‘ती’चा प्रवास… : ६ (नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर)
नटरंग, मितवा अशा नामांकित चित्रपटांच्या माध्यमातून अनेक बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना म्हणजे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर. नृत्य दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेल्या फुलवा या जिमॅस्टिक खेळाडू असून मानाचा शिव छत्रपती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. जिमन्यास्टीक विद्यार्थिनी, प्रशिक्षक आणि त्यानंतर नृत्य दिग्दर्शनाकडे वळलेल्या फुलवा यांना येत्या काळात चित्रपट दिग्दर्शन करण्याचीही इच्छा आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्तान जाणून घेऊया फुलवा खामकर यांच्या याचं प्रवासाविषयी….
‘आपला नृत्याशी कधी काही संबंध येईल…’ असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. बालपणी Gymnastics म्हणजे फुलवा यांचा आवडता खेळ. वडील प्रसिद्ध साहित्यिक अनिल बर्वे. त्यामुळे घरी सतत लिखाण-वाचन आणि त्याबद्दलच्या चर्चा असायच्या. १९८४ साली वडिलांचं निधन झालं. त्यावेळी मी नऊ आणि भाऊ राही बर्वे पाच वर्षांचा होता, असं त्या सांगतात. घरात बाबांची फार सवय होती त्यामुळे बाबांची कमतरता नेहमी भासतं असे आणि म्हणूनच स्वतःच मनं गुंतवण्यासाठी समर्थ व्यायाम शाळेत फुलवा जाऊ लागल्या. त्यामुळे खेळाडू म्हणून आणि खेळामुळे खरं नावं आणि ओळख मिळाल्याचं त्या सांगतात. जिमन्यास्टीकसाठी विविध पुरस्कारांबरोबरच मानाचा शिव छत्रपती पुरस्कारही फुलवा यांना मिळाला आहे. हे सगळं सुरु असताना, कथ्थक या नृत्य प्रकारच रीतसर प्रशिक्षण घेण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. शिवाय, जिमन्यास्टीक प्रशिक्षक म्हणून काम करण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. त्याबरोबरच विविध वाहिन्यांवरील नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास त्यांनी सुरुवात केली आणि तिथेही त्यांना नेहमी यश मिळतं राहिलं.
२०१० मध्ये रवी जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने नृत्य दिग्दर्शिका म्हणून फुलवा यांचा खऱ्या अर्थाने जन्म झाला असं म्हणण वावग ठरणारं नाही. या चित्रपटातील सगळ्याच गाण्याचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं आणि त्यासाठी अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. पण त्या नंतर त्यांच्या आयुष्याची खरी धडपड सुरु झाली असं फुलवा म्हणतात. चित्रपट हे माध्यम त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे हे माध्यम शिकण्यासाठी याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. या सगळ्यात काम करतना प्रत्येकाने पाठिंबा दिल्याचं त्या सांगतात. परंतु, अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीला अधिक महत्त्व दिलं जातं असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. कामाच्या बाबतीतही असे अनुभव आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एखादा पुरुष नृत्यदिग्दर्शक जर लावणी किंवा आयटम सॉंग दिग्दर्शित करू शकत असेल…. तर मग पुरुषी गाणं आम्ही स्त्रियांनी का दिग्दर्शित करू नये? असा सवालही फुलवा केला आहे. त्यामुळे येत्या काळात अजूनही अनेक स्त्रियांनी कामासाठी पुढे यायला हवं असं फुलवा आवाहन करतात.
घरातील साहित्याचा वारसा भाऊ राही याच्याकडे गेला आहे. त्यांनी तुंबाड चित्रपटच लेखन-दिग्दर्शन केलं. आईचे गुण मात्र माझ्यात आले आणि मी नृत्यांगना झाले, असं फुलवा सांगतात. एरव्ही विविध चित्रपट किंवा डान्स शोच्या माध्यमातून जीवतोड मेहनत करून घेतं तारे-तारका, स्पर्धक यांना नाचवणारी फुलवा यांना काहीतरी वेगळ दिग्दर्शन करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी प्रथमच सांगितलं. आता ते नक्की काय असणारं आहे हे बघणं उत्सुकतेच ठरणारं आहे.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)