{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1600855454464","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1600855454442","source":"other","origin":"gallery"}
जाहिराती लिहिण्यापासून त्या दिग्दर्शित करण्यापर्यंत सगळी जवाबदारी एकदम चोख पार पाडणारे मराठी सिने-इंडस्ट्रीतील आघाडीचे दिग्दर्शक, लेखक म्हणजे वरुण नार्वेकर. उत्तम लेखक म्हणून त्यांची ओळख आहेच पण ते एक कमालीचे दिग्दर्शक देखील आहेत. ‘मुरांबा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. पण, चित्रपट करताना त्याचं लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी अगदी चोख पार पाडली. जाहीरात लेखनाची अनोखी शैली लाभलेले लेखक-दिग्दर्शक यांची ही खास मुलाखत.
जाहिरातीचा सोप्पा फंडा…
माझ्या ‘अवघे धरू सुपंथ’ या जाहिरातीबद्दल बोलायचं झालं तर, लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्या परिसरातल्या अनेक लोकांची जवाबदारी ही तिथल्या गणेश मंडळांनी घेतली होती मग अगदी परिसरातल्या जेष्ठ लोकांना सामान आणून देण्यापासून ते पोलिसांच्या चहा-पाण्याची काळजी घेण्यापर्यंत अश्या अनेक गोष्टी हे लोक करत होते. समाजाचं खरं बळ हे या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी बघितलंय. त्यावरूनच ही एक गोष्ट डोक्यात होती की या गणपतीमध्ये विशेष कौतुक करायचं असेन तर त्या तरुण मंडळीच, कार्यकर्त्याचं करायला हवं कारण स्वातंत्र्यपूर्व वेळी हा गणेशोत्सव एका वेगळ्या उद्देशाने सुरू झाला होता. पण स्वातंत्र्यानानंतर गरजूंची सेवा, समाजकार्यचा अनोखा उत्सव यंदाच्या लॉकडाऊनमुळे अनुभवयाला मिळाला. त्यामुळे हे कुठेतरी आपण आपल्या जाहिराती मधून लोकांच्या समोर घेऊन येऊ आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान या जाहिराती मधून करूया म्हणून ही जाहिरात बनवली. जाहीरात करताना एक महत्त्वाची गोष्ट असते, प्रेक्षकांना नवं काय सांगता येऊ शकत आणि ते थेट प्रेक्षकांच्या मनाला कसं भिडू शकतं हा या ब्रँड फिल्म चा हेतू असतो. उत्पादनाची विक्री करण्याच्या पलीकडे जाऊन जो ब्रँड आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात कशी आपुलकी निर्माण होईन हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून एखादी जाहिरात निर्माण केली जाते.
“उत्तम संकल्पना आणि चांगल्या गोष्टी मधून जाहिरात घडते”
ब्रँड फिल्म ही एक वेगळी दुनिया आहे. एखाद्या ब्रँड विषयी लोकांशी चर्चा साधण्याचा प्रयत्न हा ब्रँड फिल्म मधून केला जातो. अनेकदा या फिल्मच मार्केटिंग हे लोकांकडून केलं जातं. सोशल मीडियावरून ही जाहिरात लोकांच्या घराघरात पोहचते. एखादी जाहिरात व्हायरल होण्यामागे जाहिराती मधला कन्टेन्ट खूप महत्त्वाचा असतो. जाहीरातीची संकल्पना आणि विषय उत्तम असेन तर ती छान तऱ्हेने लिहिली देखील जाते. ब्रँड फिल्म मधून ब्रँड आणि प्रेक्षकांच्या मनाला भावेल असा विषय असल्यास त्यांचं एक नातं जुळवून जाहीरात साकारली जाते .
‘दोन्ही बाजू सांभाळून काम करतो’
ब्रँड फिल्मच्या बाबतीत दोन्ही प्रकारे काम करावं लागतं. एकतर बजेटनुसार जाहिरात करावी लागते किंवा एखादा चांगला विषय लोकांना दाखवायचा असेल, बजेट जास्त असेlल तर अनेकदा ब्रँड सुद्धा ती चांगली गोष्ट उत्तम ब्रँड फिल्म करायला तयार होतात. अश्या दोन्ही बाजू सांभाळून जाहिरात तयार केली जाते.
“सोप्या भाषेची गंमत लक्षात आली”
सगळ्यात महत्त्वाच म्हणजे जाहिरात ही आपण कशी सादर करतोय, यावर पुढील अनेक गणित अवलंबून असतात. तुम्हाला एका ब्रँड ला ज्यांचा फायदा होईन या उद्देशाने ब्रँड फिल्म लिहिल्या जातात एका बाजूला ब्रँड आणि त्यांच प्रॉडक्ट असत तर ते विकल जावं ते लोकांना कसं आवडेल या हेतूने ब्रँड फिल्मच लिखाण केल जात. चित्रपट आणि वेब सिरीज या आपल्या मनामध्ये आलेला एखादा विषय असतो. मला आलेला अनुभव लोकांना सांगणं या हेतूने चित्रपट आणि वेब सीरिज लिहिली जाते. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत पण याच सोबतीने मी जाहिरात कंपनी मध्ये काम केलं असल्याने सोप्प्या शब्दात लोकांना गोष्ट सांगणं हे चित्रपट लिहिताना फायदेशीर ठरत हे काम करताना लक्षात आलं असं मला वाटतं.
“लिखाणात कास्टिंग सापडत जात”
खरंतर मी स्वतः लिहीत असल्याने, गोष्टी लिहिताना त्या लिखाणाच्या प्रक्रियेत मला यातली पात्र सापडत जातात. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचे हाव-भाव दिसतात मग यातून ते पात्र कोण उत्तम साकारू शकेल याबद्दल डोक्यात विचार सुरु होतात. जसजस लिखाण पूर्ण होत तेव्हा पुढे जाऊन त्या संबधित व्यक्ती ही सापडते आणि यांचा विचार करून त्या फिल्मबद्दल कास्टिंग केलं जातं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला जे कास्टिंग हवं असते ती लोक काम करण्यासाठी तयार होतात. असं सिद्धार्थ जाधव च्या बाबतीत झालं एका फोन वर त्याने या फिल्मसाठी होकार दिला. लिखाणाच्या या प्रोसेस मध्ये आपल्याला कास्टिंग सापडत जात.
“लवकरच आणि काय हवं चा नवीन सिजन करणार”
आगामी प्रोजेक्ट बद्दल सांगायचं झालं तर “आणि काय हवं” च्या नवीन सिजन बद्दल बोलणी सुरु आहेत तर नक्कीच हा प्रोजेक्ट लवकर होईल सोबत काही दिवाळीबद्दल ब्रँड फिल्म आहेत तर या दोन प्रोजेक्ट वर सध्या काम करतोय.
एक वेगळी नजर लाभलेला दिग्दर्शक अशी त्यांनी स्वतःची ओळख बनवलेली आहे. हटके जाहिराती मानवी भावनांचा योग्य प्रमाणात वापर लिखाणाचे अनोखे पैलू हे आपण त्यांच्या “मुरांबा” चित्रपटात आणि त्यांच्या “आणि काय हवं” या सिरीज मध्ये अनुभवलंय. वरुण नार्वेकर यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा !
मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)