मुंबईकरांना “युलू बाईक” ची सफर
मुंबईत अनेक ठिकाणी अनलॉक मुळे रस्त्यावर ट्राफिक बघायला मिळतंय यावर एक नवा उपक्रम म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण (MMRDA) ने “युलू बाईक” ही नवीकोरी संकल्पना सुरू केली आहे. वांद्रे पूर्व ते वांद्रे पश्चिम आणि वांद्रे-कुर्ला संकुलात आता युलू बाईक वरून तुम्हाला प्रवास करता येणार आहे. या ई-बाईक मुळे अनेक लोकांना याचा नक्की फायदा होऊ शकतो.
नवी मुंबईत या ई-बाईक चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता हा युलू बाईक चा उपक्रम मुंबईत राबवण्यात आला आहे. युलू ई – बाईक ची सेवा आता वांद्रे आणि कुर्ला दरमान्य उपलब्ध करण्यात आली आहे. ही सुविधा वांद्रे रेल्वे स्थानक आणि वांद्रे – कुर्ला संकुलात नऊ ठिकाणी सुरू झाली आहे.
सध्या १०० ई बाईक उपलब्ध असून येत्या काळात या युलू ई- बाईकची संख्या वाढवण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी ट्राफिक मधून ये-जा करण्यासाठी या बाईक नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही या बाईक वांद्रे व कुर्ला स्टेशन वरून या बाईक भाडयाने घेऊ शकता.
या बाईक तुम्ही भाडयाने घेऊन प्रवास करू शकणार आहात. युलू च्या ई बाईक चं भाड हे प्रत्येकाच्या खिश्याला परवडेल असं आहे. याच भाड प्रति मिनिटं दीड रुपये असं असणार आहे तर बाईक घेण्यासाठी ५ रुपये द्यावे लागणार आहेत. तुम्ही ऑनलाइन पेमेंट आणि ई वॉलेट वरून याचं पेमेंट करू शकता. या बाईक नक्कीच सगळ्यांना फायदेशीर आहेत. मुंबईत अश्या तऱ्हेन प्रवास करणं नक्कीच सोईच आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, मुंबईकरांना ट्राफिक मुळे यातून नक्कीचं सुटका मिळू शकते.
संकलन : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)