संपूर्ण नाव : संग्राम आनंद साळवी
जन्मठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
वाढदिवस : ५ मे १९८५
लग्नाचा वाढदिवस : ५ मार्च २०१८
शिक्षण : (HSC)
“नाटकांतून घडलेला मालिका प्रवास”
मी मूळचा कोल्हापूर चा आहे , पण इथे फार राहिलो नाही. माझे बाबा नेव्ही मध्ये होते तर माझं त्या निमित्ताने भारत दर्शन झालं आहे. २००२-०३ साली जेंव्हा आम्ही मुंबईत आलो तेंव्हापासून अभिनयाचा प्रवास सुरु झाला. मला आधी पासून अभिनयात काही तरी करायचं होतं, पण विविध ठिकाणी फिरणं असल्यामुळे याबद्दल फारसं माहीत नव्हतं. मग मुंबईत येऊन या बद्दल चौकशी केली. सगळ्यात आधी हिंदी थिएटर केलं मग मराठी रंगभूमी वर ४ नाटकं केली. नाटकांनंतर मालिकेसाठी ऑफर आली त्यासाठी ऑडिशन झालं आणि मग तेंव्हा पहिली मालीका “देवयानी” केली आणि असा हा प्रवास करत आज सगळ्यांसमोर आहे.
म्हणून “देवयानी” आहे खास….!!!
देवयानी मालिकेतील माझा सगळ्यात जास्त गाजलेला संवाद (तुमच्या साठी कायपण) जो अक्ख्या महाराष्ट्राने उचलून धरला. माझं त्या मालिकेतील व्यक्तिरेखेचं नाव माझं खरं नाव असल्याने हा अनुभव मस्त होता. संपूर्ण मालिका हीच एक खास आठवण आहे.
“मी तूझीचं रे” – कोड्यात पाडणारं पात्र”
विविध पैलूंच्या भूमिका करत असताना नव्या मालिकेत मी एका शासकीय अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा ऑफिसर खूप बिंधास्त आहे. एकूणचं एकदम कोड्यात पाडणार हे पात्र आहे.
“बायकोसोबत सुट्टी चा वेळ एकत्र घालवतो”
दोघे सकाळी एकत्र जिम ला जातो मग येऊन आपल्या आपल्या शूट ला जाऊन पुन्हा रात्री भेटतो. दोघांना एकाच दिवशी सुट्टी असली की एकत्र फिरतो, सिनेमा बघतो.
“जिमिंग करणं आवडत”
प्रत्येकाच्या आयुष्यात फिटनेस हा महत्त्वाचा आहे. मी या क्षेत्रात आहे म्हणून फिट राहावंच लागतं. पण सगळयांनी फिटनेस हा जपला पाहिजे. २४ तासापैकी एक तास तरी स्वतः साठी काढून व्यायाम केला किंवा जिमिंग केलं तर तेही पुरेसं आहे. माझे आजोबा आणि काका पेहेलवान आहेत तर मला आवडत जिम ला जाणं.
“वेबची दुनिया अनुभवायला आवडेल”
मला अभिनय करायला आवडतो तर मलिका असेल किंवा वेब असेल दोन्ही कडे अभिनय हा करायचा आहे तर नक्कीच मला मालिकांसोबत वेब वर काम करायला आवडेल. माध्यमं वेगळी असली तर अभिनय हा आहेच.
“मी यावर फार बोलणार नाही”
मालिके मधून एखाद्या कलाकाराला काढलं जातंय यात चूक कोणाची आहे किंवा कोणत्या कारणांमुळे एखाद्याला काढलं जातंय तर या गोष्टीचा सारासार विचार करून या गोष्टी घडतात तर यावर मी काही फार बोलू नाही शकत.
