जून उजाडला असून पावसाची अजून काही लक्षण दिसत नाही आहेत. गर्मी ने त्रस्त होऊन आपण या गर्मी पासून वाचण्यासाठी अनेक हटके पर्याय ट्राय करतो. खाण्यापिण्याचा बाबतीत सुद्धा “बीट द हीट” साठी अनेक चवदार आणि थंड पदार्थांची रेलचेल बघायला मिळते. मग अगदी थंड पेयापासून ते केक्स आणि पेस्ट्री पर्यंत असे चविष्ट कूल पर्याय आपल्याकडे आहेत.
तुमची ही हीट कूल करण्यासाठी आम्ही काही हटके आणि कमालीचे पेस्ट्री चे विविध प्रकार घेऊन आलो आहोत. उन्हाळ्यात आपल्याला विशेष करून आंबा, फणस खायला मिळतात. सोबतीला पर्याय म्हणून आपल्याला सो कॉल्ड कूल फालुदा हा पर्याय सदैव उपलब्ध असतो.
उन्हाळा खास करण्यासाठी पेस्ट्री मध्ये सीजनल स्पेशल म्हणून अजून एक पर्याय आहे फणस पेस्ट्री. हे ऐकल्यावर थोडं नवल वाटेल पण खायला एकदम चविष्ट आणि मस्त अशी ही पेस्ट्री. फणसाचे गरे, फ्रेश क्रीम आणि फणसाची एकदम बेस्ट चव या पेस्ट्री मध्ये चाखायला मिळते.
फालुदा हा सगळ्यांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय. फालुदा खायला जेवढी मज्जा येते तेवढीच मज्जा तुम्हाला फालुदा पेस्ट्री चाखाताना येते. खूप सारे ड्रायफ्रुटस, शेवया, टूटी फ्रुटी, सब्जा आणि रंगीत दिसणारी अशी ही पेस्ट्री.. एवढी रंगीत पेस्ट्री बघून एकदम दिलखुश होऊन जातं तर खाऊन मन तृप्त होतं.
हे असे सीजन खास पदार्थ खाण्यासाठी सगळेच खवव्ये अश्या पदार्थाच्या शोधात असतात. कल्याण मधल्या “द केक बझ” मध्ये या अनोख्या पेस्ट्रींची चव तुम्हाला चाखायला मिळेल. मग हा उन्हाळा संपायच्या आधी एकदा नक्कीच या पेस्ट्रीची चव चाखायला विसरू नका.