वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे “अक्षय्य तृतीया”. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला हिंदू धर्मात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला विष्णू देव आणि लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी करण्यात आलेले सत्कर्म अक्षय्य असते, असे मानले जाते. देशभरात उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या अक्षय्य दिवसानिमित्त जाणून घेऊ काही खास गोष्टी आणि सोन्याच्या खास खरेदीबद्दल.
“अक्षय्य तृतीया” हा दिवस कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणून या दिवशी सोन्याची खरेदीदेखील केली जाते. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना आपण बघतोय आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी अनेक ज्वेलर्सकडून आकर्षक ऑफर्स लोकांना दिल्या आहेत. वामन हरी पेठे, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स अश्या बड्या सराफांनी या खास दिवसाचं औचित्य साधून कमालीच्या ऑफर्स ठेवल्या आहेत. या खास ऑफर्स नक्की आहेत तर काय हे बघूया….
“जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स “
“आपल्याकडे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त खास मनाला जातो आणि म्हणून या खास दिवसाच्या निमित्ताने आम्ही आमच्या ग्राहकांना काय गिफ्ट देणार आहोत तर नवा कोरा “लाँयलटी प्रोग्राम”. या अंतर्गत ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत खूप ऑफर्स आहेत मनसोक्त शॉपिंग करण्याची ही खास संधी आम्ही ग्राहकांना देणार आहोत. या खास मुहूर्तावर लक्ष्मी कलेक्शन घेऊन येत आहोत. ग्राहकांच्या आवडी निवडीचा विचार करून आम्ही या आधी आम्रपली कलेक्शन लाँच केलं होतं आणि त्यांच्या दमदार प्रतिसादानंतर हे खास कलेक्शन आम्ही ग्राहकांना देतोय आणि नक्कीच ते त्यांच्या पसंतीस उतरणार आहे याची आम्हाला खात्री आहे. -आदित्य पेडणेकर (मॅनेजिंग डायरेक्टर – जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स)
“वामन हरी पेठे सराफ – दादर”
“कोरोनानंतर ही पहिली बंधन मुक्त अक्षय्य तृतीया आपण सगळेच साजरी करणार आहोत म्हणून यंदा ग्राहकांना काय खास द्यावं हा प्रश्न आम्हाला होताच आणि म्हणून “वामन हरी पेठे सराफ” यंदा अक्षय्य तृतीयेच्या खास दिवशी सोन्याच्या दागिन्यांची मजुरी फक्त प्रती ग्राम ३९९ रुपये तसेच भरीव बांगडी व पाटली २९९ रुपये देत आहे. ही ऑफर फक्त दादर रानडे रोड शाखा इथे उपलब्ध असेल. ग्राहक नक्कीच या वर्षी खूप सोन्याची खरेदी करतील यात शंका नाही.” -अश्विन पेठे ( वामन हरी पेठे सराफ)
कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा सोन्याची मनसोक्त खरेदी करूया आणि अक्षय्य तृतीया जोरदार साजरी करूया!
लेखन- नेहा कदम