कोरोनाच्या काळात अनेक सामाजिक संस्था, लोकं एकजुटीने सोबत येऊन अनेक गोरगरिबांना मदत करतात पण या सगळ्यात अशी एक तरुण मुलगी आहे जी बीएमसी कामगारांपासून ते थेट स्वतःच्या विभागातील गरजूंना मदत करण्यासाठी ऑन फील्ड काम करायला लागली आहे. कोण आहे ही तरुणी? जाणून घेऊयात प्लॅनेट मराठी मॅगझीन मधून.
सात वर्षांपूर्वी ५ लोकांनी येऊन आम्ही “माऊली फौंडेशन” हा एक ग्रुप तयार केला. माझी खूप इच्छा होती की काहीतरी पैशांची बचत करून कॅन्सर पेशन्ट, वृद्धाश्रम विविध संस्थांना यातून काहीतरी मदत करावी. यातून अनेक खास दिवसांच नियोजन करून मग यात परिवार दिन, बालदिन, दिवाळी, ख्रिसमस अश्या दिवशी विविध संस्थाना भेट द्यायची, मग त्यांना यातून जेवण देणं, खाण्याचे विविध पदार्थ, त्यांना उपयोगी येतील अशा गोष्टी मी त्यांना या आमच्या फौंडेशन तर्फे पुरवायला लागले. त्या ठिकाणी भेट देऊन त्यांना या गोष्टी देण्यात एक वेगळंच मानसिक समाधान असतं. यातून त्यांना मिळणारा एक आनंद वेगळा असतो हे मला काम करताना जाणवायला लागलं. सात वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या वाढदिवसाला कॅन्सर पेशन्ट्स ना भेटून त्यांच्या साठी काहीतरी करायला लागले तर या गोष्टी करण्यामागचा हेतू हाच होता की हे करून मला आनंद मिळतोय. वृद्धाश्रमात गेल्यावर तिथल्या गोष्टी ऐकायला मिळायच्या.
माझ्यामते आपण डोनेशन देऊन त्यांना मदत करतोच पण त्याहून जास्त आपण या सगळ्यात त्यांना भेटून त्यांच्या सोबत काही वेळ घालवतो यातून त्यांना आनंद मिळतो. कोरोनाच्या काळात अनेकांना जेवण मिळत नव्हत, त्यांची सोय होत नव्हती तर अश्या लोकांना यातून आपण जेवण देऊ या म्हणून मी गोरेगाव मध्ये ज्यांना गरज आहे अशा लोकांना फूड पॅकेज द्यायला सुरुवात केली. माझ्या एका मित्राचं सेंट्रल किचन आहे जो माझ्या सोबत पार्टनरशिप मध्ये आहे तर आम्ही या मधून लोकांना जेवण पुरवायला लागलो. कोरोना मध्ये ६,५०० मास्क विकत घेऊन गोरेगाव, विरार, चांदीवली सारख्या भागात जाऊन तिथल्या झोपडपट्टी सारख्या भागात आम्ही लोकांना मास्क वाटले. आम्ही आमच्या संस्थेतर्फे हे मास्क वाटप करतो आहे या सोबत मी फील्ड वर जाऊन लोकांना मास्क आणि सॅनिटाजर, सोशल डिस्टनसिंग का महत्त्वाचे आहे हे लोकांना सांगायला लागले. होमेंयोपॅथी गोळ्या मी गरजू लोकांना वाटायला सुरुवात केली आहे ज्या गोळ्यांनी लोकांची प्रतिकारक शक्ती वाढतेय.
जे बीएमसी कामगार आहेत, ज्यांनी आंदोलन केले होतं की सरकार कडून पीपीई किट्स मिळत नाही, त्यांच्या आरोग्याचा मुद्दा यावरून ऐरणीवर आला होता तर मी त्यांच्या साठी ३०० फेस शिल्ड आणि ६०० मास्क बीएमसी कामगारांना वाटले त्यांना यातून जो आनंद मिळाला त्यांनी यासाठी खूप आभार मानले. माझ्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. जे धुरफवारणी करतात, कॉन्टेमनेट् झोन मध्ये जाऊन बिल्डिंग सॅनिटाईज करतात अश्या सगळ्या गोरेगाव मधल्या कामगारांना मी मास्क वाटले. अनेक सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना सरकार कडून मदत मिळत नाही अश्या लोकांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना आमच्या फौंडेशन तर्फे मदत करतोय. प्रत्यक्षात जाऊन लोकांना मी ही मदत केली. माझ्या विभागात जाऊन तिथले भाजीवाले, कामगार अश्या सगळ्यांना मी सोशल डिस्ट्सनसिंग चे प्रशिक्षण दिलंय, स्वतःची काळजी कशी घ्यावी हे सांगितलं. मास्क, फेस शिल्ड, फूड पॅकेज, लोकांना घरपोच भाज्या अश्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मार्फत पुरवत आहोत. आपण आपल्या परीने जेवढी मदत होते आहे तेवढी मदत आपण सोबत येऊन केली पाहिजे. माझे सगळे माझे मित्र- मैत्रणी सहकारी आहेत जे मला सगळेच या सामाजिक कामात मदत करतात. आपण सगळ्यांनी सोबत येऊन सरकार ला मदत करावी अशी माझी इच्छा आहे, या साठी मला मिळणारा प्रतिसाद खूप जास्त छान आहे. लोकांना मदत करून त्यातून मिळणाऱ्या आनंदाची पोचपावती माझ्यासाठी खास असते आणि हे काम असचं अखंड सुरूच राहणार आहे.
पूजा वालावलकर – नाईक (सामाजिक कार्यकर्ती)
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)