मराठीपण जपणाऱ्या प्रत्येकासाठी हक्काचं माध्यम असणाऱ्या प्लॅनेट मराठीची चर्चा आता वाऱ्यासारखी पसरत चालली आहे. मागच्यावर्षी घोषित करण्यात आलेल्या या मराठमोळ्या ओटीटीमाध्यमाविषयी दिवसागणिक प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढतं गेली. मराठमोळे चित्रपट, वेब सिरीज, मनोरंजनाचे कार्यक्रम यांच्याबरोबर ‘प्लॅनेट मराठी म्युझिक’हे हक्काचं संगीत व्यासपीठ गायक, संगीतकारांबरोबरच संगीतप्रेमी प्रेक्षकांसाठीही पर्वणी ठरणार आहे.
मराठी भाषा आणि त्याला लाभलेला पारंपारिक संगीत कलेचा वारसा, त्याची अभिजात परंपरा आता ‘प्लॅनेट मराठी म्युझिक’च्या माध्यमातून जतन आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच काम हे ओटीटी माध्यम करणार आहे. विशेष म्हणजे, ओटीटीच्या माध्यमातून संगीत कला जगभरात पोहचवण्यासाठी कंबर कसलेलं हे एकमेव ओटीटी माध्यम ठरतंय.
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या ‘प्लॅनेट मराठी म्युझिक’ अंतर्गत जुनी किंवा आधीच प्रदर्शित झालेली गाणी आणि त्या गाण्यांचे कॅराओके ट्रॅक उपलब्ध असणारं आहेत. शिवाय, प्लॅनेट मराठी ओरीजनल अंतर्गत नव्या गाण्यांची निर्मिती करण्याचा मानस असल्याची माहिती प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी दिली आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी फक्त प्रेक्षकांचे मनोरंजनच करणार नाही, तर नव्या मराठी कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे या ओटीटी अॅपवर प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजिनाचं नाही तर नव्या टॅलेंटला संधी मिळणार आहे.
नव्या मराठी कलाकार तसेच संगीतकार यांच्या कलाकगुणांना वाव देणारं ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आणि ‘प्लॅनेट मराठी म्युझिक’ जगातलं पहिलं आणि हक्काचं व्यासपीठ असणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात प्लॅनेट मराठी पोहोचून मराठी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचा ध्यास प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी घेतलाय. अवघ्या काही दिवसांतच हे अॅप आपल्या भेटीला येणारं आहे.
संगीत पर्वणी…
सध्या उपलब्ध असलेल्या ओटीटी माध्यमांपेक्षा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ सर्वतोपरी वेगळा असेल असा आमचा प्रयत्न आहे. ओटीटीवर गाण्यांसाठीचा वेगळा विभाग असावा हे आमचं अगदी सुरुवातीपासून ठरलं होतं. आज त्याची अधिकृत घोषणा होतेय. शिवाय, गाण्यांसाठी ओटीटी माध्यम स्वतंत्रपणे काम करणार ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ पहिलंवहिल माध्यम ठरतंय याचा आनंद आहे.
-अक्षय बर्दापूरकर (सीएमडी, प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि.)
तुम्हालाही तुमचा संगीत (म्युझिकल कंटेंट) आमच्या ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या ‘प्लॅनेट मराठी म्युझिक’साठी पाठवायचं असल्यास https://planetmarathi.com/pitch/ वर संपर्क साधावा.