होम मिनिस्टर हा फक्त एक कार्यक्रम राहिलेला नसून या कार्यक्रमाशी तमाम वहिनींच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचं महामिनिस्टर हे पर्व संपलं आणि त्या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळाली. तसेच आता ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. रसिक प्रेक्षकांच्या अफाट प्रेमामुळे या कार्यक्रमाने १८ वर्षांचा अथक यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासात लाखो मैलांचा प्रवास करून अनेक दरवाजे ठोठावले आणि हजारो पैठण्या आदेश भावोजींनी वहिनींच्या दिल्या, पण त्याचा थकवा कधीच बांदेकरांना जाणवला नाही. या प्रवासात त्यांना अनेक अविस्मरणीय अनुभव देखील आले. त्याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “साताऱ्याच्या १०२ वर्षांच्या आजी या होम मिनिस्टर हा कार्यक्रम लागल्यावर टीव्हीवर दिसणाऱ्या भाओजींना त्यांच्याशी कोण काय बोललं हे सांगतात. एकदा एका शेतातल्या घरी होम मिनिस्टर हा कार्यक्रम चालू होता आणि त्या घरापाशी जाऊन मी टीव्ही बघू लागलो. तेव्हा त्या लोकांना विश्वास बसत नव्हता कि ज्यांना आपण टीव्हीवर बघतोय ते आपल्या घरी आले आहेत. मायबाप प्रेक्षकांचं प्रेम हीच माझ्या कामाची पावती आहे.”
Related Stories
December 1, 2023