June 3, 2023

Month: June 2022

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सत्यवान सावित्री हि मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील...
                         सोनी मराठी वाहिनी सातत्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.                                 मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते, हे त्यातून दिसलं. कानडीचा आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. मुख्य कलाकरां बरोबरच आकर्षण ठरले आहेत. नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. मराठी मालिकेत कानडी तडका पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने ही प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार, ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.
‘एकदा काय झालं!!’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी...
तू तेव्हा तशी या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कथा...
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित ‘अनन्या’ येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत...
काही वर्षांपूर्वी धैर्या, ढुंग्या आणि कबीर या ‘बॉईज’नी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून...
होम मिनिस्टरच्या महामिनिस्टर या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार हे ऐकून अनेकांनी तोंडात बोटं घातली. हि ११...
अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे, हे यापूर्वी...
काळजाचा ठोका चुकवणारा ‘वाय’ हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा प्रीमियर अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत...
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक सहभागी होत असतात. कोणी डॉक्टर, कोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकील. अशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अधिक रंगतदार होतो. कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी न डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाणारे काही धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात.  या आठवड्यात सोमवारच्या भागात असेच एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. वडाळा  येथे राहणारे लेखक असणारे अक्षय कदम सहभागी होणार आहेत. मध्यमवर्गीय घरातले अक्षय कदम घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने या खेळात सहभागी झाले आहेत. आईवडीलांनी केलेल्या कष्टांची जाणीव असणारे संवेदनशील स्पर्धक अक्षय कदम हे सध्या कंटेट रायटर  म्हणून काम करत आहे. त्यांच्या घरी तो, त्याचे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. अक्षयची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते, वडील  प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होते पण करोनापासून त्यांचं काम बंद आहे. अक्षय यांची बहीण  नायर हॉस्पिटल मध्ये डायलिसिस टेक्निशियन (dialysis technician) म्हणून काम करते. शिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रिम च्या दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. अक्षय कामाला लागल्यापासून त्याने आईला काम सोडून द्यायला संगितले होते पण आईची सवय आहे काम करण्याची म्हणून तिने अजून काम सोडलेले नाही. आईने खूप कष्ट केले आहेत आणि याची जाणीव असल्याने अक्षयला आता तिला आराम द्यायचा आहे.अक्षयचं हे स्वप्न आहे की त्याला त्याची स्वतःची टूर कंपनी सुरु करायची आहे ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचबरोबर त्याचं अजून एक स्वप्न आहे की  त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरु करायचं आहे. आईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे तिकडचा अनुभव त्याच्याजवळ आहे. मध्यमवर्गीय अक्षय २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असून  अक्षयचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.