टेलिव्हिजन विश्वातली लक्षवेधी अभिनेत्री, एक मॉडेल ते अभिनेत्री हा अभिनय क्षेत्रातील प्रवास लिलया पार पाडणारी.
प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” च्या ह्या आठवड्यात जाणून घेऊया अनेक दर्जेदार मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची प्रभावी पणे छाप पाडणारी अभिनेत्री
“अक्षया गुरव”
“स्वतःच्या विश्वाची निर्मिती ”
करियरची सुरुवात मुळात हि मॉडेलिंग पासून झाली. घरातली कोणतीही व्यक्ती या क्षेत्रात नसून सुद्धा इथे येऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मॉडेलिंग करता करता ऑडिशन देत होते. रंगभूमीवर काम केलं. २ एकांकिका केल्या. एकांकिका करता करता २०१३ मध्ये एक शो केला मग मालिकेसाठी विचारलं गेलं. अगदी पद्धतशीर पणे त्या साठी ऑडिशन दिले मग त्या साठी निवड झाली ती माझी प्रमुख अभिनेत्री म्हणून पहिली मालिका “राधिका” … आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस करायचा होता मनात भिती होती. २०१४-१५ रोजी स्टार प्रवाह वर “मानसीचा चित्रकार” हि मालिका केली त्यात पुन्हा मुख्य भूमिका मिळाली. मग लव्ह लग्न लोचा नावाची मालिका केली. २०१६ मध्ये मी डीडी नॅशनल वर एक कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाची सूत्रसंचालक होते. आणिसध्या कलर्स मराठी वाहिनी वरील “राधा प्रेम रंगी रंगली” हि माझी चवथी मालिका. अश्या प्रकारे हा प्रवास स्वतःच्या जिद्दीवर आणि ध्येय ठेवून स्वतःच उभं केलेलं हे विश्व आहे. अजून खऱ्या अर्थाने प्रवास चालू होणार आहे आता कुठे टीव्ही वर काम करतेय. लवकरच चित्रपट करायचा आहे आणि मोठ्या पडद्यावर स्वतःला बघायला फार उत्सुक आहे.
“खंबीर पाठिंबा आणि घडत गेलेला प्रवास ”
मॉडेलिंग करताना खूप फिट राहावं लागतं आणि टेलिव्हिजन करताना कामाच्या वेळा या वेगळ्या असतात त्यामुळे तेवढं फिट राहणं शक्य नसतं. बाकी कामाच्या गडबडीत आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत. जेंव्हा मॉडेलिंग करत असतो तेव्हा संपूर्ण वेळ हा त्यासाठी दिला जातो. मला फक्त मॉडेलिंग करायचं नव्हतं मी रॅम्प शो, ब्युटी कॉन्टेस्ट केल्या आणि अचानक किंवा पटकन टीव्ही कडे वळले. या क्षेत्रात येण्याचं असं काही ठरलं नव्हतं. मला मॉडेलिंग करायचं होत कॉर्पोरेट जॉब करायचा होता. काहीचं न ठरवता या क्षेत्रात पदार्पण झालयं. माझ्या परिवाराचा पाठिंबा फार खंबीर होता आज त्यांच्यामुळे मी इथे आहे.
“कमर्शियल फिल्मस् करायला आवडतील”
मी झोया अख्तर, इमतीयाझ अली यांची खूप मोठी फॅन आहे. यांच्या सोबत चित्रपट करायला नक्कीच आवडेल. आपल्या मराठीत सतीश राजवाडे, नागराज मंजुळे, अवधूत गुप्ते यांच्या सोबत इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. “उत्तम स्क्रिप्ट सोबत वेब करायला आवडेल”
वेब सिरीज करायला नक्कीच आवडेल. आपण काळानुसार चालत आहोत हल्ली चा काळ हा वेब कन्टेन्ट आणि सिरीज चा आहे. वेब आता कुठे नावारूपाला येतंय. प्रेक्षक वर्ग वेब बघायला लागलाय हि एक चांगली गोष्ट आहे. नवख्या कलाकारांना हि एक संधी आहे. मनोरंजन करण्यासाठी नवा मंच उभा राहिला आहे. मला वेब सिरीज करायला नक्कीच आवडेल. पण सध्या चालू असलेल्या प्रत्येक सिरीज मध्ये बोल्ड सीन असतात. पण असे सीन करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठीत वेब कन्टेन्ट हा येतोय ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. वेगळ्या विषयासह मराठी इंडस्ट्री आपल्या समोर येत आहे. सुजय डहाकेची एक सिरीज पाहिली ती त्याने कमाल केली आहे.
