पावसाळा सुरू झाला आहे पण आता पावसाळ्यात फिटनेस कसा जपाल आणि या पावसाळ्यात रोजच्या वर्क आऊट सोबत कसा ताळमेळ साधणार या बद्दल आज जाणून घेऊ…
भर पावसात बाहेर जाऊन आऊट डोअर व्यायाम करणं किंवा वर्क आऊट शक्य नसतं तर अश्यावेळी अनेक व्यायाम आपण घरच्या घरी करू शकतो. असे विविध सोप्पे आणि आपल्याला जमतील असे व्यायाम प्रकार घरच्या घरी करून तुम्ही हा फिटनेस जपू शकता.
१ ) स्ट्रेचिंग : सकाळी उठल्या उठल्या आणि व्यायाम करण्या अगोदर स्ट्रेचिंग हा महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग हा स्ट्रेच झाला पाहिजे. हात, पाय, खांदे स्ट्रेच केले पाहिजे.
२ ) वॉक विथ स्टेयर्स : सगळ्यात बेस्ट आणि पटकन करता येणार हा व्यायाम. पावसाळ्यात घराबाहेर जाऊन धावणं किंवा चालणं जमणार नाही अश्यावेळी पायऱ्या वरून खाली वर चालणं, धावणं हा एक बेस्ट पर्याय असू शकतो.
३ ) सूर्यनमस्कार : कुठेही आणि कधीही करू शकता असा सरळ सोप्पा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. फक्त यासाठी थोडं लवकर उठून तुम्ही घरच्या घरी मोकळ्या जागेत सूर्यनमस्कार घालू शकता. यामुळे तुमच्या मनाला एक समाधान प्राप्त होतंच पण आपण फिट सुद्धा राहतो.
४ ) लिफ्ट ने जाणं टाळा : ऑफिस असो किंवा घर तुमच्या कडे चालत जाण्याऐवजी लिफ्ट हा एक पर्याय असतो पण तुम्हाला जर चालण्याची सवय लावायची असेल तर ऑफिस आणि घरी लिफ्ट ने जाणं टाळलं पाहिजे. दिवसभरात चालून शारीरिक हालचाल करणं हा एक उत्तम पर्याय आहे.
५ ) दोरी उड्या : चाला, धाव आणि सगळ्यात छान कुठेही दोरी उड्या मारा. दोरी उड्या मारून आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. पावसाळ्यात व्यायाम करण्यासाठी हा एक चांगला पर्याय नक्कीच ठरू शकतो.
६ ) वॉक अँड टॉक : गप्पा मारणं कोणाला आवडत नाही. ऑफिस मध्ये दुपारच्या वेळी जेवून झाल्यावर एक फेरी मारून पुन्हा कामासाठी येऊ शकता. वॉक अँड टॉक हा एक व्यायामाचा भाग समजू शकता.
बाकी तुम्ही जिम मध्ये जाऊन अनेक व्यायाम करा आणि हे साधे सोप्पे व्यायामाचे प्रकार करायला विसरू नका. या पावसाळ्यात तुम्ही अश्या तऱ्हेनं फिट राहू शकता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या फिटनेस साठी थोडा वेळ देऊन आपण फिटनेस जपायला हवा.
सौजन्य : @प्लॅनेट मराठी
Photocredits: Google Images