{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1599722821923","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1599722821905","source":"other","origin":"gallery"}
अभिनेत्री कंगना राणावत चं नाव सध्या चांगलंच गाजतंय. या-ना-त्या कारणावरून हे नावं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलं आहे. सुशांत सिंग प्रकरणात इंडस्ट्रीमधील घराणेशाही आणि नेपोटीझमवर आपली परखड मतं मांडणारी कंगना आता राजकारणाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर तिच्या या वक्तव्यावर सर्वसामान्य मुंबईकरांबरोबरीनेच मराठी कलाकार आणि पत्रकार चांगलेच बरसले. मुंबईत परताना कंगना केंद्र सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र काल मुंबई महानगर पालिकेने अधिकृत बांधकाम म्हणतं कंगनाच्या वांद्रे (पाली हिल) येथील ऑफिसवर थेट जेसीबि चढवला. पालिकेच्या या कृतीबद्दल अनेक मुंबईकरांनी पालिकेवर ताशेरे ओढले. जेवढ्या घाईत पालिकेने कंगनाच्या अनधिकृत ऑफिसवर कारवाई केली त्याचं वेगात जर मुंबईतील विविध समस्यांवर पालिकेने काम केलं तर पालिकेच कौतुकं करण्याची संधी मिळेल असं अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं आहे.
अभिनेता शशांक केतकरही याबाबतीत त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत व्यक्त झाला. ‘माझा कोणत्याही एका पक्षावर आरोप नाही, किंवा मी कोणत्या पक्षाचा समर्थकही नाही. पण सगळेच समसमान भ्रष्ट आहेत.’ असे खडे बोल सुनवत शशांक पालिकेच्या या कृत्यावर बरसला. ‘कंगना राणावत याचं ऑफिस अनधिकृत? असेलही… पण मग ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे? आधी परवानगी कोणी दिली? झोपडपट्ट्या वाढतायत, रस्त्यावर खड्डे पडतात, पूल पडतायत, नाले वाहतायत, अनधिकृत उंचच उंच टॉवर्स उभे राहतायत, कोरोना आहेच आणि वाढतोय, श्रीमंत अधिक श्रीमंत होतायत… गरीब आणखी गरीब.’ , म्हणत शशांक परखडपणे व्यक्त झाला आहे.
खरंतर, ही पोस्ट लिहिण्यामागे एक वेगळाच उद्देश असल्याचं तो म्हणतो, २०१३ मध्ये त्याने मिरारोड मध्ये घेतलेल्या फ्लॅटचं बांधकाम आज सात वर्षानंतरही अपूर्ण आहे. बिल्डर आणि राजकारण्यांमधील वाद याचा त्रास माझ्या सारख्या अनेक सर्वसामान्य कुटुंबियांना सहन करावा लागतं असल्याचही त्याने पोस्ट मध्ये म्हटलं आहे. ‘माझा मुद्दा हा आहे की आम्हा सामान्य नागरिकांचे पैसे वापरून हे असे रोज भ्रष्टाचार केले जातात. फक्त मुंबईत नाही तर देशभर! मला मुंबईचा अभिमान आहे पण मुंबईतच असे हजारो अडकलेले काम असतील… ते सगळे पाडून आमचे पैसे आम्हाला परत मिळतील का? यात नेमकी कुणा-कुणाची पोटं भरतायत? आमच्या मागे खरंच कुठलाच राजकीय पाठिंबा नाहीये, मग आमचं काय?’, असा संतप्त सवालही त्याने यावेळी केला आहे. शिवाय, ‘तुम्ही तर कलाकार आहात तुम्हाला काय कमी आहे वगैरे उथळ कमेंट्स करू नका. मुद्दा समजून घ्या.’ असं आव्हानही त्याने सर्वसामान्यांना करत ट्रोलर्सन यानिमित्तानं चपराक दिली आहे.
शशांक केतकरची पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
https://www.facebook.com/242803275830515/posts/3047478658696282/?extid=ZmieqdTJJc522FT3&d=n
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)