अभिनेत्या डॉक्टर चा कौतुकास्पद प्रवास..
आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये आहोत पण अश्या परिस्थितीत आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस अनेक मंडळी झटतात, मग यात डॉक्टर पासून ते पोलीस कर्मचारी या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यांच वाढलेलं प्रमाण यामुळे आपण सगळेच लॉक डाऊन मध्ये आहोत. आज आपण अश्याच एका अभिनेता डॉक्टर ची गोष्ट जाणून घेणार आहोत जो अभिनयाच्या सोबतीने डॉक्टरीपेशा सुद्धा सांभाळत आहे. कोरोनामुळे तो सध्या २४ तास हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या सेवेसाठी रुजू आहे.
प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या माध्यमातून डॉक्टर आशिष गोखले स्वतः त्याच्या या अनुभवा बद्दल आपल्याला सांगतोय, आणि या कोरोना व्हायरस मध्ये आपण काय काळजी घ्यावी यासाठी आपल्याला मार्गदर्शन देखिल करत आहे. त्याच्याकडून आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया आणि या कोरोनावर मात करू या..
“सकारात्मक ऊर्जा देऊन जाणारा अनुभव”
मी रोज अभिनय करून रात्री हॉस्पिटलमध्ये जायचो, जुहू मधल्या एका मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये मी काम करतो. शूट नंतर मी तिकडे पेशंट बघायला जातो. खरं सांगायचं तर मी डॉक्टर व्हायच्या आधी मी अभिनय करायचो, नाटकात काम केलं आणि डॉक्टर होत असताना पुण्यात नाटक आणि फॅशन शो करत होतो. मुंबईत आल्यावर डॉक्टरकी च्या सोबतीने मी अभिनय करत राहिलो त्यामुळे मी डॉक्टरकी पासून कधीच लांब गेलो नव्हतो. आपल्यावर या कोरोनाचा प्रकोप झाला या समस्येमुळे काही डॉक्टर लॉकडाऊनमुळे हॉस्पिटल मध्ये येऊ शकत नाही आहेत. सगळ्याच यंत्रणेवर थोडा ताण आला म्हणून गेले ११ – १२ दिवस २४ तास इथे काम करतोय. अनुभव हा नेहमीच चांगला आणि वेगळा असतो. पेशंट ला बरं करण्याचा आनंद आमच्यासाठी वेगळा असतो. माझे आई बाबा दोघे ही डॉक्टर आहेत. आमचं कोकणात हॉस्पिटल आहे जिथे मी हे सगळं लहानपणापासून बघत आलो त्यामुळे हा आनंद आहे. लोकांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळतात त्यामुळे काम करण्याची वेगळी सकारात्मक ऊर्जा आम्हाला मिळते. इथे प्रत्येक स्टाफ काम करतो. अगदी वॉर्ड बॉय पासून नर्स, मावशी हॉस्पिटलचा प्रत्येक स्टाफ मनापासून काम करतात . त्यामुळे हे काम आणि या आधीचं काम यात फार फरक आहे. सगळ्यांनी झोकून देऊन काम करायला सुरुवात केली आहे. आम्हाला खूप नवे अनुभव यातून मिळतात. जेव्हा आपण २४ तास एकाच जागी असतो तेव्हा हे थोडं कठीण वाटतं पण या सगळ्याचा परिणाम सकारात्मक जेव्हा घडतो तेंव्हा हा अनुभव खूप वेगळी ऊर्जा देऊन जातो.
