ढोल ताशांचा गजर , उत्साहात उभारल्या जाणाऱ्या गुढ्या आणि उत्सवाचे रंग ! कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा नव्या जोशात “गुढी पाडवा” साजरा होणार आहे. पुन्हा एकदा नव्या जोशात आणि उल्हासित वातावरणात नववर्षाची स्वागतयात्रा पार पडणार आहेत. यंदा मुंबईसह अनेक ठिकाणी गुढी पाडवा जलोषात साजरा होणार आहे. याच खास गुढी पाडव्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा एक खास आढावा तुमच्यासाठी…
“हिंदू नववर्ष स्वागत समिती, गिरगांव”
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि नवीन तालांसह जगदंब मुंबई ढोलताशा आणि ध्वजपथक आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसमोर येत आहे. ढोल ताशांच्या सोबतीने विविध चित्ररथ , बाईक रॅली आणि गणपती पालखी विविध सांस्कृतिच दर्शन खास आकर्षण सोहळा अनुभवण्यासाठी नक्की या! स्थळ :- गिरगांव चर्च (गिरगांव नाका) वेळ :- शनिवार दि. २ एप्रिल २०२२ पहिला ठोका सकाळी ८ वाजता.
सांस्कृतिक सोहळ्याने साजरा होणार गिरगांवचा पाडवा !
गिरगांवच्या सगळ्यात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गिरगांव शोभायात्रेची परंपरा २००३ सालापासून अखंड चालू आहे. मुंबईत पहिल्यांदा गिरगांवच्या शोभायात्रेचा श्री गणेशा करणारी संस्था म्हणजे “स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान”. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांनी गिरगांव गुढीपाडवा शोभायात्रा सोहळ्याला सुरुवात करून कोरोनानंतर पुन्हा यंदाचा गुढीपाडवा नव्या उत्साहात साजरा करण्यासाठी “स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान” सज्ज झालं आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करून २ वर्षाच्या कोरोनाच्या कठीण काळातून बाहेर पडून यंदा मोठ्या उत्साहात हा पाडवा अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून २ एप्रिल २०२२ रोजी पाडव्याच्या शुभ दिनी श्री फडके गणेश मंदिर गिरगांव येथे सकाळी ८ वाजता बाप्पाच दर्शन घेऊन गुढी पूजन करून हिंदू नववर्षाच स्वागत मुंबई मधल्या पहिल्या ध्वजपथकाने म्हणजे “गिरगांव ध्वजपथक” यांच्या सोबतीने होणार आहे.
गिरगांवचा गुढीपाडवा नेहमीच खास असतो आणि यंदा सुद्धा तितकाच खास होणार आहे. म्हणून यावर्षी नववर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळेच सोबतीने हा सोहळा साजरा करू…
Photo Courtesy-
https://instagram.com/emmanual_09
https://instagram.com/jagadamb_mumbai
https://instagram.com/svyp_girgaon
लेखन- नेहा कदम