“कुटुंब रंगलाय श्रीखंड व्यवसायात”
गुढीपाडवा आणि काही तरी गोड धोड खालल्या शिवाय आपले सण हे पूर्ण होतंच नाही. मराठी सण आणि अगदी साग्रसंगीत जेवणं हे एक समीकरण आहे, मग गोड म्हणून जेवण्याच्या ताटात हमखास दिसणारं “श्रीखंड किंवा आम्रखंड” अगदी पारंपारिक जेवणात पुरी आणि श्रीखंडाचा बेत हा ठरलेला असतो. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही अश्या एका कुटूंबाची गोष्ट सांगणार आहोत की जी गेली अनेक वर्षे घरच्या घरी श्रीखंड बनवतात. भिडे कुटूंब गेली अनेक वर्षे हा व्यवसाय करत आहेत.
लोकांना काहीतरी छान आणि उत्तम प्रकारचं घरगुती प्रकारे बनवलेलं खायला मिळावं म्हणून हा व्यवसाय त्यांनी सुरू केला. हे कुटूंब त्यांच्या या श्रीखंड व्यवसायाची गोष्ट सांगत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या कडून त्यांची ही चवीच्या सुखाची गोष्ट…
चविष्ट खाण्याची आवड आमच्या घरी आधीपासूनच आणि त्यात पण कोणाच्या घरी बनवलेलं असेल तर क्या बात! बाहेरून आणून खाणं हे आमच्या घरी तस कमी प्रमाणात आहे.
८-९ वर्षांपूर्वी घरी काहीतरी फंक्शन होत तेव्हा बाबांनी पहिल्यांदा घरी श्रीखंड बनवलं ते पण आजीच्या मार्गदर्शनाखाली. अर्थातच ते अप्रतिम झालेलं याबद्दल वादच नाही. पण मग हळू हळू नातेवाईकांना खायला दिल त्यांना पण ते आवडलं. मग बाबांच्या काही मित्रांना दिल खायला ते तर खाऊनच खुश झाले. ते म्हणाले “अरे एवढं चांगलं बनवतोस, तर आम्ही हे विकत घेऊ” ही आमची पहिली ऑफिशियल ऑर्डर. यात आजींनी भयंकर सपोर्ट केलाय. तीच म्हणाली बाबांना कर सुरू बघू किती ऑर्डर येतात ते आणि नंतर तर फक्त mouth publicity वर पुढच्या सगळ्या ऑर्डर मिळत गेल्या. आधी अंबरनाथ, मग हळू हळू कल्याण आणि आता डोंबिवली मध्ये पण बऱ्याच प्रमाणात आमचं श्रीखंड आणि आम्रखंड दोन्ही जात. आता जाऊन कुठे आम्ही फेसबुक पेज तयार केलंय.
बरं आणि एवढी मोठी ऑर्डर असून सुदधा बनवणारी आम्ही तिघच लोक. मी आणि आई बाबा. दूध आणायचं, ते तापवायच, मग चक्का टांगायचा, तो काढून त्यात साखर टाका, हातानी फेटा, आणि बाकीचे सोपस्कार पार पडले की ते पोचवायला जा. या सगळ्यात दुसरं काही बघायला वेळच नसतो पण एक नक्की भयंकर मजा येते हे सगळं करायला.
पूर्वी फक्त सणावाराला मिळायचं पण आता ते पूर्ण वेळ करायचा विचार आहे. उद्दिष्ट एकच आपल्याला जे चांगलं बनवता येत ते लोकांना खायला मिळायला हव. कारण आमच्या डोक्यात एकच असत “चव सुखाची आवड पोटाची”
क्षितिज भिडे ( भिडे अँड सन्स )
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)