‘महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन’ या स्पर्धेपासून सुरु झालेला एका सर्वसामान्य मुलीचा प्रवास आज हिंदी आणि मराठी चित्रपट श्रुष्टीतील यशस्वी अभिनेत्रीपर्यंत येऊन पोहचलाय.
आपल्या मुलीमधील प्राणीप्रेम लक्षात घेता, तिने प्राण्यांची डॉक्टर म्हणून काम करावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. वडील निर्माते असले, तरी स्वतःमधील हिमतीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज तिने यशाचा उच्चांक गाठला आहे.
‘क्षणभर विश्रांती’ म्हणत सुरु झालेली तिची अभिनयातील कारकीर्द अगदी सुस्साट सुरु आहे. अभिनयाएवढंच प्राणी आणि निसर्ग यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी ही गुणी अभिनेत्री म्हणजे पुजा सावंत. ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ ‘स्टार ऑफ द विक’ च्या माध्यमातून जाणून घेऊया या सुंदर अभिनेत्रीबद्दल….
संपूर्ण नाव : पुजा विलास सावंत
जन्म तारीख आणि ठिकाण : २५ जानेवारी १९९०, मुंबई
शिक्षण : बी ए
बालपण माझं निसर्गसोबतीत….
सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या मला सुरुवातीपासूनच निसर्ग आणि प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम वाटायचं. त्यामुळे माझ बालपण खूप मजेत, आणि निसर्गाच्या सानिध्यात गेलं. आजोबांचं छान फार्महाउस होत. तिथेच माझ बालपण गेलं. त्याचंमुळे आणि तेव्हापासूनच मला निसर्ग आणि प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम निर्माण झालं. निसर्ग आणि प्राण्यांविषयीची ओढ मला तेव्हा पासून जाणवत होती. माझे आजोबा (आईचे बाबा) बाळ बागवे लालबागच्या नवहिंद बाल मित्र मंडळात कार्यरत होते. कामगार रंगभूमीचे अमिताभ बच्चन अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या या आवडीमुळेच कदाचित अभिनय माझ्यात येत गेला. मी कधीही अभिनय शिकले नव्हते. घरातील नाटकाच्या तालमी आणि आजोबांचा मंचावरील वावर पाहत मी मोठी होत गेले आणि तिथूनच खरी अभिनयाची ओढ लागली.
ओळख वापरली नाही…
माझे वडील विलास सावंत एक निर्माता म्हणून गेली काही अनेक वर्षे कार्यरत आहेत. पण त्यांच्या ओळखीमुळे मला अभिनय क्षेत्रात काम मिळालं असं कधीच झाल नाही. उलट मी त्यांची मुलगी आहे म्हणून मला काम मिळावं हे मलाही न पटणार होत आणि म्हणूनच मी माझी ती ओळख कधीचं वापरली नाही. मला मुळात प्राण्यांची डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यामुळे मीही शिक्षण पूर्ण करून माझी ती इच्छा पूर्ण करावी असं त्यांचं मत होतं. अभिनय हे केवळ आवडं म्हणून कर असं त्याचं स्पष्ट मत होत. पण योगायोगाने मी अभिनेत्री झाले. ‘श्रावण क्वीन’पासून सुरु झालेला माझा प्रवास आज अभिनेत्री पर्यत येऊन यशस्वीपणे सुरु असल्याचा आनंद आहे.
कौतुकं झालं….
‘क्षणभर विश्रांती’ हा माझा पहिला चित्रपट. या चित्रपटात काम करताना खूप मजा आली. चित्रपटाचं शुटींग सुरु झाल्यावर पाहिल्याचं क्लोज शॉटवेळी माझं प्रचंड कौतुकं झालं होत. सचित पाटील, सिद्धार्थ जाधव,कादंबरी कदम आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी माझं केलेलं कौतुकं आजही चांगलच लक्षात आहे. प्रेक्षकांनीही हा चित्रपट उचलून धरला.
