प्रवास करायला, मनसोक्त फिरायला कोणाला आवडत नाही? नवनवीन देश पाहणं, तिथल्या लोकसंस्कृतीचा आणि खाद्यसंस्कृतीं अनुभवण्यातली मजा अवर्णनीयच असते. पण सध्या लॉकडाउनमुळे अनेकांची गोची झालीये हेही तितकंच खरं… आता हा मोठ्ठा ब्रेक संपल्यानंतर कुठे फिरायला जावं याचं अनेकांनी प्लॅनिंग केलं असेल. आता बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर अनेकदा ‘बजेट’चा अडथळा येतोय पुढील काही टिप्स चा वापर केला तर भटकंती ‘बजेट’मध्ये बसवता येते. ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त अशा हौशी पर्यटकांसाठी कमी खर्चात परदेश वारी कशी करता येईल यासाठी खास टिप्स…
स्वस्तात प्रवास करा
कोणा एजण्टमार्फत तिकीट बुकिंग करण्यापेक्षा ऑनलाइन बुकिंग केल्यास विमानप्रवास स्वस्त पडतो. नियोजीत सहल असल्यास शक्य असेल जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढंच आधी तिकीट बुक करा. सकाळी उशीरा किंवा दुपारच्या फ्लाइटने प्रवास केल्यास पैसे वाचतील.
राहण्याचा खर्च कमी करा
राहण्याची व्यवस्था करताना विमान बुकिंगच्या अगदी उलट विचार करा. शक्यतो हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग टाळा. स्वस्त पण चांगलं असं कमी दर असणारं हॉटेल किंवा अपार्टमेंट भाड्यानं घ्या.
ऑफ-सीझन प्रवास बेस्ट
पर्यटनासाठी सुगीचे मानले जाणारे दिवस टाळून प्रसिद्ध ठिकाणांची भटकंती करा. यामुळं पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी होणाऱ्या खर्च कमी होईल. खरेदीही कमी पैशांत होईल. शिवाय, गर्दीपासून सुटका होईल. त्यामुळे तुम्हाला मनसोक्त फिरता येईल.
खरेदी करताना हुशारी दाखवा
पर्यटनस्थळांवरून भरमसाठ भेटवस्तू खरेदी करू नका. खरेदी करताना बार्गेन कुठे होतं किंवा होत नाही याची चौकशी करा.