प्रत्येक शहराची एक गोष्ट असते असं म्हणतात. आपण जगभर फिरतो, तिथल्या अनेक जागांना भेट देतो पण तुम्हाला माहित आहे का? अश्या अनेक जागा आहेत ज्यांना एक वेगळ महत्त्व आहे. आपल्याकडे १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो. “संस्कृतीचे संरक्षण व्हावे” या हेतूने स्मारक व वारसास्थळे यांच्या आंतरराष्ट्रीय समितीने 1982 झाली हा दिवस घोषित केला.
ज्याला UNESCO ने मान्यता दिली. अभिमानाची गोष्ट आहे की, United Nations Educational, Scientific and Cultural Organization म्हणजेच UNESCO जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केला. आपल्या मुंबईत देखील अश्या अनेक जागा आहे जिथे आपण अगदी सहजपणे फिरायला जातो आणि आजच्या जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने आपण मुंबई मधल्या काही खास “जागतिक वारसा” असलेल्या जागा बद्दल जाणून घेऊया…..
१ ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबईचा दिवस जिथून सुरू होतो आणि जिथे संपतो अशी मुंबईची लाइफ लाईन जिथून धावते असं “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.” मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये या जागेचा पहिला क्रमांक लागतो.
२ ) राजा भाई टॉवर
लंडन मधील “बिग बेन टॉवर” प्रमाणे दिसणारी वास्तू म्हणजे मुंबई मधला “राजा भाई टॉवर”. हा टॉवर ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या देखरेखेखाली बांधण्यात आला.
३ ) फ्लोरा फाऊंटन
मुंबईतील सगळ्यात आकर्षक मानली जाणारी जागा म्हणजे फ्लोरा फाऊंटन. फोर्ट मध्ये असलेली ही जागा हुतात्मा चौक म्हणून देखील ओळखली जाते.
४ ) उच्च न्यायालय
मुंबईमधलं सगळ्यात जास्त गजबजलेलं ठिकाण म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. मुंबईच्या ऐतिहासिक वास्तू मध्ये या जागेचा देखील समवेश केला जातो.
५ ) पॅगोडा
मुंबई पासून थोडया अंतरावर असलेलं ठिकाण म्हणजे गोराई. २००० साली गौतम बुध्द यांच्या स्मृतीचा संग्रह करण्यासाठी पॅगोडाची स्थापना करण्यात आली. कोणत्याही आधार स्थंभाशिवाय उभारण्यात आलेली ही वास्तू जगप्रसिद्ध आहे.
६ ) सिद्धिविनायक मंदिर
मुंबईचं श्रध्दा स्थान असलेलं “सिद्धिविनायक मंदिर” हे दोनशे वर्षाची जुनी परंपरा आणि संस्कृती जपणारं मंदिर आहे. हे मंदिर देखील मुंबईमधल्या जागतिक स्थानांपैकी एक आहे.
मुंबई अनेक गोष्टीना जागतिक दर्जाचा वारसा मिळाला आहे यात अनेक ठिकाणं हे आपल्या परिचयाची आहेत मग मुंबई मधलं हँगिंग गार्डन असूदे किंवा एलिफंटा लेण्या असूदे. मुंबई अनेक गोष्टींसाठी फार खास आहे आणि अश्या दर्जेदार जागां मुळे मुंबईचं सौंदर्य वाढलं आहे. माहीम किल्ला, वरळी किल्ला, महाकाली लेण्या, जहागीर आर्ट्स गॅलरी, हाजी अली दर्गा, माऊंट मेरी अश्या अनेक जागा मुंबईत सुप्रसिद्ध आहेत आणि म्हणून आजच्या जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने आम्ही या खास जागा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मुंबईची ही हेरिटेज सफर नक्की करा!
लेखन- नेहा कदम