‘ती’चा प्रवास… : ३ लेखिका रोहिणी निनावे
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका अशा अनेक व्यक्तिरेखांना आपल्या लेखणीतून जन्म देणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या या व्यक्तिरेखांमागाचा चेहरा म्हणजे लेखिका रोहिणी निनावे. विविध मालिका आणि शिर्षक गीतांच लेखन करण्याबरोबरच अनेक मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्ताने त्यांची ही खास मुलाखत.
रोहिणी निनावे हे नावं सध्याच्या मालिका विश्वातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक नावं असलं तरी त्यांचा हा प्रवास अगदीच वेगळा होता. रोहिणी यांचे वडील वसंत निनावे कवी आणि लेखक होते. त्यामुळे घरी साहित्यिक वातावरण होतं आणि त्याचमुळे माझी जडणघडण होतं गेली असं रोहिणी सांगतात. नागपूरचे असूनही तिथला लहेजा आमच्या बोलण्यात कधीच आला नाही तो प्रमाण भाषा बोलली आणि लिहिली जावी या अट्टाहासापोटी. पण ही सवय लेखिका म्हणून काम करताना आजही उपयोगी येते याचा आनंद आहे, असं त्या म्हणतात.
खरंतर, लेखिका म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला तो त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी. लहानपणी त्यांनी त्यांच्या चुलत आजोबांवर एक सुंदर कविता लिहिली होती. त्यानंतर विविध दिवाळी अंकांसाठी वडिलांच्या कविता मागायला कोणी आलं कि ते रोहिणी यांच्याही कविता त्यांना देऊ लागले. त्या कविता इतक्या सुंदर होत्या कि त्या छापूनही आल्या आणि त्यातून लिखाणाचा आत्मविश्वास वाढला असं रोहिणी आवर्जून सांगतात. कॉलेजमध्ये लिखाण, वक्तृत्व अशा सगळ्याच स्पर्धांमध्ये बक्षिस मिळवली आणि अखेर ‘मी लेखिका होणारं…’ हे त्यांनी माणसंही पक्क केलं.
रोहिणी यांची मराठी आणि हिंदी भाषेवरची पकड मजबूत होती. त्यामुळे त्यांनी अनुवाद करण्यापासून करिअरची सुरुवात केली. पण लिखाणाची इच्छा कायम सोबत होती. लोकांना त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब पाहायला, वाचायला आवडतं हे एव्हाना रोहिणी यांच्यातील लेखिकेने हेरलं होतं. प्रत्यक्षात लिहायला-वाचायला वेळ मिळतं नसला तरी मी आजूबाजूची माणसं वाचायचे. त्यांचे स्वभाव जाणून घ्यायचे, असं त्या म्हणतात. एके दिवशी अधिकारी ब्रदर्सकडून तत्कालीन दूरदर्शनवर सुरु होणाऱ्या मालिकांच्या लेखनासाठी रोहिणी यांना विचारण्यात आला. पत्रकारिता विषयावर मालिका अशी कल्पना अधिकारी यांच्या डोक्यात होती. त्यावेळी रोहिणी या मंत्रालयात काम करतं असून एका मासिकेची उपसंपादिका म्हणून काम पाहत होत्या. त्यामुळे सतत पत्रकार आणि अधिकाऱ्यांच्या गराड्यात असणाऱ्या रोहिणी यांना ही मालिका जणू खुणावत होती. अखेर १९९७ च्या दूरदर्शनवरील पहिली मालिका असणाऱ्या ‘दामिनी’चं लेखन रोहिणी यांनी केलं. मराठी मधली पहिली दैनदिन मालिका ‘दामिनी’ ठरली. पुढे त्यांनी अनेक उत्तम मालिका लिहित आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेत बंडखोर स्त्री चं दर्शन घडवणारी लेखिका म्हणजे रोहिणी निनावे असं म्हणणं वावग ठरणारं नाही. अवघाची हा संसार, अवंतिका माझ्या नवऱ्याची बायको अशा एक न अनेक मालिकांचं शीर्षक गीत लेखन ते मालिकेच लेखन अशी सगळी जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. लेखन करण्याबरोबरच रोहिणी यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्येही अभिनेत्री म्हणून काम केल.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)