मराठी वरचढ…
मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीत काम करताना मला फारसा फरक जाणवत नाही. चित्रपटासाठी लागणार ‘बजेट’ वगळता अनेक गोष्टींमध्ये मराठी चित्रपट श्रुष्टी कायम अग्रस्थानी आहे. सगळीकडे सिनेमा हे माध्यम मात्र सारखचं आहे. काम करण्याची पद्धत सोडली तर मराठी चित्रपट नेहमीच मला वरचढ वाटतो. माझ्या मते तर बॉलीवूडपेक्षा उत्तम सिनेमे हे मराठीत बनतात आणि त्याचमुळे मला मराठीत काम करायला सर्वाधिक आवडतं.
कास्टिंग काऊच नाहीच…
मराठीत आणि हिंदीतही काम करताना मला कास्टिंग काऊचंचा अनुभव कधीच आला नाही. माझ्या सुदैवाने मला प्रत्येकवेळी चांगली माणस मिळाली, चांगल्या माणसांबरोबर सतत काम करत राहिले. त्यामुळे या गोष्टीपासून मी नेहमी लांब राहिले आहे. त्यामुळे असा काही प्रकार माझ्यासोबत घडला तर मी काय रीॲक्ट करेन हे आतातरी सांगणं शक्य नाहीये.
नकार मलाही मिळालेत…
हल्लीच एका प्रोजेक्टच्या निमित्तानं मला नकार मिळाला आहे. अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमून येतात आणि मग नंतर मला तो प्रोजेक्ट करता येणारं नाही असं सांगण्यात येतं. पण ठीक आहे, कारणं जे काम मला मिळणार आहे, ते मिळण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. यात मला वाईट वाटलं नाही. हा पण मला मिळालेलं प्रत्येक काम मी उत्तम पद्धतीने पूर्ण करण्याच्या नेहमी प्रयत्नांत असते. शिवाय, रंगावरून आजही इंडस्ट्रीमध्ये अनेकदा नकार दिले जातात ही खरंतर लाजिरवाणी गोष्ट आहे. मला रंगावरून अद्याप कोणी बोललं नाही. मुळात मी कोणाला ते बोलण्याची संधी दिली नाही. मुळात माझ्याबद्दल मला कोणी रंग किंवा कोणत्याही गोष्टींवर कोणी टीका करणं, मला पटत नाही. त्यामुळे माझ्या या परखड स्वभावामुळे अजून कोणाची तशी हिम्मतही झाली नाही.
नवीन चित्रपटांची नांदी…
२८ फेब्रुवारीला मी आणि गश्मीर महाजनीची मुख्य भूमिका असणारा ‘बोनस’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. मार्च मध्ये ‘विजेता’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. सोबतच, ‘दगडी चाळ २’चंही चित्रिकरण सध्या सुरु आहे. त्यामुळे तो चित्रपटही याच वर्षात प्रदर्शित होईल.
नेहमी वेगळं काम हवं…
कधीही काम निवडतात मी कोणत्याही चौकटीत न राहता भूमिकेचा विचार करते. चित्रपटाची कथा ऐकतानाचं मला ती भूमिका आवडली तर मी ती फिल्म नक्की करते. मग त्यावेळी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण असेल? निर्माता कोण असेल? अशा कोणत्याही गोष्टींचा अजिबात विचार करत नाही. मी स्मिता पाटील यांची प्रचंड मोठी चाहती आहे. त्यामुळे त्यांच्यावर एखादा चित्रपट बनला आणि त्यात मला त्यांची भूमिका साकारला मिळावी असं माझ स्वप्नं आहे. आणि तो माझा ‘ड्रीम रोल’ आहे.
नाटकाची भीती वाटते, पण…
लवकरच एका वेबसिरीजच्या माध्यमातून मी प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. तूर्तास त्याबद्दल अधिक काही सांगता येत नाही. पण लवकरच ते सरप्राईज लोकांना कळेल. नाटकात काम करायला मात्र मला भीती वाटते. मुळात तुम्ही रंगमंचावर असता, त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. हावभाव, शब्द या सगळ्यांचं भान राखून नाटकं करावं लागत. त्यामुळे एवढ्यात मी नाटकं करेन असं मला वाटत नाही.
