Akshay Sansare- Capturing Golden Moments

entertainment

नुकत्याच पार पडलेल्या २०१९ मधल्या हाय प्रोफाईल लग्न सोहळ्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे . “अमिताली” यांच्या शाही विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. कला, राजकीय, उद्योजक, बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी, क्रीडा अश्या अनेक क्षेत्रातली नामवंत लोक या लग्नाला आवर्जून उपस्थित होते.

अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडे यांच्या आयुष्यातला हा अनोखा आणि खास दिवस आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी एक खास व्यक्ती आली होती. ही संधी ज्या तरुण फोटोग्राफरला मिळाली त्याच्या सोबत आम्ही काही खास बातचीत केलीये.. आणि या लग्नातील काही इंटरेस्टिंग किस्से त्याने आपल्या सोबत शेयर केलेत.. 

जाणून घेऊयात “अक्षय संसारे” ह्या वेडिंग फोटोग्राफर कडून…


२०१९ या नवीन वर्षातलं पहिलं एवढं मोठं काम.. कसा होता अनुभव?? 
आयुष्यात काही मागितलं आणि त्यापेक्षा अधिक मिळालं अशा स्वरूपाचा कायम लक्षात  राहणारा असा अनुभव होता.
गेल्या ९ वर्षातली ३०० हून अधिक वेडिंग शूटची जवाबदारी अगदी लिलया पेलली आहेस… काय सांगशील ह्या प्रवासा बद्दल?? 
     खूप सुरुवातीला जेंव्हा मी वेडिंग फोटोग्राफी ला सुरवात केली तेव्हा मी वर्षाला ५० – ६० लग्न समारंभ शूट करायचो. तेव्हा कॅण्डीड आणि सिनेऑटोग्राफी अस्तित्वात आली नव्हती. पण मी तेंव्हा अश्या प्रकारचे पारंपरिक शूट थोडं माझ्या परीने वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचो. त्या नंतर कॅण्डीड आणि सिनेऑटोग्राफी ची सुरुवात फोटोग्राफी मध्ये सुरू झाली. तेव्हा भारतात अगदीच एखादी व्यक्ती या पद्धतीचा वापर करायची. तेंव्हा या क्षेत्रातील माझा छंद वाढू लागला. त्यानंतर मी शूट करण्याचं प्रमाण थोडं कमी केलं आणि प्रत्येक लग्नकार्या च्या फोटोग्राफी ला वेळ देऊन त्यावर अगदी बारकाईने काम सुरु केलं. यातून अनेक पैलू उमजत गेले पण माझ्या कामाची पद्दत आणि कामाची रचना बदलत गेली. माझ्यासाठी आहे तेच काम होत पण रोज नवख्या तऱ्हेनं त्यावर काम करण्याची सवय लागली.


फोटोग्राफी हा अनेकांच्या खास आठवणींचा दस्तऐवज असतो त्या आठवणी टिपण्यासाठी तू वेगळे असे काय धडे घेतोस?
  मी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी त्यांचा सोबतीने बोलून त्यांच्या काही गोष्टी ऐकून घेतो ज्या पुढे मागे मला शूट करताना उपयोगी येतात. अनेक वेगळ्या फोटोग्राफी कॉन्फरन्स, आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर चे फोटोग्राफी संदर्भात कार्यशाळांना आवर्जून जातो. तिथे खूप नव्या गोष्टी मला शिकायला मिळतात. त्यांचा वापर माझ्या कामात करतो त्यामुळे प्रत्येक दोन वर्षात स्वतःला पुन्हा वेगळ्या तऱ्हेने काहीतरी भन्नाट काम करण्यास मला या सगळ्यांची मदत होत असते. यामुळे प्रत्येक जोडप्याला माझ्या कडून काही तरी अद्वितीय असं काम बघायला मिळत.  मी अनेक क्रीएटीव्ही लाइव्ह सारख्या वेबसाईट, ऑनलाइन धडे यातून घेण्याचं काम करतो. शक्य तेवढे असे अनेक फोटोग्राफीसाठी धडे घेत असतो.  
एक वेडिंग फोटोग्राफर म्हणून काम करताना कोणत्या गोष्टी “बॅक ऑफ द माईंड” असतात?
  एक गोष्ट सदैव माझ्या मनात असते ती म्हणजे जरी आपण वर्षाला २० वेडिंग शूट करतोच पण प्रत्येक कपल साठी त्यांच ते लग्न एकदाच होणार असत त्यांच्या आयुष्यातले ते खास क्षण टिपण्याची जवाबदारी माझ्यावर असते. ते सुंदर क्षण पुन्हा कधी येणार नसतात म्हणून अगदी छोटयातले छोटे क्षण त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या भावना तेव्हाच टिपता येतात. हा प्रत्येक कमालीचा लहान क्षण मला वेगळ्या आणि हटके पद्धतीने कॅमेरा बद्ध करायचा असतो . वेडिंग फोटोग्राफीचं का? ह्या साठी काही वेगळं फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं होतस का?
      मी इतर कुठल्याही क्षेत्रात पदवी घेऊ शकलो असतो. आता जेवढे पैसे कमवतो त्यापेक्षा खूप जास्त पैसे कमवू शकलो असतो पण तरीही मी वेडिंग शूट करतोय. कारण वेडिंग शूट मला खूप काही देऊन जातं. अनेकांच्या आयुष्यातल्या खास आठवणी टिपता येतात त्यांच्या जीवनाच्या कथा अनोख्या पद्धतीने ऐकायला आणि अनुभवायला मिळतात.  आम्ही जे काम करतो , त्यासाठी आम्हाला खूप छान शुभेच्छा मिळतात , लोकांचं प्रेम मिळत त्यांना आमचं काम आवडतं यातून मिळणारा आनंद माझ्यासाठी सर्वस्व आहे ! जे  इतर कोणताही पेशा हा “आनंद” आम्हाला देऊ शकत नाही .  हा होणारा आनंद आम्हाला  कुठल्याही पैशात विकत नाही घेता येत म्हणून त्यांचे  मिळणारे  आशीर्वाद  , प्रेम हीच आमच्या कामाची पोचपावती आहे .

तुझी “अमिताली” च्या वेडिंग फोटोग्राफीसाठी निवड कशी झाली? 
राज ठाकरेंनी त्यांच्या मीडिया व्यवस्थापकावर फोटोग्राफर शोधण्याची जवाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यांच्या मीडिया व्यवस्थापकांनी या संदर्भात मला फोन केला. मग अमित ठाकरे  आणि मिताली बोरुडे  यांच्या सोबत  कृष्णकुंज  वर  भेट झाली आणि त्यांना माझं काम आवडलं आणि ही अनोखी संधी मला मिळाली.


शब्दांकन : नेहा कदम 

Advertisements

Share your valuable opinion