World Photography Day : फोटोग्राफीतून ‘माझी मुंबई’चं दर्शन
आपली मुंबई स्मार्टसिटी होताना त्यासोबतच अनेक सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळताहेत. पण आपल्या कल्पक नजरेतून हा अवलिया मुंबईचं रोज एक नवं रूपं आपल्या समोरं घेऊन येतो. #EverydayMumbai म्हणतं मुंबईची रोज एक वेगळी ओळख आपल्याला याच्या नजरेतून घडते. आज ‘जागतिक छायाचित्र दिना’ निमित्त (World PhotographyDay) तरुण छायाचित्रकार विनय राऊळ याच्याशी ‘प्लॅनेट मराठी’ने केलेली ही खास बातचीत…
गेल्या अनेक वर्षांपासून विनय फोटोग्राफर म्हणून काम करतोय. केवळ छंद म्हणून केलेली ही सुरुवात आज त्याची ओळख बनली आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या मुंबईतील प्रत्येकाला या वेळेसोबत स्पर्धा करायची असते. या धावपळीत माणूस स्वतःची आवडं विसरून स्वतःला स्पर्धेत गुंतवून घेत आहे. पण, धावत्या मुंबईला कॅमेऱ्यात कैद करण्यात एक वेगळीच मजा येते असं विनय राऊळ सांगतो. विद्यार्थीदशेपासून त्याचा सुरु झालेला हा प्रवास एक उत्तम फोटोग्राफर म्हणून मार्गस्थ झाला आहे. नामांकित पुरस्कार सोहळ्याचं रेड कार्पेट असो, वा चौकार-षटकार उडवणार क्रिकेटच मैदान विनयच्या फोटोग्राफीचं नेहमीचं कौतुकं होतं. फोटो सगळेच काढतात पण, फोटोग्राफरची क्रिएटीव्हिटी आणि कल्पनाशक्ती त्याला इतरांपेक्षा वेगळ बनवते ही ओळ विनयच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळते.
“आपली मुंबई हे एक अनोखं शहर आहे. या शहराकडे पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे. आपण जिथे राहतो, वाढतो आपल्याला त्या लोकांसारखं राहता आलं पाहिजे. मलाही तसं जगायला आवडतं.’, असं म्हणतं मी मुंबईच्या आठवणी माझ्या फोटोंच्या स्वरुपात कैद करतो. मुंबापुरीची धावपळ, मुंबईची लोकल, बस, रिक्षा, इथलं चटकदार खाणं, इथल्या लोकांची मेहनत, चौपाटी या आणि अशा नानाविध गोष्टी मुंबईत आहेत आणि याचंसाठी #EverdayMumbai ची सुरुवात झाल्याचं तो सांगतो. “मुंबईच्या रस्त्यावर मनसोक्त हिंडताना किंवा सहज बाजारात निघाल्यावरही अनेक गोष्टी फोटोग्राफर म्हणून माझं लक्ष वेधून घेतात आणि त्यांना टिपण्याचा मोह मला अनावर होतो”, असंही तो सांगतो. समोरचा एखादा क्षण किंवा इतर काही टिपण्यासाठी कॅमेरा किंवा अगदी मोबाईलही त्याला पुरेसा असतो.
मुंबईच्या काढलेल्या फोटोंचं कलेक्शन अफाट असल्याचं विनय सांगतो. यातील बरेचं फोटो तो त्याच्या विविध सोशल अकाऊंटसच्या माध्यमातून तो शेअर करतं असतो. आजवर काढलेले अनेक फोटो आणि त्या प्रत्येक फोटोची काही न काही आठवण असते. एकदा विनय मॉर्निंगवॉकला गेला असता एक सुंदर फ्रेम दिसली आणि क्षणार्धात थांबून त्याने एक सुंदर फोटो काढला. नेहमीप्रमाणे त्याने तो फोटो शेअर केला आणि थेट ‘नेट-जिओग्राफिक’ने त्याच्या या फोटोची दखल घेतली. एवढचं नव्हे तर विनयने काढलेला तो फोटो ‘नेट-जिओ’च्या वॉलवरही झळकला. फोटोग्राफर म्हणून मिळालेलं हे समाधन काही औरच असल्याचं विनय यानिमित्तानं आवर्जून सांगतो. शिवाय, त्याच्या एका फोटोचं दिग्गज फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी केलेलं कौतुकं हे त्याच्या अनेक आठवणींपैकी एक असल्याचं तो म्हणतो.
फोटोग्राफीचं माझे शब्दं..
मी कोणाकडूनही फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं नाही. पण दिग्गज फोटोग्राफर आणि फोटोग्राफीची आवडं असणाऱ्या मित्रांकडून मी फोटोग्राफी शिकलो. मी फार फिल्मी आहे, हिंदी सिनेमा ‘वेकअप सिड’मुळे मला कॅमेऱ्याची आवड लागली. सुरुवातीला बाबांनी घेऊन दिलेल्या छोट्या मोबाईलमध्ये मी फोटो काढतं असे. त्यानंतर कुटुंबातील कोणाच्या एखाद्या चांगल्या फोनमधून एखादा चांगला क्षणं टिपणं मी कधीच सोडलं नाही. अखेर काहीवर्षांनी माझ्या बहिणीने माझ्या वाढदिवशी कॅमेरा भेट म्हणून दिला आणि त्या दिवसापासून माझ्या या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मी बोलण्यापेक्षा मी काढलेल्या फोटोच्या माध्यमातून अधिक चांगला व्यक्त होतो असं मला नेहमी वाटतं. मी कलाकार किंवा इतर कोणाचे फोटो काढतो त्यावेळी अनेक जण माझा फोटोसाठीची दृष्टी उत्तमं असल्याचं म्हणतात. लोकांकडून मिळालेली ही पावती, कदाचित फोटोग्राफर म्हणून हेचं माझं वेगळेपण म्हणता येईल. एखाद्या चांगल्या क्षणाला मला कॅमेऱ्यात कैद करायला आवडतं. मी नेहमी वेगळे, रचनात्मक फोटो काढण्यासाठी प्रयत्नशील असतो. घराबाहेर पडलो की, आज काहीतरी आज काहीतरी वेगळा फोटो काढण्याचं माझ्या नेहमी डोक्यात असतं. माझी ही आवड आता माझा व्यवसाय आहे. माझ्या या निर्णयाला कुटुंबाची साथ लाभली. येत्या काळात चित्रपट किंवा मालिकांसाठी काम करून माझं वेगळ स्थान निर्माण करायचं माझा मानसं आहे.
विनयला त्याच्या पुढील वाटचालीसाठी ‘प्लॅनेट मराठी’ परिवाराकडून अनेक शुभेच्छा…!
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)