प्राण्यांबरोबरचं रमते…
खरं सांगायचं तर, मी फक्त प्राण्यांबरोबर सर्वाधिक रमते. शुटींग नसेल किंवा कधी कामातून ओसंत मिळाला कि मी घरी थांबून माझ्या सगळ्या लाडक्या जिवलग प्राण्यांबरोबर वेळ घालवणं पसंत करते. माझ्या घरी कुत्रे, मांजरी, विविध पक्षी आहेत. विशेष म्हणजे यातील एकही प्राणी मी आवडं म्हणून विकत पाळायला घेतलेला नाहीये. प्राण्यांसाठी मी नेहमी काहीन काही करते. निसर्ग-प्राणी आणि माझं एक वेगळं नातं आहे. येत्या काळात त्यांच्यासाठी एक वेगळ स्वप्नं मी पाहतेय.
ट्रोल झाले…
कलाकार म्हटलं कि ट्रोलिंग होतंच, चांगल्या-वाईट कमेंट्स आल्याचं. पण माझ्याबाबतीत असे प्रकार फार क्वचित घडलेत. अलिकडेच माझ्या एका फोटोशूटवर अनेकांनी कमेंट्स केल्या. पण त्या कमेंट्सपैकी चांगल्या कमेंट्समुळे ट्रोल किंवा वाईट कमेंट्सची संख्या असल्याचं माझ्या लक्षात आलं. पण कधी ट्रोलिंग होऊच नये असं वाटतं. पण अनेकदा ‘मराठी मुलींनी असं वागणं चुकीचं आहे’. असं म्हणाऱ्या कमेंट्स वाचून संताप येतो. फक्त मराठी मुलींनी संस्कृती जपायची का? संस्कृतीचं जतन झालचं पाहिजे. पण सगळ्या अपेक्षा फक्त मुलींकडून का? आणि मुळात मराठी मुली म्हणून त्यांच्यावर तुम्ही बंधन घालता. मुळात मला माझ्या संस्कृतीचा फार अभिमान आहे. त्यामुळे मला संस्कृतीचं भान बाळगायला सांगणं चुकीचंच.
सुपर फॅशन फंडा…
तुम्ही जे वस्त्र परिधान करता, ते तुम्हाला स्वतःला आवडण गरजेचं असतं असं मला वाटतं. तुम्ही जे काही घालाल त्यात तुम्हाला अवघडल पण येऊ नये या मताची मी आहे. त्यामुळे मला जे आवडेल, आणि माझ्या मते मला जे चांगलं दिसेल अशाचं गोष्टी लक्षात घेऊन मी माझी फॅशन ठरवत असते. त्यात मग तुम्हाला लोकं वाईट म्हणाले तरी, तुम्ही स्वतःला आवडणं फार गरजेचं आहे. आणि हीच माझ्यासाठी फॅशनची व्याख्या आहे.
फिटनेस मंत्रा…
मला खाण्याची खूप आवड आहे. भात खाल्याशिवाय मी जगू शकत नाही. मला प्रचंड गोड खायला आवडतं. मग अभिनेत्री म्हणून फीत राहण्यासाठी मी खाणं कधीचं थांबवलं नाही. मात्र मी नियमित व्यायाम करते. जीमिंगवर माझा कटाक्ष असतो. पहाटे ५ किंवा ५.३० ला माझ्या दिवसाची सुरुवात होते. मनसोक्त व्यायाम केल्यानंतर मग पुढे माझ्या कामाला सुरुवात होते.
रॅपिड फायर
० पुजाच टोपणनाव
-बोजू
० पुजा अभिनेत्री नसती तर…
-प्राण्यांची डॉक्टर
० स्वतःमधील खूप आवडणारी गोष्ट
-प्राणी प्रेम
० स्वतःमधील न आवडणारी गोष्ट
-मला खोट सहन होत नाही आणि पटकन रडू येतं.
० पुजाचा लाईफ फंडा
-सतत हसत रहा
० पुजाचा क्रश
-ह्रितिक रोशन
० स्वतः काम केलेला आवडता चित्रपट
-नीलकंठ मास्त्तर, लपाछपी
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)