April 25, 2024

Month: June 2022

मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ  ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी  सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.   यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी  विनोदी भूमिकांबरोबरच  गंभीर भूमिकासुद्धा चोख  बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते.  सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी ‘कोण होणार करोडपती’चा मंच उजळून निघणार आहे.  ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या  प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘नवरा माझा नवसाचा’ असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांचा ‘ययाती’पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्याअनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.  मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से मामा आणि त्यांचे बंधू यांनी या वेळी सांगितले. लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम  केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही  मामांनी सांगितल्या. ‘ययाती आणि देवयानी’ ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं,’प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकातला पँटची नाडी सुटल्या चा गमतीशीर किस्सा,’भस्म’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग  अधिकच रंगतदार होणार आहे.
झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना...
                       भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी संपूर्ण देशाला अन्न देतो पण त्याच्या घरचं...
                                  ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दुसर्‍या आठवड्यात विशेष  पाहुण्या म्हणून आपल्या महाराष्ट्राची कन्या सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. मागच्या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले.  पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित राहणार आहेत. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.                                       ‘साधी राहणी, उच्च विचार’  ही  उक्ती  तंतोतंत पाळणाऱ्या सुधा मूर्ती  ‘कोण होणार करोडपती’च्या खेळात येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातील शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुधा मूर्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील ‘श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ’ या शाळेसाठी खेळल्या. शालेय शिक्षणाबद्दल असलेल्या आस्थेपोटी सुधा मूर्ती ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळल्या. मूळच्या ‘कुलकर्णी’ असलेल्या सुधा मूर्तींचे बालपण कुरुंदवाड येथे गेले. त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे मराठी मातीशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने सुधा मूर्ती यांना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे.                                       ‘कोण होणार करोडपती’ या खेळासाठी सुधा मूर्ती यांनी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी  परिधान केली आहे. लहानपणीच्या आठवणी, संस्कार, एकटी मुलगी म्हणून इंजिनिअरिंग करताना आलेले अनुभव, टाटा यांच्याबरोबर काम करत असतानाचा समृद्ध अनुभव अशा विविधांगी रंजक गोष्टींनी हा विशेष भाग रंगणार आहे. सुधा मूर्ती या प्रस्थापित असून त्यांनी केलेले विस्थापितांसाठींचे कार्य गौरवास्पद आहे. पती नारायण मूर्ती यांच्याबरोबर ‘इन्फोसिस फाउंडेशन’ची धुरा सुधा मूर्ती यांनी सक्षमपणे सांभाळली आहे.  समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या सुधा मूर्ती यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. 
सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर...
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम “चला हवा येऊ द्या” आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत....
प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा...
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे...