“दुर्वा” ते “वैदेही” अश्या बहुपैलू भूमिका लिलया साकारणारी, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री फुलपाखरू फेम ऋता दुर्गुळे!
अभिनय आणि उत्तम डान्सर ही अनोखी ओळख जपणारी ऋता..
टेलिव्हिजनच्या सोबतीने नुकतीचं सगळ्यांना गुड न्यूज देऊन रंगभूमीवर पदार्पण करणारी मनमोहक अभिनेत्री ऋता सोबतच्या काही खास गप्पा फक्त प्लॅनेट मराठी वर…
संपूर्ण नाव : ऋता दिलीप दुर्गुळे वाढदिवस : १२ सप्टेंबर १९९३ जन्मठिकाण : दादर (मुंबई) शिक्षण : बॅचलर ऑफ मास मीडिया ( advertising )
“भिन्न स्वरूपाच्या भूमिका साकारते”
मी स्वतःला फार नशीबवान समजते. अभिनयाचा हा प्रवास कमाल होता, शिकवणारा होता.. भिन्न स्वरूपाच्या भूमिका या निमित्ताने करायला मिळाल्या. आणि आता पुन्हा नाटकात मी एका २० वर्षाच्या मुलीची भूमिका करतेय. दोन्ही मालिकांत मला वेगळया वयाच्या भूमिका करायला मिळाल्या. यातला बेस्ट भाग होता कि जेव्हा मी दुर्वा साकारत होती तेव्हा मी १८ वर्षाची होते आणि तेव्हा एका बाईची भूमिका साकारली आणि आता फुलपाखरू मधली वैदेही साकारताना मी २५ वर्षाची आहे तर मी एकदम उलट तऱ्हेच्या आणि त्या वयातल्या भूमिका साकारल्या. दुर्वा च्या वेळी मी अगदीच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला होते तेव्हा शूटिंग मुळे मी कॉलेज मधली मज्जा – मस्ती फार मिस केली. पण आता ते वैदेही च्या रूपाने पुन्हा जगता आलंय. फुलपाखरु च्या निमित्ताने ते कॉलेजचे दिवस पुन्हा अनुभवायला मिळालेत. मंदार सरांनी मला फुलपाखरू साठी कास्ट केलं आणि हे सगळं अनुभवता आलंय. कोणत्याही मुलीला किंवा विशेष करून स्त्रियांना आपल्या वयापेक्षा कमी वयाची भूमिका करायला मिळणं हे फार भारी वाटतं.
“प्रत्येक कलाकाराचा प्रवास वेगळा असतो”
नाट्यवलंय मध्ये नसल्याची अशी खंत नाही आहे. पण जेंव्हा मी नाटक सुरु केलं तेव्हा नाटकाच्या तालमीच्या वेळी मला एक गोष्ट जाणवली कि आपण आंतरमहाविद्यालय स्पर्धा, नाटक करायला हवं होतं. कारण या सगळयात आपल्याला आपल्या टीम सोबत कसं काम करायचं हे समजतं. जेंव्हा एखादं नाटक रंगमंचावर उभं राहत त्यामागे आपली सगळी टीम असते. या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी कॉलेज मध्ये अनुभवायला हव्या होत्या असं वाटतं. प्रत्येक कलाकाराचा अभिनयातील प्रवास हा वेगळा असतो, तर माझ्यासाठी हे फार भारी काम आहे कारण एकीकडे मालिका आणि आता नाटक.
“स्वतःचा वॊर्डड्रॉप वापरायला मिळाला”
सुरुवातीला फुलपाखरू या मालिकेची कथा थोडी वेगळी होती. कॉलेज मधली मुलगी त्यात ती फार श्रीमंत घरातली, बाबांची लाडकी. तर ति सारखे सारखे तेच कपडे का घालेल हा प्रश्न तेंव्हा मला पडला. मग मी माझ्या स्वतःच्या वॊर्डड्रॉप मधले कपडे शूट साठी वापरायला लागले. मग मंदार सरांना मी हि गोष्ट सांगितली आणि सरांनी ती सहजरित्या मला हवे ते कपडे घालण्याची परवानगी दिली. त्यामुळे कुठेच तुम्हाला वैदेही चे कपडे कुठल्याचं एपिसोड मध्ये तेच तेच दिसले नाहीत. मंदार सरांनी यासाठी फार मोकळीक दिली. मग यामुळे वैदेही चा प्रत्येक लुक हा वेगळा दिसायला मदत झाली. अनेक गोष्टी या निमित्ताने ट्राय केल्या. वेस्टर्न सोबतीने पारंपरिक लुक लोकांसमोर आला. त्यामुळे पहिल्या १०० एपिसोड मध्ये कुठेचं माझे कपडे पुन्हा पुन्हा तेच दिसले नाहीत.
