1- Follow Safety Rules
महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका,मास्कशिवाय बाहेर जाऊ नका, कोणाशीही बोलताना निदान पाच फुटांचे अंतर ठेवा. आपले हात चेहऱ्याला लावू नका आणि हात वारंवार स्वच्छ धुवा.
2- महासुदर्शन काढा
चार चमचे काढा एक कप कोमट पाण्यात मिसळून सकाळी व संध्याकाळी शक्यतो उपाशी पोटी घेणे, खाण्यानंतर दिला तरी चालेल.
(लक्षणे दिसल्यास सकाळी, दुपारी व रात्री)
3- Tab.संशमनी वटी (गोळी)
झंडूची मिळाली तर सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन.
(लक्षणे दिसली तर 4-4-4)
– अन्य कंपनीची मिळाली तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक.(लक्षणे दिसल्यास 2-2-2) गोळी कोमट पाण्या बरोबर घेणे, चघळली तर उत्तम.
4- औषधी गुळण्या
ज्येष्ठमध पाव चमचा +
हळद पाव चमचाच्या निम्म्या प्रमाणात +
मीठ पाव चमचाच्या निम्म्या प्रमाणात.
वरील मात्रेमध्ये चूर्ण दोन कप पाण्यात मिसळून एक कप बाकी राही पर्यंत उकळवावे आणि गाळून कोमट झाल्यावर गुळण्या कराव्यात. दिवसातून दोन वेळा.
ज्येष्ठमध नसेल तर हळद मिठाने गुळण्या कराव्यात.
(लक्षणे दिसल्यास दिवसातून चार वेळा गुळण्या)
5- औषधी चहा
गवती चहा, सुंठ (किंवा आले) पाव इंच, दालचिनी अर्धा इंच, मिरे दोन, लवंगा दोन, तुळशीची पाने दोन ( यातले जे उपलब्ध होईल ते वापरून) त्यांचा तीन कप पाण्यात उकळवून एक कप काढा बनवावा आणि सकाळ- संध्याकाळ सोसेल इतपत गरम प्यावा. गरज असल्यास गूळ घालावा.साखर मात्र चहामध्येच नाही तर पूर्ण बंद करावी.
लक्षणे दिसल्यास हा काढा दिवसातून चार वेळा घ्यावा.
6- Steam inhalation गरम पाण्याची वाफ (नाक व तोंडात वाफ जाईल अशी) घ्यावी. सकाळी आणि संध्याकाळी. (लक्षणे दिसल्यास दिवसातून चार वेळा घ्यावी)
7- कडूनिंब-तुळस
दोन कडुनिंबाची पाने व दोन तुळशीची पाने सकाळी व रात्री (झोपण्यापूर्वी) चावून खा.
उपलब्ध नसल्यास दोन-दोन चिमूट कडुनिंबाचे चूर्ण जिभेवर टाकून सावकाश चघळा, दिवसातून दोन वेळा.
8- Keep your throat moist
ज्येष्ठमध,दालचिनी, सुंठ, हळकुंड, लवंग वगैरे लहान तुकडे करून सतत चघळत राहावे.
9- Have light food
भूक लागल्या शिवाय खाऊ नये. सहज पचेल असा हलका आहार घ्यावा. मुगाचे कढण, तांदळाची पेज, शेवग्याच्या शेंगांचे सूप,वगैरे गरम सूप्स दिवसातून एक दोन वेळा घ्यावी.
10- Increase intake of proteins
आहारात प्रथिनांचे सेवन वाढवा.
जसे डाळी, कडधान्ये, सोयाबीन,दूध, पनीर, चीज,अंडी, मासे, चिकन, मांस, वगैरे.
11- Have Vitamin C and Zinc
क जीवनसत्त्व आणि जस्त (झिंक) खनिज यांची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यात मोठी भूमिका आहे, त्यांचे सेवन वाढवा.
ज्या नैसर्गिक पदार्थामधून व्हिटामिन सी व झिंक मिळते, त्यांची यादी सोबत दिली आहे.
12- Drink warm water
सतत सोसेल इतपत कोमट पाणी घोट घोट पित राहावे. निदान दिवसातून आठ ग्लास.
13- Be Active
हलका व्यायाम नियमित करावा. प्राणायाम मात्र सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा करावा.
14- Avoid Corona related news
कोरोना संबंधित बातम्या बघणे टाळा.
15- Be Happy and you will be Healthy. आनंदी राहा निश्चिंत राहा, … निरोगी राहाल.
।।शुभं भवतु।।
कोणत्याही आरोग्य समस्या असल्यास संपर्क साधा.
डॉ. अश्विन सावंत
Ayurvedic Physician
9920748444
(Feel free to contact for your health issues)
Shashwat Ayurvedic Clinic
(Scientific Ayurveda- Authentic Medicines)