नुकतेच १० आणि १२ वी चे निकाल लागले असून आता या पुढे काय करावं हा प्रश्न सगळ्याचं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडला आहे. तुम्ही बारावी नंतर अनेक प्रकारची क्षेत्र निवडू शकता आणि त्यात करियर घडवू शकता. मग तुम्हाला अगदीच तेच तेच शिक्षण न घेता काही तरी अनोख्या क्षेत्रात करिअर करण्याची हौस असेल तर आम्ही तुम्हाला काही अनोख्या क्षेत्राची माहिती देत आहोत.
१ ) ट्रॅव्हल आणि टुरिजम : नवीन भाषा शिकण्याची आणि फिरण्याची आवड असल्यास हे क्षेत्र तुमच्यासाठी बेस्ट करियर ठरू शकतं. नुसती फिरण्याची हौस असून उपयोग नाही रोज नव्याने इथे गोष्टी शिकवल्या जातात. फिरणं हा सुद्धा आपल्या अभ्यासाचा एक भाग या क्षेत्रामुळे होऊ शकतो. ट्रॅव्हल आणि टुरिजम करण्यासाठी तुम्हाला फिरण्याची आवड हवीच पण नवीन नवीन गोष्टी वाचण्याची आणि त्यांची अनुभूती घेऊन हे क्षेत्र करियरचा उत्तम पर्याय होऊ शकतो.
२ ) पत्रकारिता : वाचन, लेखन आणि रोज हव्या तेवढ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची संधी हे क्षेत्र तुम्हाला देत. पत्रकार होणं हे फार सोप्पं वाटत असेल तरी हे काही सोप्पं नाही आहे. बातम्याची अचूक मांडणी कशी करावी, सूत्रसंचालन कसं असावं, भाषेवरची पकड असल्यास पत्रकारिता हा पर्याय एकदम परफेक्ट आहे.
३ ) इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन : तुम्हाला जर इव्हेंट्स कलात्मक पध्दतीने करण्याची आवड असेल आणि समोरच्या व्यक्तीला तुमचं मत पटवून देण्याची कला असल्यास ही दोन्ही क्षेत्र करियरच्या दृष्टीने छान आहेत. इव्हेंटस करण्यासाठी काय काय नेमकं करावं लागतं यांचा सगळा अभ्यास इथे केला जातो. पब्लिक रिलेशन हे क्षेत्र हल्ली फार पुढे आहे त्यामुळे तुमच्याकडे बोलबच्चन पणा असल्यास हे क्षेत्र तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पब्लिसिटी ची विविध बाजू उलगडण्यासाठी पब्लिक रिलेशन हा पर्याय करियर म्हणून उपलब्ध आहे.
४ ) फिल्म प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट : चित्रपट क्षेत्रात फिल्म प्रोडक्शन हाऊस हा महत्वाचा भाग आहे. इथे कामाची विविध संधी उपलब्ध आहे. फिल्म प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट हा अनोखं विश्व आहे. निर्मिती क्षेत्रात अनोख्या कामाची बाजू इथे शिकायला मिळते.
५ ) स्पोर्ट्स मॅनेजमेंट : खेळाची आवड असल्यास तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा अनोखा पर्याय आहे. खेळ आणि त्यातले विविध प्रकार, यातलं कौशल्य इथे शिकायला मिळतात. खेळातलं व्यवस्थापन कश्या प्रकारे होतं हे शिकण्यासाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंट हे फील्ड तुम्ही ट्राय करा.
सौजन्य : @प्लॅनेट मराठी