“धकाधकीच्या जीवनातून वेळ काढणं शिकते”
नोव्हेंबर ते जून हे महिने माझ्यासाठी थोडे धकाधकीचे गेले. कारण माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदा घडलंय कि एकाच वेळी २ काम करतेय. त्यामुळे हा मधला काळ थोडा वेगळा होता. आता कुठेतरी मला हे झेपतंय. मी आता स्वतःच असे काहीतरी यातून मार्ग शोधते जेणेकरून मला हे सगळं सोप्प जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळी सांभाळते. तर हे जमवून घेणं थोडं कठीण आहे पण ते जमतंय.
“माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे मी इथे आहे”
शूट आणि बाकी गोष्टींमधून घरच्यांना किंवा मित्रमंडळींना यातून कोणाला वेळ द्यायला नाही जमत. माझं वैयक्तिक आयुष्य एवढं सहज रित्या पार पडलंय ते मला समजून घेणाऱ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीमुळे. मी जेवढ्या ताकदीने आणि उत्तमरित्या काम करू शकते ते माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे.
“गिफ्ट्स आवडतात कारण…”
मला प्रचंड गिफ्ट्स अावडतात. माझा पहिला प्रश्न हाच असतो कि मला गिफ्ट्स आणणार आहात ना? मी अजूनही सगळ्यांकडून अगदी हक्काने गिफ्ट्स घेते. सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती वाढदिवसाच्या दिवशी कि कोण काय गिफ्ट देणार. मी अगदी माझ्या घरच्यांना सांगते कि ते पाकीट वैगरे नको पण मला काहीतरी गिफ्ट हवंय. या २५ व्या वाढदिवसाला मला माझ्या फॅन्स कडून अनोखं गिफ्ट मिळालंय. एक लाकडी पेटी त्यावर माझ्या नावाचं आणि फुलपाखरूचं सुंदर रेखीव कोरीव काम असलेली पेटी आणि २५ झुमके दिले होते. झुमके आणि कानातले अगदीचं प्रेम आहेत माझ्यासाठी.
“नृत्यासाठी वेळ नाही ही खंत”
मी ३ वर्ष भरतनाट्यम केलंय पण या सगळ्या शूट मुळे हि आवड किंवा नाचण्याची संधी मिळत नाही. आपल्या आवडीला छंद जोपासायला वेळ नाही मिळत. तर हि एक खंत आहे कि भरतनाट्यम ला वेळ देणं जमत नाही.
“मास मीडिया प्रोजेक्ट ते बिर्थडे गिफ्ट् टॅटू”
माझ्या हातावर जो टॅटू [ hdp ] आहे त्याची गंमत अशी कि माझ्या फार जीवाभावाच्या २ मैत्रिणी आहेत [ध्रुवी, पूर्वा] तर त्यांनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट म्हणून हा टॅटू काढला. म्हणून तो आमच्या तिघीच्या सुद्धा हातावर आहे. आम्ही तिघी मैत्रिणी जरी आम्ही दिवसाचे २४ तास बोललो नाही तरी एका फोन ने आम्हाला सगळं समजतं हे आमच्यातलं नातं आहे. जेव्हा मास मीडिया चे खूप प्रोजेक्ट्स करायचो तेंव्हा आमचे सगळे प्रोजेक्ट्स hdp याच नावाने असायचे. म्हणून हा टॅटू आहे.
“बाबांच्याचं कॉलेज मध्ये शिकायचं होतं”
मला रुईया हवं होत कारण माझे बाबा रुईयाचे आहेत. १० वीत जे काही मार्क्स आले तेंव्हा कॉलेज चा फॉर्म भरताना पहिलं नाव हे रुईया होतं. मग पुढे पर्याय म्हणून रुपारेल, खालसा, विल्सन वगैरे यांची नाव होती. माझ्यासाठी बेस्ट आठवण हीच आहे कि मला रुईया मध्ये योगायोगाने ऍडमिशन मिळालं.
“रंगभूमीवर काम करायला आवडेल”
हो नक्कीच मला रंगभूमीवर काम करायला आवडेल कारण प्रत्येक कलाकाराचं रंगभूमीवर काम करण्याचं एक स्वप्न असतं. रंगभूमीवर काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात आपण चांगले कलाकार होण्यासाठी रंगभूमी आपल्याला घडवत असते. पण आता जवाबदारी खूप जास्त वाढली आहे. मला खूप छान समजून घेणारे सहकलाकार आणि उत्तम टीम मिळाली आहे. वर्षभरात एखादाचं प्रोजेक्ट् करावा पण लक्षात राहणारा करावा असं मला वाटतं.
