सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे ती बहुचर्चित “पानिपत ” या चित्रपटाची. चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर सगळ्यांच्या भेटीला आला असून एवढा भव्यदिव्य ट्रेलर बघून सगळ्यांना चित्रपटांची उत्सुकता आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत” या चित्रपटात अनेक मराठी चेहरे सुद्धा झकळणार आहेत. या चित्रपटाची चर्चा फारच रंगली असून या चित्रपटात संजय दत्त्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर, आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या मुख्य भूमिका असून यांत नेमके कोणते मराठी कलाकार असणार आहेत यावर एक नजर टाकू या.
कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांनी या चित्रपटातील कलाकारांचं कास्टिंग केलंय. योग्य भूमिकांना वाव देण्यासाठी कास्टिंग ही मुख्य भूमिका त्यांनी अगदी लिलया पार पाडली असून या ऐतिहासिक चित्रपटात अनेक मराठी कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. जवळपास ३२ मराठी कलाकार आपल्याला “पानिपत” या चित्रपटांत बघायला मिळणार असून यात कृतिका देव (राधिका बाई) , अर्चना निपणकर (आनंदी बाई) , गश्मीर महाजनी (जनकोजी शिंदे) , प्रदीप पटवर्धन, सागर तळाशीकर यांच्या सोबतीने भली मोठी मराठी कलाकारांची टीम या चित्रपटात झळकणार आहे.
चित्रपटात दिसणारा भव्यदिव्य सेट, त्यांचे डिजाईन आणि त्यांची अनोखी योजना ही नितीन देसाई यांनी साकारली आहे. नितीन देसाई यांच्या आर्ट डिरेक्टर आणि डिझायनर म्हणून सगळ्यांना माहीत आहेत मराठी पासून बॉलिवूड पर्यंत त्यांचा हा प्रवास अनोखा आणि लक्षणीय आहे. पानिपत या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहास भव्य दिव्य पडद्यावर उलगडणार आहे. सोबतीने अजय -अतुल यांचं संगीत आपल्याला पानिपत मध्ये अनुभवायला मिळणार आहे.
भव्यदिव्य अश्या लक्षणीय “पानिपत” या चित्रपटातील मराठी कलाकार तारकांना प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!
नेहा कदम – प्लॅनेट मराठी