“सर लो बजेट है”
आपल्या इंडस्ट्रीत खटकणारी गोष्ट ही की मी अनेकदा पाहिलंय आणि अनुभवलंय की फिल्म करताना निर्मात्यांकडून कसे पैसे काढून कलाकाराला चित्रपट कमी बजेट चा असल्याचं सांगितलं जातं. जर चांगल्या कथा असतील तर चित्रपट हा कमी बजेट मध्ये का करावा? आपल्याकडे सगळ्यात आधी एकच शब्द सांगितला जातो “सर कमी बजेट आहे” तर ही गोष्ट कुठेतरी खटकते. जर मोठा पल्ला गाठायचा असेल तर कुठेतरी रिस्क ही घ्यावीच लागते.
“काळानुसार बदल होतात”
काय बदल व्हावेत हे मी सांगू नाही शकत कारण बदल हे घडत आहेत. प्रत्येक नवीन काम करताना, मालिका करताना नवीन नवीन गोष्टी आणि बदल घडत गेले. कालानुरूप बदल हे हळू हळू होतंच राहतात.
“आयुष्यात पहिल्यांदा टिकटॉक विडिओ” मी आयुष्यात पहिल्यांदा ‘टिकटॉक’ विडिओ केला आणि हा अनुभव कमाल होता. या आधी कधीच हे अँप वापरलं नव्हतं तर आधी ते डाऊनलोड केलं आणि मग मला अमृता देशमुख ने सांगितलं की ते कसं वापरायचं त्यातल्या अनेक गोष्टी तिने समजावून सांगितल्या. मग आम्ही पहिला विडिओ करत करत 3 विडिओ केले आणि ते फार व्हायरल सुद्धा झाले. मला याची काही कल्पना नव्हती की हे एवढं व्हायरल होईल पण टिकटॉक विडिओ करताना मज्जा आली मी त्याची गंमत अनुभवली.
“घोडेस्वारी आणि क्रिकेट”
अभिनया व्यतिरिक्त मला घोडेस्वारी (हॉर्स रायडिंग), स्विमिंग आणि क्रिकेट या तीन गोष्टी करायला आवडतात. अभिनय सांभाळून या तिन्ही गोष्टी करता येतात.
“डायलॉग बाजी”
मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला प्रत्येक मालिकेत एक नवा संवाद मिळतो आणि तो हिट ठरतो तर यांचा एक वेगळाच आनंद आहे. नव्या मालिकेत सुद्धा एक असाच संवाद आहे जो फार गाजतोय आणि व्हायरल होतो आहे “ना मनात खोटं, ना ओठात खरं” तर हा संवाद सुद्धा लोकांना आवडला आहे याबद्दल मला फार आनंद आहे.
“अश्या गोष्टी ज्या शिवाय राहू शकत नाही”
नॉनव्हेज (जेवण), माझी गाडी, सिनेमा या गोष्टींशिवाय मी राहूचं शकत नाही . मी रोज एखादा चित्रपट बघून झोपतो. चित्रपट बघण्याचं फार वेड आहे तर म्हणून चित्रपट बघूनच झोपतो.
“कूल आणि मस्तीखोर मी”
मी ऑफ कॅमेरा फार मस्तीखोर आहे. मला खोड्या (pranks) करायला फार आवडतात. सेटवर कूल आणि मस्तीच वातावरण असलं की सगळेच छान काम करतात. मला एका जागेवर शांत बसता येत नाही मी फक्त चित्रपट बघताना एका जागी बसू शकतो.
रॅपिड फायर…हे कि ते
आवडती अभिनेत्री : खुशबू तावडे, गौरी नलावडे, तीतीक्षा तावडे, सायली संजीव – खुशबू तावडे
आवडता अभिनेता : सुयश टिळक , अमित कल्याणकर , गिरीश ओक – गिरीश ओक
आवडत सोशल मीडिया : फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर – इंस्टाग्राम
मालिका, चित्रपट, नाटक : अभिनय
रांगडं व्यक्तिमत्व तसेच स्मार्ट हिरो संग्राम साळवी ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा..