मसाला किंग धनंजय दातार यांनी युएई वरून मायदेशी परतणाऱ्या भारतीयांसाठी पुढे केला मदतीचा हाथ
दुबई – सध्याच्या कोविड १९ जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर युएईहून भारतात परत येण्याची वाट पाहत हजारो अडकलेल्या भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. या दोन्ही देशांमधील हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असून भारतीय वाणिज्य दूतावासकडे नावे नोंदविण्याची प्रक्रिया तसेच तिकिट बुकिंगही सुरू झाली आहे. अल आदिल ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे भारतात परत येणार्या गरजू प्रवाशांच्या हवाई तिकिट खर्चासाठी प्रायोजित करण्यात आपले सहकार्य देत आहेत.
डॉ. धनंजय दातार यांनी युएई मधील कामासाठी स्थायिक भारतीय जे मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचा तिकीट खर्च आणि कोविड चाचणी शुल्कामध्ये हातभार लावण्याचे आश्वासन दिले. डॉ. धनंजय दातार म्हणाले की, ज्यांना आपल्या जन्मभूमीवर परतीचा प्रवास करण्यासाठीचा खर्च परवडत नाही अशांना मदत करणाऱ्यासाठी त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेतला आहे. “जागतिक महामारीच्या अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने घेतलेले प्रयत्न हे सर्वात मोठे पाऊल आहे. यांस आपण सर्वात मोठे आपत्कालीन स्थलांतर म्हणू शकतो आणि या क्षणी आपल्या सर्व बंधूभगिनींना संकटात मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.” असे ते म्हणाले.
बरेच लोक असे आहेत जे विमान भाडे आणि कोव्हीड चाचणी फी पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. “मला समजले आहे की नोकरी गमावलेल्या बऱ्याच व्यक्तींकडे आवश्यक तेवढे पैसे नसल्यामुळे ह्या उपक्रमापासून वंचित राहत आहेत. त्या गरजूंसाठी मदतीचा हात देण्यासाठी मी मंजूर संस्थांशी समन्वय साधत आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुसरण केले जाईल. मी भारतीय वाणिज्य दूतावास जनरल श्री. विपुल यांच्याशी सवांद साधला आणि भारतीयांना तिकीट प्रायोजित करायचं आहे. मी माझ्या परीने छोटेसे कर्तव्य पार पडत आहे आणि मला आशा आहे की माझा पुढाकार उपयुक्त ठरेल. मी माझ्या सर्व सहकारी नागरिकांनाही विनंती करतो की त्यांनी यास जमेल तेवढा हातभार लावा जेणेकरून एकत्रितपणे आपण लवकरात लवकर या संकटावर मात करु शकू. प्रत्यावर्ती प्रक्रियेत सामील झालेल्या सर्वांच्या प्रयत्नांसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो, ”असे डॉ. धनंजय दातार म्हणाले.
डॉ धनंजय दातार यांच्या नेतृत्वात अल आदिल ट्रेडिंग गटाने युएईमध्ये ९००० हून अधिक भारतीय उत्पादने युएई मध्ये आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज या गटामध्ये आखाती देशांमध्ये पसरलेल्या ४३ प्रशस्त सुपर स्टोअर्स, २ आधुनिक मसाल्यांचे कारखाने, २ पीठ गिरण्या आणि आयात-निर्यात कंपनीची साखळी आहे. युएईच्या राज्यकर्त्यांनी धनंजय यांचा व्यवसाय क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना एक प्रतिष्ठित पुरस्कार आणि ‘मसाला किंग’ या पदवी देऊन गौरविले आहे.
या ग्रुपमध्ये स्वत: च्या ब्रँड ‘पिकॉक’ अंतर्गत रेडिमेड पीठ, मसाले, लोणचे, जाम, नमकीन आणि इन्स्टंट्स पदार्थ यासारख्या प्रकारातही ७०० हून अधिक उत्पादने तयार केली जातात. त्याच्या समूहाची भारतीय शाखा मसाला किंग एक्सपोर्ट्स (इंडिया) प्रा. लिमिटेड मुंबई येथून यशस्वीरित्या कार्यरत आहे. अल आदिल ग्रुप सक्रिय विस्तार तर्हेतमध्ये आहे आणि इतर खाडी देशांमध्ये त्यांच्या शाखा विस्तारित करत आहे. या कंपनीने यूएसए, कॅनडा, केनिया, स्वित्झर्लंड, इटली, एरेट्रिया, कुवैत, ओमान, बहरेन, सौदी अरेबिया आणि युएई येथे विशेष व्यापारी मार्ग स्थापित केले आहेत.
सौजन्य : नारद पी आर