कोरोनामुळे रद्द झालेली वारी पण हीच वारी तुम्हाला डिजिटली अनुभवता आली तर???
सोशल मीडिया वर सध्या “वारीचं (विठ्ठलाच्या नामचं) “फिल्टर भारीच हिट होतंय. या फिल्टर मधून तुम्हाला डिजिटली वारीचा अनुभव घेता येणार आहे. नक्की काय आहे डिजिटल वारीचं अनोखं फिल्टर या बद्दल जाणून घेऊ या इन्स्टाग्राम वर मराठमोळी फिल्टर बनवणाऱ्या पियुष सुप्रिया कडून….
“अशी सुचली संकल्पना”
इन्स्टाग्राम फिल्टर मध्ये आपण खूप फिल्टर बघतो तर त्यात मराठी मध्ये एकही फिल्टर नव्हता मग मी स्वतःहून थोडा पुढाकार घेऊन कसा फिल्टर बनवतात, काय प्रक्रिया असते ते फिल्टर कसे बनवतात यांचा थोडा अभ्यास करून मी मराठी फिल्टर लाँच केले. आतापर्यंत मी ४ ते ५ फिल्टर बनवले त्यासाठी मला उत्तम प्रतिसाद मिळाला तर यातून ही संकल्पना सुचली. मराठी मध्ये काहीतरी करायचं म्हणून मी मराठी फिल्टर लाँच केले.
“फिल्टररुपी वारी”
यंदा कोरोनामुळे आपल्याकडे वारी रद्द झाली आहे, अनेक वारकरी लाखोंच्या संख्येने वारीला जातात तर यंदा आपण वारी बद्दल डिजिटली काय करू शकतो यांचा विचार केला तर मला यातून सुचलं की विठ्ठलाचा नाम जो असतो त्यांचा एक मराठमोळा असं फिल्टर बनवून तो लाँच करूयात. लोकांना तो आवडतोय आणि खूप चांगला प्रतिसाद या फिल्टर ला मिळतोय.
“म्हणून मराठी फिल्टर लाँच केले”
जर तुम्ही इन्स्टाग्राम मध्ये गेलात आणि तिथे स्टोरी मध्ये फिल्टर शोधले तर तिथे एकही मराठी फिल्टर नव्हता म्हणून मी मराठी मध्ये फिल्टर बनवण्याचा विचार केला. आता बरेच मराठी फिल्टर आले आहेत यांची एक सुरवात माझ्या पासून झाली. इन्स्टाग्राम फिल्टर म्हणजे (AR) अर्गुमेंटल रियालिटी हा जो प्रकार असतो तर त्याच्या मध्ये तुम्हाला एखादा फिल्टर वापरता येतो तर अशी ही फिल्टर ची संकल्पना आहे.
“फिल्टर कसा बनतो??”
एकतर फिल्टर बनवण्यासाठी २ – ३ सॉफ्टवेअरची गरज असते. फोटोशॉप हे मुख्य सॉफ्टवेअर आहे ज्यात तुम्ही सगळे डिजाईन बनवता, त्या नंतर ब्लेंडर, स्पार्क एअर या तीन मुख्य सॉफ्टवेअर मधून फिल्टर बनवता येतात. या सॉफ्टवेअर चा वापर करून आपल्याला फिल्टर बनवता येतो. फिल्टर अपलोड केला की १० दिवसाचा वेळ जातो या काळात फिल्टर अप्रुवल ला जातात ५ ते ६ दिवस अप्रुवल जातात मग आपल्याला फेसबुक आणि इन्स्टाग्राम कडून या बद्दल ऑफिशियल मेल येतो आणि मग आपण केलेला फिल्टर लोकं वापरतात.
“फिल्टर स्टोरी हिट”
मी आतपर्यंत ३ ते ४ फिल्टर बनवले आहेत पहिला जो बनवला होता “अशी ही बनवाबनवी मधला तुमचा फेवरेट डायलॉग कोणता” आणि त्याला भन्नाट प्रतिसाद आला ५० ते ६० हजार लोकांनी तो फिल्टर बघितला आणि वापरला त्या नंतर “दुनियादारीचे फेवरेट डायलॉग” या सोबतीने अभिनेत्री अदिती द्रविड चं एक नवीन गाणं आलंय तिच्यासाठी मी एक फिल्टर बनवला आणि मग आता डिजिटल वारीचा फिल्टर मी लाँच केला. या सगळ्यांसाठी खूप छान प्रतिसाद मिळतोय यात नक्कीच नेहमी काहीतरी नवीन करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
फिल्टर लिंक :
https://www.instagram.com/a/r/?effect_id=591610921469352
“युट्युब मुळे होतोय फायदा”
याचा फायदा मला युट्यूब मुळे होतो, मी नुकतंच “सोशल पियुष” ( social piyush ) नावाने युट्यूब चॅनेल सुरू केलं. या चॅनेल वरून सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग, इन्स्टाग्राम चे टिप्स बेस्ट अँप असे भन्नाट विषय घेऊन मी व्हिडिओ करतो. जेणेकरून लोकांना सोशल मीडिया बद्दल अधिक माहिती मिळेल हा यामागचा हेतू आहे.
युट्यूब लिंक :
https://www.youtube.com/user/creativepeeyush09
इन्स्टाग्रामवर तुम्ही हे हटके फिल्टर वापरायला विसरू नका आणि हो हा डिजिटली वारीच्या फिल्टर मधून डिजिटली वारी नक्की करा.
पियुष सुप्रिया तुला तुझ्या या सोशली प्रवासासाठी प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)