नाटक, चित्रपट ते मालिकांमधून उल्लेखनीय कामगिरी…
बालकलाकार ते हरहुन्नरी अभिनेता…
मराठी बिग बॉस मधला अनोखा खेळाडू….
दुनियादारी ते क्लासमेट चित्रपटवारी….
अभिनय ते राजकारण….
मी नथुराम गोडसे बोलतोय, बहुरूपी पुलं, नाट्यकलाकारी...
स्वागत करू या आठवड्याच्या
प्लेनेट स्टार ऑफ़ द वीक चा
सुशांत शेलार
- लहानपणा पासूनचं या क्षेत्रात आहेस तर काय वेगळा अनुभव आहे?
आपली आवड ज्या क्षेत्रात आहे तिथे काम करून करियर घडवणं हे प्रत्येकाच स्वप्न असत. मला ही संधी मिळाली आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळतंय यातच सगळं सुख आहे. आवड हे करियर होणं आणि त्यातच सात्यत्याने नव्या प्रकारे काम करत राहणं ही फार भाग्याची गोष्ट आहे.
2. नाटक, मालिका आणि चित्रपट या सगळ्या माध्यमातून कामं केली आहेस तर काय वेगळपण आहे कामाचं? सर्वात आवडतं माध्यम?
तिन्ही माध्यम आवडीची आहेत. प्रत्येक माध्यम हे वेगळं आहे. कारण मालिका, चित्रपट आणि नाटक या सगळ्याच माध्यमाचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. कामाची पद्धत वेगळी असते हे वेगळेपण अनुभवायला मिळतंय. लोकांची प्रत्येक कामासाठी मिळणारी दाद आणि प्रतिसाद हा खूप मोलाचा असतो. चित्रपट हा अजरामर असतो तो कित्येक वर्ष आपल्याकडे टिकून राहतो. नाटक हे माध्यम वेगळं आहे कारण नाटक दरवेळी वेगळं भासतं. नाटक हे एक असलं त्याचे खूप प्रयोग झाले तरी प्रत्येक प्रयोग हा नवखा असतो. नाटक हा एक लाइव्ह अनुभव असतो आपल्या डोळ्यासमोर काही तरी घडतंय आणि आपण ते पाहतोय म्हणून नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा यासाठी अनोखा असतो. तिन्ही माध्यमातून काम करणं सुद्धा तेवढच मस्त आहे.
3.नव्या नाटका विषयी काय सांगशील?
मला या नाटकात विनोदी भूमिका करायला मिळाली आहे तर ही एक अभिनयाची वेगळी बाजू लोकांना समजते आहे. मी विनोदी भूमिका सुद्धा करतो हे या निमित्ताने लोकांना समजलंय. प्रत्येक वेळी नाटकात काम करण्याचा, लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येतात. नाटक संपल्या वर ही दाद आणि पोचपावती अनोखी असते.
ekach pyala Mr & Mrs. Landge
4. बिग बॉस मराठी या रिऍलिटी शो चा अनुभव कसा होता?
खूप भन्नाट अनुभव होता. मी या आधी कधी बिगबॉस पाहिलं नव्हतं. गेलो खेळलो पण मी मध्येच गेम सोडून आलो याच फार वाईट वाटलं.
5. इंडस्ट्रीत आवडणारी व्यक्ती किंवा बेस्ट फ्रेंड?
खूप आहेत असं एका कोणाचं नाव सांगणं कठीण आहे . अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी आणि संजय जाधव हे तिघे फार जवळचे मित्र आहेत.
6. अभिनयाच्या सोबतीने एखादी अशी गोष्ट जी फार जवळची आहे?
शिवसेना ( राजकारण )
7. इंडस्ट्रीत ड्रीम वर्क कोणासोबत करायचं?
इंडस्ट्रीत ड्रीम वर्क अमिताभ बच्चन सरांसोबत करायचं.
8. भविष्यात निर्माता तसेच दिग्दर्शक होण्याचा काही मानस?
मी या आधीच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय लवकरचं दिग्दर्शन सुद्धा करेन.
9. एक अनुभवी कलाकार ह्या कलावंत ह्या नात्याने अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या होतकरू कलावंतांना काय सांगशील?
ही इंडस्ट्री फार मोठी आणि अनुभवी लोकांनी समृद्ध अशी आहे इथे येण्याचं अनेकांच स्वप्न असतं त्यांना एवढचं सांगेन की खूप जास्त सिरीयस होऊन काम करा. हल्ली कोणालाही वाटत की आपण कलाकार होऊ पण इथे कष्ट करून नाव कमावत येत त्यामुळे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून इथे यावं एवढचं सांगेन.
10. सक्रिय राजकारणात प्रवेश करावासा वाटतो का? आणि केल्यास कोणत्या पदावर विराजमान व्हायला आवडेल?
आधीच राजकारणात प्रवेश झाला आहे. माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही. मी चित्रपट आणि नाट्य परिषेदेच्या मंडळात आहे त्यामुळे लोकांना मला मदत करायला आवडते. राजकारण करण्यापेक्षा समाजकाराण करायला आवडेल. लोकांना माझ्या कामातून मदत व्हावी हीच इच्छा आहे.