“सोशल डिस्टगसिंग पाळा”
लोकांना अजून ही कोरोनाचं फारसं गांभीर्य नाही आहे. तर असं करू नका. कारण सोशल डिस्टगसिंग पाळून हा आजार जाऊ शकतो. सोशल डिस्टगसिंग मुळे हा आजार पसरत नाही तर हे आपण पाळलं पाहिजे, आपण स्वतःला काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत. आपण सगळेच यातून वाचू, लवकर लॉक डाऊन संपेल पण धीर धरा. डॉक्टर सांगतात त्या गोष्टी पाळा. आपण थोडं संयमी राहीलं पाहिजे. सगळ्यांना एकच सांगणं आहे की थोडे दिवस घराच्या बाहेर पडू नका. सोशल डिस्टगसिंग च पालन करा कारण इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर खूप ताण येतोय. तिकडे पोलिसांना रस्त्यावर लाठी मार करावा लागतो तर म्हणून घराच्या बाहेर पडू नका. आपल्याला यावर विजय मिळवायचा आहे. त्यासाठी खरचं कोरोनाचं गंभीरपणे विचार करा नाहीतरी हा कोरोना रुपी रावण तुमचं नक्कीच हरणं करेल.
“अशी घ्या घरच्या घरी काळजी”
तुम्ही कुठे बाहेर गेलात की आल्यावर लगेच अंघोळ करा, कपडे धुवून टाका, गरम पाणी प्या, घरी सोशल डिस्टगसिंग पाळा, सतत हात धुवा. हा व्हायसर धातू वर जास्त तास राहतो तर धातू च्या गोष्टी सॅनिटाईज करा, त्या दर नऊ तासा नंतर पुसत रहा.
“Quarantine म्हणजे नेमंक काय?”
Quarantine चा मराठीत अर्थ आहे की अलग ठेवणे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य रोगापासून वेगळं ठेवणे म्हणजे Quarantine करणे. एखाद्या संसर्गजन्य रोगापासून स्वतःला दुर ठेवणे म्हणजे Quarantine ठेवणे. आयसोलेशन म्हणजे पूर्णतः वेगळं ठेवणे म्हणजे जी लोक इन्फेक्शन झालेली आहेत त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवतात जेणेकरून दुसऱ्यांना त्यांचा संसर्ग होणार नाही.
“नॉनव्हेज मुळे हा आजार होत नाही ”
नॉन व्हेज मुळे हा आजार पसरतो किंवा आपल्या शरीरात जातो असं काही नाही. हा ड्रॉप लेट इन्फेक्शन ने होतो आणि याच आघात आपल्या फुफ्फुसावर होतो त्यामुळे न्यूमोनिया होतो. हा आजार श्वसनामुळे होतो. त्यामुळे नॉनव्हेज खाण्याने काही होत नाही.
“खाण्यापिण्याची पथ्ये पाळा”
लोकांच्या खाण्यापिण्याचा अंधश्रद्धा खूप आहेत जे नॉनव्हेज किंवा आपण जे खाऊ ते नीट शिजलेल असलेलं पाहिजे. आपण पूर्णतः शिजलेल अन्न खायला हवे. कच्च काही खाऊ नका. ज्या भाज्या बाहेरून घेऊन येतो त्या गरम पाण्यात धुवून नंतर खाव्यात. भाज्या नीट धुवून साफ करून पूर्ण शिवजून खा. ज्या लोकांना डायबेटीस आहे त्यांनी गोड खाऊ नये, हायपर टेन्शन असलेल्या लोकांनी मीठ जास्त खाऊ नये. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळच्या वेळी खाल्ल्या पाहिजेत. यात हलगर्जी पणा जर नका. पोटाला लागेल तेवढं खा उगाचं घरात आहात म्हणून खूप खाऊ नका. त्यामुळे हवं तेवढच खा.
