हल्ली कुठलाही कलाकार हा त्याच्या फॅशन वरून फार जास्त ओळखला जातो. त्याच्या फॅशनची चर्चा सगळीकडे सुरूच असते. पण त्यांच्या एवढ्या हटके फॅशन लुक मागे त्यांच्या अनेक फॅशन डिझायनर्सची मेहनत असते. प्रत्येक कलाकाराला एवढं कूल, बोल्ड आणि अनोखा लुक देऊन त्यांचे ड्रेसिंग करण्यात फॅशन डिझायनरचा मोलाचा वाटा असतो. लग्न, किंवा अनेक अवॉर्डस समारंभ. प्रत्येक कलाकार हा कसा आणि कोणत्या प्रकारे छान दिसू शकतो, त्यांना कुठल्या रंगांचे कसे कपडे छान उठून दिसू शकतात या सगळ्याचा विचार करून हे ड्रेस डिजाईन केले जातात.
मराठी सिनेइंडस्ट्रीत सुद्धा असेचं काही तरुण, नवखे डिझायनर अनेक कलाकारांच्या फॅशन डिझायनरची जवाबदारी लिलया पार पाडतात.
मराठी सिनेइंडस्ट्रीत अनेक कलाकारांची फॅशन डिझायनर अशी जिची ओळख आहे अशी शिवानी पाटील..
सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, गौरी नलावडे, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, मृणाल ठाकूर, अमृता खानविलकर, या सारख्या कित्येक बड्या सेलेब्रिटीची ही हक्काची डिझायनर आहे.
Designed by Shivani Patil
प्रत्येक कलाकारांला हटके आणि अनोखा लुक देण्याचा शिवानी नेहमीच प्रयत्न करते. शिवानी तिच्या या अनोख्या प्रवासा बद्दल सांगताना बोलते “गेली तीन वर्षे मी अनेक व्यक्तींसोबत इंडस्ट्रीत काम करतेय. हा प्रवास कमालीचा सुंदर आहे. इथे अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक व्यक्तींसोबत काम करताना त्यातुन नव्या गोष्टी उलगडत जातात. मी नेहमीच माझ्या रीतीने काहीतरी अनोखं देण्याचा प्रयत्न करत असते. ट्रेंड्स नुसार प्रत्येक ड्रेस डिजाईन करणं हा एक टास्क असतो त्यात अनेक कलाकार आपल्यावर विश्वास ठेवतात मग त्यामुळे काम करताना ते बेस्ट व्हायला हवं याकडे माझा कल असतो”
शिवानी पाटील सारख्या अनेक डिझाईनर आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे यातली एक “तृषाला नायक” जाणून घेऊ या तिच्या बद्दल..
आपल्या सगळ्यांची लाडकी फुलपाखरू फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे, सायली संजीव, गायत्री दातार, मिताली मयेकर, ललित प्रभाकर आणि नुकतंच प्रार्थना बेहरे या सगळ्या कलाकार मंडळी च्या सोबतीने अनेकांना अगदी आखीव रेखीव आणि कूल, थोडं पारंपरिक टच देऊन आपल्या कामात विविधता घेऊन तृषाला नायक ही सगळ्यांसाठी फॅशन डिझायनिंग करतेय. तृषाला ही तरुण डिझाईनर तिच्या स्टायलिंगचे किस्से सांगताना म्हणते “स्टायलिंग खरंतर फार सोप्पं आणि पटकन होणार काम वाटत पण ते खरंच फार कठीण आहे. कामापेक्षा आपल्यावर जवाबदारी आणि आपण कोणत्यातऱ्हेने समोरच्याला आपलं काम समजावून सांगतो आहोत यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. स्टायलिंग करताना नेहमीच नव्या गोष्टी शिकायला मिळतात. नवे लुक्स ट्राय करायला मिळतात आणि मग यामुळे आपल्याला कामातील कुशलता समजत जाते. भन्नाट आणि अनोखं काय करावं हे स्टायलिंग मूळे समजतं. यामुळे अनेक कलाकारांच्या सोबतीने त्यांची आवड निवड जपत त्यांना काय छान दिसेल किंवा त्यांना कोणत्या इव्हेंट्स साठी कपडे डिजाईन करायचे आहेत यासाठी विचार करावा लागतो आणि हे काम करण्यात आनंद आहे म्हणून माझ्यासाठी हे काम बेस्ट आहे”
मराठी सिने इंडस्ट्री सोबत अनेक दिग्गज व्यक्तींच्या ड्रेसिंग डिजाईन करण्याची संधी जिला मिळाली अश्या “प्रांजल कडकडे” आपल्या कामाबद्दल आपल्याला सांगतात काही खास गोष्टी…
लोकांच्या जीवनातला स्टाईल हा अविभाज्य घटक असतो. स्टाईलला थोडं वेगळ्या शैलीत उभारण्याचं काम करतेय प्रांजल कडकडे. पारंपरिक, स्टायलिश, फंकी, मोहक असे कपडे डिजाईन करण्यात हीचा मोलाचा वाटा आहे. उर्मिला कोठारे, सोनम कपूर, सुयश टिळक, गोविंदा, उमेश कामत, निखिल राजशिर्के, तेजश्री प्रधान, मनीष पॉल, अभिजीत खांडकेकर, अश्या अनेक सेलेब्रिटी मंडळींसाठी हिने आजवर फॅशन डिजाईनर म्हणून काम केलंय. सोबतीने आज प्रांजल चा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे या बद्दल ती सांगते “गेली पाच वर्षे मी हे काम सत्यत्याने करतेय ‘प्रांजल कडकडे’ हा ब्रँड होण माझं स्वप्न होत ते पूर्ण झालंय याचा आनंद आहे. या एवढ्या वर्षात मी खूप काही शिकले आहे जवळपास १० फॅशन शो केले. ओळखी वाढत जाऊन मराठी, हिंदी, पंजाबी कलाकारांसाठी डिजाईन करायला सुरुवात झाली लोकांच्या विश्वासातुन आज हे काम अगदी लिलया होतंय यात सुख आहे”
शिवानी पाटील, तृषाला नायक आणि प्रांजल कडकडे यांच्या सारख्या तरुण फॅशन डिजाईनर आपल्याकडे आहेत. यांच्या कामातली विविधता आणि कामाचे अनोखे पैलू आपल्याला त्यांच्या कामातुन पाहायला मिळतात. या पुढे सुद्धा यांच्या कामाची जादू आपल्याला बघायला मिळेल आणि या तिघी अशीच त्यांच्या कामात भरभराट करत राहतील. त्यांच्या पुढील वाटचाली साठी त्यांना प्लॅनेट मराठी कडून मनःपूर्वक शुभेच्छा..
Shivani Patil Trushala Nayak Pranjal Kadkade
Designed by : Shivani Patil