वृक्षरुपी बाप्पाची साथ राहिल तुमच्या सोबत, इकोफ्रेंडली मूर्तिकार दत्ताद्रीची अनोख्या कल्पनेचं विविध स्तरांतून कौतुकं..
देवा… ‘ट्री गणेशा’
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे दिवसागणिक पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. ही गोष्ट रोखण्यासाठी दत्ताद्री हा तरुण मूर्तिकार पुढे सरसावला आहे. एल. एस. रहेजा कॉलेजमधून कमर्शिअल आर्ट्समध्ये पदवी संपादन केलेला हा तरुण. गेल्या पंधरा वर्षांपासून आवड म्हणून घरातील गणेशमूर्ती स्वतः साकारतो. गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्याने तयार केलेल्या या विशेष मूर्ती लोकांच्याही चांगल्यास पसंतीस उतरताहेत. तर त्याने साकारलेले हे ‘ट्री गणेशा’ सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
‘ट्री गणेशा’ची संकल्पना दत्ताद्रीने पहिल्यांदा रुजवली आणि नंतर मात्र अनेकांनी त्याचं अनुकरण केलं. यासाठी दत्ताद्रीने बागाकामाचंही प्रशिक्षण घेतलं. कोणत्या बिया वापराव्यात, त्यांना अंकुर फुटायला किती वेळ लागतो असा सगळा अभ्यास त्यानं केला आणि मग त्याने ही संकल्पना गणेशमूर्ती बनवण्यातही वापरली. सध्या तो कडुलिंब, भेंडी बरोबरच विविध औषधी वनस्पती किंवा फळभाज्यांच्या बियांचा वापर करतो. दत्ताद्रीने बनवलेल्या या गणेशमूर्तींचं समुद्रात, नदीत किंवा अगदी कृत्रिम तलावात विसर्जन न करता कुंडीमध्ये किंवा अगदी बागेत या मूर्तीचं विसर्जन करता येतं. मातीचा वापर करून बनवलेल्या या मूर्तीला रोज पाणी घालून आठवड्याभरात ही मूर्ती विरघळून त्यातल्या बियांपासून झाडं उगवतं. दरवर्षी बाप्पाची आठवण म्हणून असं झाडं लावलं जाऊन निसर्गाचा समतोल राखण्यातही याचा चांगलाच उपयोग होऊ शकतो असं दत्ताद्री आवर्जून सांगतो.
गेली काही वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चर्चा होत असताना, हा मूर्तीकार मात्र गेली ६ वर्ष गणेशमूर्तींच्या माध्यमातून पर्यावरण जपतो आहे. त्यानं तयार केलेल्या ‘ट्री गणेशा’च्या माध्यमातून अनेकांच्या घरी विसर्जनानंतरही रोपट्याच्या माध्यमातून बाप्पा विराजमान आहेत. गणेशोत्सव अधिकाधिक इकोफ्रेंडली पद्धतीनं साजरा करण्यासाठी गेली काही अनेक वर्षं प्रयत्न होत आहेत. दत्ताद्री कोठूर या मूर्तीकारानं स्वत: यासाठी एक शक्कल लढवली. लाल माती, शेणखत यापासून साकारलेल्या ट्री गणेशाची निर्मिती त्यानं केली. गणेशोत्सवानंतर विसर्जन केलेल्या मूर्तीतून येणाऱ्या रोपट्यांनी अनेकांच्या घराची शोभा वाढवली आहे.
तलावांमध्ये, चौपाटीवर गर्दी न करता घरच्या घरी विसर्जन करता येईल आणि नंतरही आपल्यासोबत राहणाऱ्या बाप्पाची सेवा करता येईल या उद्देशानं दत्ताद्रीनं ट्री गणेशाची निर्मिती केली. यातून पर्यावरण संवर्धनसाठी काम करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रसार करतो आहे. या गणेशमूर्तीमुळे जलप्रदूषण रोखलं जातं आणि उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होतो. ‘यंदा करोनाच्या संकटामुळे घरी गणेशोत्सव कसा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यासाठी ऑनलाइन ऑर्डर्स स्वीकारून व्यवस्थित होम डिलिव्हरी कशी देता येईल याची आखणी आम्ही करतोय. यंदा वाजतगाजत मिरवणूक न काढता घरच्याघरी पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशमूर्तीचं घरच्या घरी विसर्जन करता येऊ शकतं’, असं दत्ताद्रीनं सांगतो.
उत्सव आणि पर्यावरण महत्त्वाचा
करोनाचं संकट, पावसाळ्यातले आजार अशा अनेक गोष्टींशी येत्या काळात आपल्याला सामना करायचा आहे. पर्यावरणरक्षणही महत्त्वाचं आहेच. ट्री गणेशाच्या पर्यायामुळे आजारांचा प्रादुर्भाव रोखला जाईल आणि प्रत्येकाच्या घरी रोपट्याची लागवडही होईल. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबरोबरच वृक्षरुपी बाप्पा सदैव आपल्यासोबत राहिलं याचं सगळ्यांना समाधान असेल. – दत्ताद्रीकोठूर, मूर्तीकार
अधिक माहितीसाठी आणि तुमच्या घरी ट्री गणेशा आणण्यासाठी
https://www.treeganesha.com/ या वेबसाईटला भेट द्या.
–अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)