“जय फाऊंडेशन सोबत बॉम्बे स्कॉटिश च्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम”
कोरोनाच्या काळात सगळेच आपला मदतीचा हात पुढे करताना आपण बघतोय. कोणी गरिबांना धान्य, भाजीपाला पुरवतंय तर कोणी आर्थिक हातभार लावून मदत करतंय. या सगळ्यात “जय फाऊंडेशन” गोरगरिबांना मास्क च वाटप करताना आढळून आले.
कोरोना मुळे आपल्या आरोग्याचा विचार ऐरणीवर आला आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती आपल्या पुढे येऊन उभी राहिली पण अश्या परिस्थिती अनेक मेडिकल मध्ये मास्क चा तुटवडा भासू लागला यावर उपाय म्हणून समाजसेवक “जय शृंगारपूरे” यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. काय आहे त्यांचा हा उपक्रम हे आपण जाणून घेऊ या…
१ एप्रिल २०१७ म्हणजे जवळपास ३ वर्षा पासून मी समाजकार्य करतोय. “जय फाऊंडेशन” च्या अंतर्गत आम्ही अनेक समाजकार्य करून लोकांना मदत करतोय. १ एप्रिल २०१७ ला पहिल्यांदा “दादर बीच क्लीन अप” या प्रोजेक्ट पासून या कार्याला सुरुवात केली. जवळपास १६० आठवड्या पेक्षा जास्त काळ हे काम सुरू आहे. या उपक्रमातुन “बॉम्बे स्कॉटिश स्कुल” चे विद्यार्थी आमच्या संपर्कात आले आणि त्या नंतर आम्ही सोबत काम करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक समाजकार्यात आम्हाला मदत केली. बीच क्लीन उप पासून दादर चौपाटीच्या अनेक भिंती आम्ही रंगवून त्यांचा कायापालट केला. यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या सोबतीने प्लास्टिक मुक्त दादर या उपक्रमात देखील हे विद्यार्थी आमच्या सोबतीने काम करतात.
कोरोना मुळे आपल्याकडे संचार बंदी लागू झाली या सगळ्या काळात आपल्याकडे मास्क, सॅनिटायजर, ग्लोज या सगळ्यांचा तुटवडा भासू लागला. मार्केट मध्ये यांचा स्टॉक कमी होता या काळात बॉम्बे स्कॉटिश च्या विद्यार्थ्यांनी आपण मास्क बनवू या अशी संकल्पना मला दिली तर मला ती संकल्पना आवडली. मग विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक यात सहभागी झाले त्यांनी मास्क साठी कॉटन शोधलं आणि यातून त्यांनी मला ६०० ते ८०० कॉटन चे मास्क तयार करून दिले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांच्या संकल्पनेतून हा मास्क बनवण्याचा अनोखा उपक्रम घडला आणि ते मास्क मी दादर, माहीम, माटुंगा इथल्या गरजूंना वाटले. सोबत काही मिल्स बनवून देतात जे आम्ही गोरगरिबांना या लॉकडाऊन च्या काळात पुरवत आहोत. असे अनेक उपक्रम मी बॉम्बे स्कॉटिश च्या विद्यार्थ्यांसोबत करतोय. खरंतर मी त्या विद्यार्थ्यांचे आणि बॉम्बे स्कॉटिश चा खूप आभारी आहे की त्यांची शाळा त्यांच्यावर एवढे चांगले संस्कार घडवून सामाजिक भान जपण्याची शिकवणूक त्यांना देते आहे.
जय शृंगारपूरे
जय फाऊंडेशन आणि बॉम्बे स्कॉटिश च्या या सगळ्या विद्यार्थ्यांच या अनोख्या समाजकार्यासाठी करावं तितकं कौतुक कमी आहे. लॉकडाऊन च्या काळात आपल्या कुटूंबासोबत आपल्या समाजाचा घटक असलेल्या गरजूंना मदत करण्याचा अनोखा वसा आज जय शृंगारपूरे चालवत आहेत त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!!
नेहा कदम (प्लॅनेट मराठी)