महाराष्ट्रीयन संस्कृती आणि जेवणाचा थाट आणि अस्सल चव तुम्हाला अनुभवायची असेल तर हा लेख नक्की वाचा..
आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि परंपरा जपण्याचा अनोखा प्रयत्न अनोख्या ठिकाणी केला जातोय. नवी मुंबई मधे असलेल्या या हॉटेल मध्ये जेवणाची पारंपरिक पद्धत थाटात पार पडतेय.. “राजमान्य” या हॉटेल मध्ये हा जेवणाचा अनोखा उत्सव साजरा केला जातो. आम्ही इथल्या काही खास पदार्थांबद्दल जाणून घेतलंय….
नवी मुंबईतील वाशी इथे असलेलं हे “राजमान्य ” !
नवी मुंबईतील वाशी इथे असलेलं हे “राजमान्य” खव्ययेगिरी
करणाऱ्या लोकांना आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हे हॉटेल
स्थापन करण्यात आलंय. आपल्याकडे असलेली खाद्य संस्कृती आणि पारंपारिक
पदार्थांची अस्सल चव इथे चाखायला मिळतेय. आपल्या समृद्ध आणि विविध
पारंपारिक पदार्थांचा ठेवा जपण्यासाठी हा अनोखा थाट इथे मांडला गेला आहे.
येणाऱ्या प्रत्येक खवय्याच् अगदी मराठमोळ्या तुतारीने स्वागत करून
त्याचं आदरातिथ्य केलं जातं. कदाचित हाच राजमान्य चा अनोखा थाट आहे असं
म्हणायला हरकत नाही.
“थाट जेवणाचा , महाराष्ट्र संस्कृतीचा” ही अनोखी संकल्पना आपल्या समोर घेऊन आलेयत “राजमान्य” हॉटेल…
इथे
तुम्हाला अनेक अस्सल आणि पारंपरिक पदार्थ चाखायला मिळतात. कोल्हापुरी,
कोंकणी, तुळजापूरी, पुणेरी, नागपुरी, कोळी, आगरी आणि मालवणी अश्या
महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृतीचे पदार्थ एकाच ठिकाणी खायला मिळतात.
नुकताचं इथे “थाळी महोत्सव” अगदी उत्साहात पार पडला. थाळी महोत्सवात अनेक थाळीचा साज होता यात नागपुरी (सावजी थाळी), कोल्हापुरी, पुणेरी, महाराष्ट्रीयन, एवढ्या थाळींची चव अनुभवायला मिळाली.
सावजी चिकन-मटण, सूप, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, तुळजापूरी झणझणीत चिकन-मटण, कोंकणी मासे, मालवणी स्पेशल कोंबडी वडे, सोलकढी आणि बरंच काही अशी एकदम पारंपरिक चव इथे आल्यावर अनुभवयाला मिळते
नुसतं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटेल एवढया पदार्थांची रेलचेल इथे आहे. पुरणपोळी आणि कटाची आमटी, भात आणि कुरडई हा अस्सल मेनू सुद्धा इथे चाखायला मिळतो.. आणि तुम्हाला इथे एवढी विविधता मिळते की मेनू कार्ड बघून आपण चक्रावून जातो. गोडाला खास आणि हटके पुरणपोळी, मोदक, तिळगुळ पान, आईस्क्रीम सुद्धा खायला मिळतं.
शाकाहारी आणि मांसाहारी खाणाऱ्यांना “राजमान्य” ही एक पर्वणी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला आणि या अनोख्या मेजवानीचा आस्वाद घ्यालाय इथे नक्की जाच्…!!!!!