“भावांची प्रतिक्रिया महत्वाची”
मी नाटकात छोट्या बहिणीची आणि खऱ्या आयुष्यात ऋग्वेद (लहान भाऊ) ची मोठी बहीण आहे. पण असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मी दोन्हीकडे लहान बहीण आहे. कारण ऋग्वेद मला अगदी दादा सारखं वागवतो आणि नाटकात उमेश दादा त्याच्या बहिणीसाठी खूप मस्त वागणूक देतो. तर या दोन्ही कडे मला मिळणारा पाठींबा हा मस्त आहे. माझ्या घरच्यांची नाटकामुळे एक इच्छा पूर्ण झाली कि मी रंगभूमीवर काम करतेय. नाटक बघून ऋग्वेद ची पहिली प्रतिक्रिया हीच होती कि तो बाबांकडे बघून म्हणाला कि हि अशीच वागते माझ्याशी! तर तेव्हा फार छान वाटलं. तो फार कमी बोलतो पण जेंव्हा आम्ही गप्पा मारतो तेंव्हा तो योग्यरीत्या बोलत असतो आणि त्याची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्वाची असते. दुर्वा ही मालिका ३ वर्ष केली आणि लगेच २ महिन्यांनी मला फुलपाखरू मालिका मिळाली. फुलपाखरू च्या वेळेस जेंव्हा माझ्या मालिकेचा पहिला एपिसोड साडेसात ला आला आणि ८ वाजता त्याने मला पहिला फोन केला आणि त्याची पहिली प्रतिक्रिया हीच होती दीदी तू इतकी लहान कशी दिसतेयस?? तू दुर्वा पेक्षा वेगळी कशी दिसतेस?? तेंव्हा मला जाणवलं कि आपण जे करतोय ते बेस्ट करतोय. ऋग्वेद कडून आलेली प्रत्येक दाद माझ्यासाठी खास असते. उमेश दादा बेस्ट आहे त्याच्यामुळे मला मोठा दादा मिळाला आहे. मला सगळ्यांनी मला यात फार मदत केली आहे.
“करियर चा ट्विस्ट”
“दादा एक गुड न्यूज आहे” या नव्या नाटकाने ने माझ्या करियर ट्विस्ट दिलाय. “वेब आणि फिल्म्स”
हो मला वेब आणि फिल्म हि दोन्ही क्षेत्र अनुभवयाला तिथे काम करायला आवडतील. पण मला घाई नाही आहे योग्य वेळ आली कि इथे सुद्धा नक्कीच काम करेन.
“काहीच खटकत नाही”
मराठी इंडस्ट्रीत असं काही खटकणार काही नाही कारण मी अजून असं काही अनुभवलं नाही आहे. “सेटवरची जवळची व्यक्ती”
सेटवरची जवळची व्यक्ती “तृषा” जी सानिया चा रोल करतेय.
“आश्रमात जाऊन वाढदिवसाचं सेलिब्रेशन”
माझ्या एका फॅन ने माझ्या वाढदिवसाला एका आश्रमात जाऊन माझा वाढदिवस साजरा केला होता तर हि बेस्ट काॅम्प्लिमेंट होती.
“या गोष्टी ज्या शिवाय राहू शकत नाही”
फोन, नेटफ्लिक्स, झोप, ड्राइविंग, वाचन, बोलणं (गप्पा मारणं)
रॅपिड फायर….हे कि ते
विकूडि की ऋग्वेद?
ऋग्वेद
आवडता अभिनेता..
यशोमन आपटे, हर्षद अटकरी, उमेश कामत : उमेश कामत
आवडती अभिनेत्री ..
शाल्मली टोळ्ये, आरती मोरे, प्रिया बापट : प्रिया बापट
मंदार देवस्थळी की अद्वैत दादरकर?
हे सांगणं कठीण आहे.
अभिनय की डान्स?
अभिनय
रत्नागिरी की मुंबई?
मुंबई
फिश की चिकन?
चिकन
हो की नाही…
१ ) सेलेब्रिटी असल्याचा फायदा कधी घेतला का?
नाही.
२ ) कधी कोणत्या सहकलाकारासोबत prank केला आहे का?
नाही. कारण माझा सोबत कोणी अस काही केलं की मला आवडत नाही. ३ ) क्रश कोणत्या को-स्टार वर?
नाही.
४) एखाद्याला “फेक” फोन केलाय का?
नाही.
५ ) सेटवर कोणाची खिल्ली उडवलीयेस का?
नाही.