झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड गाजली, ह्या मालिकेतील विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना भुरळ घालतोय. आता जवळपास ३ वर्षानंतर सुबोध भावे झी मराठीवर पुनरागमन करतोय. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणं ज्याची ख्याती आहे असा सुबोध भावे स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येतोय. हो हे खरं आहे, सुबोध झी मराठीवर नवा पण काही तरी वेगळे पण असणारा कार्यक्रम घेऊन येतोय, ‘बस बाई बस’ असं या कार्यक्रमाचं नाव असून या नव्या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता हा कार्यक्रम नक्की कसा असणार आणि काय धम्माल मज्जा मस्ती होणार ह्यासाठी प्रेक्षकांना २९ जुलैची वाट बघावी लागणार आहे.
Related Stories
March 16, 2023
March 15, 2023