मालिकेची गरज आणि प्रकृतीची काळजी म्हणून सोडली मालिका…
सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत अभिनेत्री “अमृता पवार” जिजामाता यांची भूमिका साकारत होती. मुख्य भूमिकेत असणाऱ्या अमृताचं काम प्रेक्षकांच्याही चांगलंच पसंतीस उतरत होतं. कोरोनाकाळातील मोठ्या सुट्टीनंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मालिकेने चांगलाच वेग धरला असताना मालिकेतील मुख्य अभिनेत्री अमृतासह अन्य काही कलाकारांऐवजी मालिकेसाठी नवीन कलाकारांची निवड करण्यात आली. मालिकेतील जुन्या कलाकारांच्या या अचानक एक्झिटमुळे प्रेक्षकांमध्ये थोडं संभ्रमाच वातावरण निर्माण झालं. अनेकांनी, हे का झालं? असा प्रश्न केला तर काहींनी थेट अभिनेत्री अमृता पवार ला सोशल मिडीयावरून मेसेज करतं तिच्या कामाचं कौतुकं केलं. पण अर्धवट मालिका का सोडली हा प्रश्न मात्र अनुत्तरीत होता. अखेर स्वतः अमृताने मौन सोडतं याबद्दल खुलासा प्लॅनेट मराठी कडे केला आहे.
अमृताने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. “आता या मालिकेत लीप घेण्यात आली असून मला मालिका सोडावी लागतं’ असल्याचं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
एखाद्या व्यक्तिचरित्रावर आपण जेव्हा मालिका करतं असतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा इतिहास आणि प्रवास लोकांपर्यंत पोहोचवताना लीप घेण हा त्या मालिकेचा अविभाज्य भाग बनून जातो. जिजाऊ माँसाहेबांच्या बालपणाचा प्रवास दाखवताना बालकलाकार निष्ठा वैद्य ती भूमिका साकारत होती. त्यानंतर मालिकेत लीप घेण्यात आली आणि अमृता जिजाऊ यांची भूमिका साकारत होती. आता जिजाऊ माँसाहेबांचा पुढील जीवनप्रवास दाखवण्यासाठी मालिकेत पुन्हा लीप घेण्यात आली असून या भूमिकेसाठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिची निवड करण्यात आली असल्याचं अमृता सांगते.
खरंतर काही महिन्यानंतर हा निर्णयात घेण्यात येणारं होता, पण तो आताच घ्यावा लागला. यामागे कारणही तसचं होतं. काही दिवसांपूर्वी अमृता पवार हिला करोनाची लागण झाल्यामुळे खबरदारी म्हणून अमृताला काम थांबवण आवश्यक होतं. परंतु, एवढे दिवस शुटींग थांबवण अशक्य असल्यामुळे वाहिनी, मालिकेची टीम आणि अमृता यांचा सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याच अमृता आवर्जून सांगते. सध्या अमृता विलागीकारणात असून डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत. अमृताची प्रकृती व्यवस्थित असून विलागीकारणाचा काळ संपल्यावर एका नव्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणारं असल्याचं सांगते.
आता मालिकेत जिजाऊ माँसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले, तर शहाजी राजांच्या भूमिकेत अभिनेता शंतनू मोघे दिसणारं आहे.
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
1 thought on ““Swarajyajanani Jijamata” fame Actress Amruta Pawar tested covid positive. मालिकेची गरज आणि प्रकृतीची काळजी म्हणून सोडली मालिका…”