“नवर्यासोबत अजून काम करायचं”
खरंतर आमच्या दोघांचा काम करण्याचा योग ५-६ महिन्यापूर्वी जुळून आला. आम्ही आजवर एकत्र काम केलेलं नाही. एकमेकांच्या सेटवर फार कमी जातो दोघे स्वतःच्या कामात असतो. नुकतीच त्याने एक हॉरर वेब सिरीज केली त्यात मी अभिनेत्री म्हणून काम केलं. आणि तो (भूषण वाणी) त्याचा डीओपी होता. अगदीच छोटा पण मस्त अनुभव होता. त्याची काम करण्याची पद्धत छान आहे. खूप शांत डोकं ठेवून तो काम पूर्ण करत असतो. समजुतीने काम करतो.
“खादाडी ते फिटनेस फ्रिक”
मी खूप फूडी आहे सेट वर जेवताना फार काही काही चमचमीत खायला मिळतं. मग अनेक सहकलाकारांचे डब्बे सेट वर शेयर होतात. मला कधी उशिरा शूट ला जायचं असेल तेंव्हा मी स्वतः जेवण बनवून नेते. मला खूप काही खायला आवडत पाणीपुरी किंवा कोणत्या ठिकाणी काय खास खायला मिळतं तिथल्या खाण्याचा गोष्टी एक्सप्लोर करायला मला प्रचंड आवडतात. पण मी आता लवकरच योगा आणि डान्स क्लास लावणार आहे. जसा मला वेळ मिळेल तसा खादाडी करून फिटनेस ठेवणं हे मी सांभाळून घेते. वर्क आऊट पेक्षा मला खाणं आणि झोपणं फार प्रिय आहे. या क्षेत्रात असल्याने फिट हे राहावंच लागतं.
“बोल्डनेस ला मर्यादा हव्यात ”
अर्थात अश्या तर्हेच्या बोल्ड भूमिका करायला आवडतील पण त्या बोल्डनेस ला सुद्धा माझ्या दृष्टीने काही मर्यादा असतील. एखादी बोल्ड भुमिका आलीच तर नक्की त्याचा विचार करेन. एखादा चांगला दिग्दर्शक किंवा डिओपी असल्यास मी काम करेन. माझा सहकलाकार कोण आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मी तेंव्हा तो निर्णय घेईन.
“प्रेक्षकांच प्रेम हा अवर्णनीय अनुभव”
अनेक अनुभव आहेत. लोक भेटल्यावर नेहमी सांगतात “अरे तू अशी नाही आहेस मग त्या मालिकेत का अशी वागतेस?? माझ्या सासूबाईंना सुद्धा अनेक जण विचारतात कि मी खऱ्या आयुष्यात सुद्धा अशीच वागते का? मग त्यावरून घरी फार मजेशीर किस्से घडतात. शिवाजी पार्कला रंगपंचमी खेळायला गेलो होतो तिथे एक लहान मुलगी आणि तिची आई माझ्या सोबत फोटो काढायला आली एवढा रंग लावून सुद्धा आपल्याला लोक ओळखतात त्यांना आपलं काम आवडतं हि मिळणारी कामाची पोचपावती असते. लोकं आपल्याला फॉलो करतात आणि आपल्यावर एवढं प्रेम करतात. अनेक जण येता जाता खूप कॉम्प्लिमेंट देतात. तर आज आम्ही जे काही आहोत ते फॅन्स मुळे आहोत त्यांच्या कडून आम्हाला काम करण्याची वेगळीच ऊर्जा मिळते.
“सणासुदीला सुट्टी हवी ”
इंडस्ट्रीत खुपणारी अशी कोणती गोष्ट नाही आहे फक्त सणासुदीला आम्हाला कोणाला सुट्टी नसते त्यामुळे घरच्यांसोबत वेळ फार कमी घालवता येतो त्या सगळ्या मालिकांच्या निर्मात्यांना, चॅनेलला हीच एक विनंती आहे कि सणासुदीला सुट्टी द्या.
“स्पष्टवक्तेपणा भावतो”
मी फार पटकन बोलते. स्पष्टवक्ती आहे त्यामुळे लोकांना कुठेतरी हि गोष्ट पटत नाही. कोणी खोटं बोललं तर ते मला पटत नाही. अनेकांकडून मिळणारी एक कॉम्प्लिमेंट आहे कि माझं मन फार निर्मळ आहे. लोकांनी चांगलं बोलावं, ऐकावं, चांगल्या गोष्टी करण्यासाठी एखाद्याला प्रोत्साहित करावं.
“बिग बॉस नको रे!”
मी बिग बाॅस च्या २ ऱ्या पर्वात जाणार नाही आहे मी माझ्या सोशल मीडिया वर या संबधित एक पोस्ट सुद्धा टाकली आहे. माझे काही प्रोजेक्ट्स लाइन अप आहेत त्यामुळे मी काही जाणार नाही. मला घरी बसून बिग बॉस बघायला आवडेल. मला त्यात जाऊन ड्रामा नाही करता येणार. जो खूप खरा माणूस आहे स्पष्ट बोलणारा त्याने बिग बॉस मध्ये जाऊच नये. बिग बॉस मध्ये सगळेच नौटंकी आणि नाटकी लोक राहू शकतात. मला खऱ्या लोकांच्या सोबत राहायला आवडतं.