कॅफे कल्चर च्या जमान्यात असे काही फूड जॉईन्ट आहेत जे तरुणांना आवडतात. आपल्याकडे पॉकेट फ्रेंडली फूड जॉईन्ट फार कमी आहेत. आज अश्याच एका पॉकेट फ्रेंडली फूड जॉईन्ट बद्दल जाणून घेऊ या!
काय आहे या फूड जॉईन्ट ची खासियत आणि का तरुणाईला हा फूड जॉईन्ट का आवडतो हे जाणून घेऊ.
पॉकेट फ्रेंडली “Yummito’s”
दादरच्या शिवाजी पार्क इथे असलेला हा स्वस्तात मस्त असा फूड जॉईंट आहे. सगळ्यांना मस्त असं काही तरी उपलब्ध व्हावं यासाठी “यश परब” या तरुणाने या पॉकेट फ्रेंडली असा yummito’s हा फूड जॉईन्ट सुरू केला आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी याचं नाव काहीतरी अनोखं आणि वेगळं असावं म्हणून yummitos हे नावं या फूड जॉईन्ट ला दिलं गेलंय. नो वेट फॉर हंगर अशी कमालीची टॅगलाईन असलेल्या yummito’s ची चर्चा संपूर्ण दादर शिवाजी पार्क मध्ये आहे. शिवाजी पार्कात Yummito’s च्या मॅगी ची वेगळीच चर्चा आहे. हा फूड जॉईन्ट या भागात फार खास आणि सगळ्या खवय्यांसाठी स्पेशल आह. आपल्या रोजच्या घाई गडबडीत काहीतरी खाऊन जायचं राहतं पण अश्या प्रकारचे लिटिल बाईट पदार्थ इथे सहज रित्या उपलब्ध आहेत.
मॅगी प्रेमी साठी पर्वणी….
पेरीपेरी मॅगी ही yummito’s ची खासियत असून इथे चक्क ४० प्रकारच्या मॅगी मिळतात. मग यात सगळ्यात खास अशी हॉट अँड स्पायसी मॅगी पासून एक्झॉटिक बटर मॅगी अश्या विविध तऱ्हेच्या चवदार आणि चमचमीत मॅगी चाखायला मिळतात. मॅगी हा अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. जर तुम्ही मॅगी प्रेमी असाल तर yummito’s तुमच्यासाठी ” मॅगी पर्वणी ” आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अश्या दोन्ही प्रकारातील मॅगी इथे चाखायला मिळतात. चिकन मॅगी, एग मॅगी, सूपी मॅगी अश्या अनेक प्रकारच्या मॅगी स्वस्तात मस्त तुम्हाला इथे मिळतील. आपल्या मुंबईत पॉकेट फ्रेंडली आणि उत्तम प्रकारची मॅगी फार कमी ठिकाणी मिळते यांचा विचार करून yummito’s मध्ये तुम्हाला विविधता असलेल्या बेस्ट मॅगी इथे खायला मिळतील.
“ये चीज बडी है मस्त”
व्हेज आणि नॉनव्हेज रोल्स हे अनेकांना आवडतात पण इथे तुम्हाला चीज ने फुलफिल्ल करणारे अनेक रोल्स खायला मिळतील. चीज, मेयोनीज, शेजवान, चिकन, नूडल्स असे अनेक रोल्स इथे तुम्हाला मिळतील.
“नो वेट फॉर हंगर” ही कमालीची टॅगलाईन घेऊन yummito’s तुमच्या भेटीला आलं आहे. टॅगलाईन प्रमाणेच तुम्हाला इथे खाण्यासाठी कधीच वाट बघावी लागत नाही. मनसोक्त गप्पा आणि हॉट स्पायसी मॅगी हे बेस्ट कॉम्बिनेशन अनुभवायला तुम्ही yummito’s ला नक्की भेट द्या.
नेहा कदम (प्लॅनेट मराठी)