इन्फोसिस सारख्या नामवंत कंपनीत आयटी क्षेत्रात जवळपास १३ वर्ष माहिती तंत्रज्ञान म्हणून काम केलं आणि मग एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. विमानात आणि बाहेरच्या देशात मराठी पदार्थांची जाणवणारी चणचण लक्षात घेता आपण मराठी पदार्थ आणि मराठी हॉटेल चालू करावं या विचारातून “पूर्णब्रह्म” या उपहारगृहाची निर्मिती त्यांनी केली. “इंटरनॅशनल वुमन्स डे” निमित्त हा प्रवास त्यांच्यासाठी कसा होता हे जाणून घेऊ या पूर्णब्रह्म च्या व्यवस्थापिका संचालिका “जयंती कठाळे” यांच्याकडूनचं…
“पूर्णब्रह्म” चा प्रवास हा काही सोप्पा प्रवास नव्हता. यात दृढ निश्चय आणि स्वप्न साकार करण्याची जिद्द यांचा सुंदर मेळ म्हणजे “पूर्णब्रह्म”.
ही एक मस्त सांगड आहे यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आई बाबांनी दिलेले संस्कार आणि नवऱ्याने दिलेलं बळ या दोन्ही गोष्टींनी पूर्णब्रह्मचील सांगता झाली आहे. सोबत मनिष शिरासराव सारख्या मित्रांशी पडते तेव्हा पूर्णब्रह्म साकार करण्याची आणखी मज्जा येते. स्वावलंबन, स्व:कर्तुत्व, स्व:जिद्दी अश्या अनेक संस्कारानी पूर्णब्रह्म घडत गेलं. प्रचंड भुकी असल्याने माझं मराठी जेवण अवघ्या जगभरात नेण्याची भूक माझ्यात आहेत म्हणून हा प्रवास झाला. पण सुरुवात केली मोठ्या स्वप्नांनी.
संपूर्ण जगभरात ५००० मराठी पूर्णब्रह्मच्या शाखा उभ्या करायच्या आहेत. कारण जर १८,००० डॉमिनोज उभे राहू शकतात तर ५००० पूर्णब्रह्म उभे राहायला काय समस्या आहे. परदेशात मराठी जेवण घेऊन जाणं हा विश्वास आणि विचार यांचा मेळ होणं गरजेचं होतं. हे करता येईल हे फार सोप्पं गणित आहे. म्हणजे बघा फ्रनचायजी मॉडेल मध्ये तुम्हाला प्रिझर्व्हव्हेटिव्ही फूड मिळतं पण आमच्या मुख्य उपहारगृहात आम्ही चेफ ना स्वतःहून शिकवून बाहेरच्या देशात पाठवतो आणि आपल्याला गव्हर्नमेंट कडून यासाठी मदत देखील मिळते हा एक आनंद आहे. हा विश्वास, आशिर्वाद तुमच्या सारख्या लोकांचा आहे म्हणून पूर्णब्रह्मची पूर्ती करण्यात माझे पाय कधीच थकत नाही.
माझ्या आजीचं वाक्य आहे “जरी पंतप्रधान झाले तरी घर सोडायचं नाही हां, घरात आपल्याला आपल्या लोकांसाठी स्वयंपाक बनवायचा असतो” तर तात्पर्य हे होतं की लक्ष घराकडे ही असावं. एखादा गरुड जेव्हा उंच भरारी घेतो तेव्हा त्याचं लक्ष पिला बाळाकडे सुद्धा असतं. घर सांभाळताना व्यवस्थापन गरजेचं होतं. काही तरी हरवून जाणार ही तारेवरची कसरत. मी आणि प्रणव दोघांनीही यातून मार्ग काढत पुढे गेलो. योजना, त्या योजनेची नीट पणे आखणी करून एखादं काम हे नेहमी पूर्णत्वास जात.
“पूर्णब्रह्म” हे नाव माझ्या आजीने दिलंय. ती जेवताना एक स्तोत्र म्हणायची “अन्न हे पूर्णब्रह्म” या पूर्णब्रह्म च्या नावाखाली आम्ही एक ताट संपवलं तर आजी आम्हाला १ रुपया द्यायची, आणि ताट संपलं नाही तर शिक्षा सुद्धा असायची. त्या जेवणाची चव सुंदर असायची कारण आजीच्या हातचं जेवण असायचं हा एक संस्कार व्यवसाय मॉडेल म्हणून उभं राहिलं अस कधी वाटलंच नव्हतं. आज आजी हयात नाही पण तिने दिलेला शब्द जगभरात पोहचवला “पूर्णब्रह्म” हे आजची देणं आहे. त्यामुळे हॉटेल ला हेच नाव दिल.
“When your in Rome, behave like a Roman” ही नितीसुत्र आहेत का फक्त? आपण आपल्या रोजच्या आयुष्यात यांचा वापर करायला हवा. जेव्हा मी इन्फोसिस मध्ये काम करत होते तेव्हा स्कर्ट मध्ये होते, बहुधा पूर्णब्रह्मचा व्यावसायिक परिधान हा नऊवारी साडी आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र जागवतेय. मराठीपण नुसतच परंपरा म्हणून सांभाळायचं नसतं तर ते आत्मसात करायचं असत. माझ्यातल्या त्या स्कर्ट मधल्या जयंती ला तेव्हा टाटा करायची वेळ आली तेव्हा नऊवार वाल्या जयंती ने समोर येऊन तिची साथ दिली म्हणून जेव्हा मी पूर्णब्रह्मच्या कामात असते तेव्हा नऊवारीत असते.
लंडनच्या विमानतळावर एका आजीने ओळखलं भेटून गळाभेट घेतली, कौतुकाची थाप दिली आणि डोळ्यात अश्रू येऊन सांगितलं जे ६० – ७० वर्ष मी करायचा प्रयत्न करत होते ते तुझ्यात बघतेय पोरी, पूर्णब्रह्म ला खूप मोठं कर आपलं मराठी जेवण सगळ्यांपर्यंत पोहचव. तुझ्यासारखी अनेक मुलं या जेवणासाठी तडफड करतात या जेवणासाठी त्याची मनं आणि पोटं दोन्ही भर! माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. माझ्यासाठी ही सगळ्यात भावनिक आणि खूप आवश्यक असलेला आशीर्वाद होता.
स्त्री-पुरुष हा भेद नसतो. व्यवसाय करताना कुठेतरी धोका हा असतो आणि हा धोका पत्करुन व्यवसाय करायचा असतो. तेंव्हा दृढ निश्चय ठेवून हे करायला जमलं पाहिजे. खूप ताकदीने उभं रहावं लागत, प्रत्येक समस्येला संधीत रूपांतरीत करावं लागतं आणि सतर्क राहावं लागतं. जागरूकता, अश्या अनेक गुण-कौशल्यानी व्यवसाय पूर्णत्वास येतो. व्यवसाय करण्यासाठी हे काही गुण हे प्रत्येक स्त्री मध्ये असतात म्हणून स्त्री म्हणून रडत बसण्यापेक्षा स्त्री म्हणून जागरूकतेने उभं राहणं फार आवश्यक आहे. आपल्यातला प्रत्येक गुण ओळखून त्या कलेचा वापर करता येणं ही एक कला आहे यामुळे व्यवसाय अगदी डौलाने उभा राहतो.
सौजन्य : नेहा कदम