“श्वसनाचे व्यायाम करा”
घरच्या घरी फिट कसे रहाल तर, हा कोरोना व्हायरस लोअर रेस्परेटरी ट्रक वर हा आजार होतो त्यामुळे फुफ्फुसावर हा परिणाम करतो, न्युमोनिया होतो त्यामुळे आजार होतो. ताप, सर्दी, खोकला ही यांची लक्षणे आहेत. श्वसनाचे व्यायाम दिवसांतून कमीत कमी २० मिनिटं करायचेच. जर तुमच फुफ्फुसाचे मसल्स सक्षम झाले तर तुमच्या संपूर्ण शरीराला योग्य रक्त पुरवठा होईल, तुमचं हृदय नीट राहील, तुम्ही एकदम फ्रेश रहाल, त्यामुळे हे व्यायाम करा आणि कोरोना पासून लांब राहा. व्यायामामुळे आपल्या मेंदुत हॅप्पी हॉर्मोन तयार होतात त्यामुळे आपण खुश राहतो, शरीर खुश राहतं. यासाठी दोरीच्या उड्या मारा, प्राणायाम करा, श्वसनाचे व्यायाम करा. ज्यांना हायपर टेन्शन आणि डायबेटीस (मधुमेह) आहे त्यांनी श्वसनाचे व्यायाम हे नक्की कराचं.
“हसत रहा आणि मानसिक संतुलन जपा”
आपण सगळेच घरी आहोत थोडं वातावरण वेगळं आहे तर कदाचित डिप्रेशन (नैराश्य) येऊ शकतं, पण घरच्यांसोबत बोला, तुमच्या मित्र – मैत्रिणींसोबत बोला, तुम्ही लोकांना फोन करा, विडीयो काॅल द्वारे संपर्कात रहा. काही नवीन छंद जोपासा, वाचन करा, चित्रपट बघा. थोडं शांत बसून विचार करा की एवढा वेळ तुम्हाला मिळाला आहे तर काय नवीन करू शकतो याचा विचार करा. कॉमेडी बघा, सकारात्मक गोष्टी बघत जा, सगळ्यात महत्त्वाच वाचन करा खूप गोष्टी वाचायला आहेत, तर हा वेळ वाचनासाठी घालवा. अजून मेंटल हेल्थ कशी जपावी तर सोशल मीडिया वरचे कोरोना संबंधित खोटे नाटे मेसेज येतात, विडिओ येतात, व्हायरल पोस्ट येतात यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमचे डॉक्टर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा . हसत रहा आणि काळजी घेऊन मानसिक संतुलन जपा.
“सिगरेट पिण बंद करा”
६५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना हा आजार पटकन होऊ शकतो. जे धूम्रपान करतात त्यांनी सिगरेट पिणं बंद करावं कारण त्यांना हा आजार खूप लवकर होतो. डायबेटीझ आणि हायपर टेन्शन असलेल्या लोकांनी सुद्धा या साठी विशेष काळजी घेतली पाहिजे. श्वसनाचे व्यायाम नक्की करा.
“हायजिन पाळा”
हायजिन बद्दल जस मी सांगितलं की बाहेरून आलो की लगेच अंघोळ करा , हातपाय धुवा . हॅन्ड सॅनिटाईज करण खूप महत्त्वाच आहे. २० सेकंद हात नीट धुवा. २० सेकंद हात धुतले तर आपण या व्हायरस पासून सुरक्षित राहू शकतो. आयसो प्रोफाईल अल्कोहोल ने कोरोना जातो. बाहेर जाताना मास्क वापरा किंवा रुमाल बांधा , मास्क आणि रुमाल हे वापरून झाले की धुवून टाका. जर तुम्हाला सर्दी, खोकला ताप ही लक्षणं जाणवली तर डॉक्टर ला दाखवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा आजार बरा होणारा आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आनंदी रहा आणि अजिबात घाबरून जाऊ नका. लोकं बरी होतात त्यामुळे काळजी करू नका. तुमचं शरीर हे तुमच्या मनाचं नोकर असतं जर तुमचं मन सकारात्मक असेल तर तुम्ही कोणत्याही आजारावर मात करू शकता. फक्त तुम्ही काळजी घ्या आणि लॉक डाऊन चे नियम पाळा, संयमी रहा आम्हाला सहकार्य करा.
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)