आयुष्यात अनेक संकटांवर मात करून अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन त्याने त्याच्या जिद्दीच्या जोरावर खूपमोठं यश प्राप्त केलंय. जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आयुष्यात आलेलं शारीरिक अपंगत्व यांच्यावर हसत हसतमात करून त्याने खूप काही कमवलंय. त्याची हि अनोखी संघर्ष गाथा त्याला पीएचडीच्या यशस्वी पायरी पर्यंत घेऊनगेली. “परीक्षित शहा” याने अख्या जगाला दाखवून दिलंय कि कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन जग जिंकता येतं.परीक्षित ला जन्मतःच शारीरिक अपंगत्व आलंय. पण त्याने त्याच्या इच्छाशक्ती यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलंयआणि आज त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून एक वेगळी ओळख निर्माण केलीआहे. हा प्रेरणादाई प्रवास आपण परीक्षित कडून जाणून घेऊ या….
“परीक्षित शहा” याने अख्या जगाला दाखवून दिलंय कि कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन जग जिंकता येतं. परीक्षित ला जन्मतःच शारीरिक अपंगत्व आलंय. पण त्याने त्याच्या इच्छाशक्ती यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलंय आणि आज त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा प्रेरणादाई प्रवास आपण परीक्षित कडून जाणून घेऊ या….
मला जन्मापासूनचं Osteogenesis Imperfecta आजार आहे त्यामुळे मला शारीरिक अपंगत्व आलंय. पण मला शिकायचं होतं ही एक मनापासून ईच्छा होतीच की आपण शिकू या आणि काही तरी करूया. मग शिक्षण सुरू झालं ४ वर्ष गुजरात मध्ये प्राथमिक शिक्षण, त्यानंतर वडिलांचं निधन झाल्यानंतर मी पनवेल ला आलो इथून पुढे शिक्षण सुरू राहिलं .
मग त्यानंतर MA इकॉनॉमिक्स साठी ऍडमिशन घेतलं. मुंबई विद्यापीठाच्या पीइटी परीक्षेत पास झालो आणि आता पुन्हा नव्या प्रयत्नशील यशा सोबत पीएचडी ची प्रवेश प्रकिया यशस्वीरीत्या पार केली या सोबतीने सध्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, बुक review ची कामे सातत्याने चालू आहेत. इथेच नं थांबता मी आणि माझा गुवाहाटी इथला मित्र “चिन्मय शर्मा” दोघे मिळुन डिजिटल मीडियासाठी काम करतोय. संपूर्ण दिवस याचं कामात मन लावून याचं क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे. तसेच मी ब्लॉगिंग आणि अर्थशास्त्रावर लेख लिहितो. एकदा पीएचडी झाल्यावर मी प्रोफेसर किंवा लेक्चरल या कामाचा विचार करतोय पण सध्या सगळा वेळ हा डिजिटल मार्केटिंग आणि पीएचडीच्या रिसर्च यांच्या कामासाठी वापरतोय. भविष्यात यातचं पुढे काही तरी करण्याचा प्रयत्न आहे.
या सगळ्यात मला माझ्या आईने आणि वडिलांनी फार सहकार्य केलं. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी जवळपास एक वर्षा आधी पासूनच तयारी सुरू केली. जेंव्हा सरकारने मला विशेष परवानगी देण्यासाठी नकार दिला तेव्हा गुजरात हायकोर्टात जाण्याची त्यांची तयारी आणि हिंमत त्यांनी दाखवली. अभ्यासा व्यतिरिक्त पण इतर स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आई पूर्ण तयारी करून द्यायची. जामनगर आणि पनवेल इथल्या शिक्षणासाठी वि. के. हायस्कूल आणि CKT कोलेज येथील शिक्षक, प्राध्यापक तसेचं इतर लोकांचा खूप सहकार्य लाभलं.
आम्ही अजून मावशीच्या घरात राहतोय आणि त्या शिवाय मामाचा पण सपोर्ट आहे. १० वी नंतर मीडिया मुळे मी प्रकाश झोतात आलो तेव्हा अनेक लोकांनी मदत केली आज मी जो काही आहे तो सगळ्यांचा पाठिंबा लाभल्यामुळे. मला कधीचं कसली खंत जाणवली नाही. कारण जी परिस्थिती आहे त्यावर मात करून काय करता येईल यावर माझं लक्ष असतं. माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून नेहमीच सहकार्य मिळतंय. त्यांच्या सहकार्यामुळे इथवर पोहचलो त्यासाठी त्यांचे आभार
आजवरचा प्रवास हा फार उत्तम आहे. अनेक लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं. एखाद दुसरा वाईट अनुभव आलाय पण प्रत्येक अनुभव शिकवून जातो. सुरुवातीच्या काळात मी काँग्रेसच्या volunteers ग्रुप मध्ये काम केलं तिथे अनेकांसोबत ओळख झाली. मग बुक review वैगरे करायला सुरुवात केली. दोन पुस्तकांचं अनुवादन केलं. ब्लॉग्स लिहायला लागलो. लोकांनी पसंती दर्शवली, मार्गदर्शन केलं. मी “बिगबॉस” मधल्या माझ्या आवडत्या स्पर्धकावर ब्लॉग लिहिला त्यांनी ते वाचून त्याला उत्तरं दिली. सध्या राजकीय पक्ष आणि बॉलीवूड मधल्या काही लोकांचं इंटरनेट मार्केटिंगसाठी काम करतो तेंव्हा त्यांना जवळून अनुभवायला मिळतं. त्यांच्याकडून नेहमीच माझ्या कामाला दाद मिळते. माझ्या अनुभवांना आणि कामाला मिळणारा प्रतिसाद यामुळे मी खुपचं खुश आहे.