तू तेव्हा तशी या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना भलतीच आवडली. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि अनामिकाचा अबोला पाहुन सौरभ शहर सोडण्याचा निर्णय घेतो पण हे अनामिकाला माहित नाही आहे. प्रेक्षकांना मालिकेत आता पुढे पाहायला मिळेल की बाहेरगावी गेलेली वल्ली मुद्दम सौरभच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येते आणि अनामिकाला घेऊन येते या बोलीवर ती अनामिकाकडे जाते. पण इकडे सौरभचा निर्णय पक्का आहे. तो बँगलोरला निघाला आहे. वल्ली अनामिकाला सगळं सांगते आणि अनामिका सौरभला थांबवायला निघते. पण वल्लीने अनामिकाला मुद्दाम चुकीचा पत्ता देते. अनामिका तिथे पोहोचु नये यासाठी वल्ली अनेक प्रयत्न करते पण अखेर अनामिका तिथे पोहोचते. आता अनामिका सौरभला गाठू शकेल का? तिच्या प्रेमाची कबुली देईल का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.
Related Stories
March 16, 2023
March 15, 2023