भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस म्हणून संपूर्ण देशात १४ एप्रिल ला मोठया उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासन १४ एप्रिल हा दिवस “ज्ञान दिवस” म्हणून साजरा करतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधानलिहिलंय. “सगळ्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देखिल दिला आहे.
आंबेडकर जयंती ही मोठ्या उत्साहात भारतात साजरी केली जाते. यंदा कोरोना मुळे सगळ्यांनी घरी राहून ही आंबेडकरजयंती साजरी करावी असं आव्हान करण्यात आलं आहे. घरीच थांबून ही आंबेडकर जयंती साजरी करावी आणिआंबेडकरांना अभिवादन करावं आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखावा असं आव्हान सगळयांना करण्यात आलं आहे. संपूर्ण देशभरात हे संकट असल्यामुळे यंदा घरच्या घरी ही जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करावी.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समतेसाठी वाहिले त्यामुळे यंदा घरीच राहून आपण त्यांच्यास्मृतीस अभिवादन करून समतेचे दिवे लावू या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन.
प्लॅनेट मराठी कडून सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! घरीच थांबू या आणि आंबेडकरांना अभिवादन करू या!