत्येक काम बेस्ट असतं , मला प्रत्येक कामातून नव्या गोष्टी शिकायला मिळतात अनेकदा नव्यांची उलगड होत जाते . प्रत्येक माध्यमातून काम करण्याचा अनुभव छान होता . वेब मधला अनुभव थोडा वेगळा आहे हल्ली आपल्याकडे वेव बघणार वर्ग सुद्धा खूप आहे , जेवढी लोक टीव्ही बघतात त्याच प्रमाणे ते वेब बघायला प्राधान्य देतात
.
६ ) आठवणीं मधला किस्सा किंवा कामाची पोचपावती ?
जेव्हा आपण एक कलाकार म्हणून काम करतो तेव्हा साहजिक पणे खूप आठवणी आहेत. पण एक आठवण की प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे मी आमच्या घरातल्या एका लग्नासाठी गेलो होतो तेव्हा आजूबाजूची सगळी लोक अगदी फोटो वैगरे काढायला आली पण या गडबडीत माझं आई बाबांना भेटणं राहीलं पण हे सगळं ते सुद्धा बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघणं भारी गोष्ट होती. कदाचित हीचं कामाची पोचपावती असते.
७ ) मालिका, चित्रपट, नाटक की वेब ?
अर्थातचं चित्रपट!! कोणत्याही कलाकारांच चित्रपट करण्याचं एक स्वप्न असतचं..
एवढं सगळं असताना अनेकदा वेगळया कामाची जवाबदारी आपल्यावर येते. यंदाच्या गणपती मध्ये जल्लोष गणरायाचा हा कार्यक्रम मला होस्ट करायचा होता तेव्हा मला येणाऱ्या प्रत्येक कलाकारांचा बारकाव्याने अभ्यास करायला लागायचा. इथे स्क्रिप्ट नव्हती त्यामुळे खूप विचार करून प्रश्न तयार करायला लागायचे हा नवखा अनुभव होता. नाटक आणि मालिकांच्या सोबतीने मला निर्मिती सुद्धा करायची आहे हे कितपत जमणार आहे हे ठाऊक नाही पण आयुष्यात निर्माता होण्याचं स्वप्न आहे.
महाराष्ट्राच्या या उभरत्या कलाकाराला प्लॅनेट मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा !
Long way to Nikhil. Stay focused.
Nikhil sir is very hard working person he accept any challenge n he done very softly he is amazing actor actually I have no words for him coz I can’t describe his on Words i m Nikhil sir’s big fan he have worlds best Smile
You deserve it, go for it….
All the best Nikhil 😊😊😊
Nice work Nikhil keep it up. a good person
Tons of best wishes from all of us,keep the Josh high 🙌💃
You are really doing a great work nikhil…I hope in future you will on the top of the edge..Best of luck..