लॉकडाऊन मध्ये अनेक कामगारांना त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात. अनेक कामगार मिळेल त्या दिशेनं आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करतोय. अनेक दिवस चालून, मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी जाण्याची ओढ त्यांच्या मनात आहे. या अनेक कामगारांना त्यांच्या स्वतःच्या घरी पोहचवण्यासाठी एक कलाकार जिद्दीने पुढे आला आहे. बॉलिवूड कलाकार “सोनू सूद” पुढे येऊन त्या प्रत्येक कामगारांसाठी त्यांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत करतोय. त्यांच्या एका ट्विट ने हजारो कामगार आपल्या घरी परतताना दिसतात.
सोनू ने आपल्या ट्विटर वरून प्रत्येक व्यक्तीला रिप्लाय देऊन त्यांना हवी ती मदत करण्यासाठी तो पुढे येतोय. या सगळ्या कामामुळे सोनू सोशल मीडिया वर चर्चेचा विषय ठरला, त्याचं हे काम बघून आपण सगळेच थक्क होऊन जाऊ. त्याला येणाऱ्या प्रत्येक ट्विट ला तो स्वतःहून रिप्लाय देऊन तो या कामगारांना मदत करतोय. सोशल मीडिया च्या माध्यमातून तो लोकांशी संपर्क करून तो त्यांच्या घरी जाण्याची सोय करून देतोय. लॉकडाऊन मुळे वेगवेगळ्या राज्यातील कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी सोनू ने पुढाकार घेतला आहे.
आजवर २५ बसमधून एक हजार लोकांना उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मध्ये पोहचवलंय यासोबत अजून १०० बसची व्यवस्था त्याने केली आहे. या सगळ्या लोकांची योग्य प्रकारे सोय करून त्यांना त्यांच्या घरी पोहचवल जातंय या सोबतीने त्याने डॉक्टरांना मदत केली, मुंबईतील त्याचं हॉटेल त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दिलंय. जोपर्यँत शेवटचा कामगार घरी जात नाही तोवर तो हे काम करत राहणार आहे. सोनूच या कामासाठी त्याचं सगळीकडून कौतुक होतंय. सोशल मीडिया वरचा हिरो म्हणून सोनू आता ओळखला जातोय. सोनूचं ट्विटर या सगळ्यात खूप चर्चेचा विषय ठरलंय कारण त्याचं प्रत्येक ट्विट ला रिप्लाय देणं असू देत किंवा त्यांची ट्विटर वरची लिहिण्याची शैली, भाषा ही कोणालाही भारावून टाकते आणि आश्वासन देऊन धीर देणारी वाटते. सोनू च्या या कामाचं कौतुक शब्दात मांडता येणं काठीण आहे. लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत तो लोकांना जी मदत करतोय ती उल्लेखनीय आहे.
सोनू तुझ्या या कामाला तुझ्या या जिद्दीला प्लॅनेट मराठी कडून सलाम….
नेहा कदम – प्लॅनेट मराठी